तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 April 2019

पाथरी पोलीसाच्या गाडीला इंडीकाची धडक;पोलीस निरिक्षका सह तीन कर्मचारी जखमीप्रतिनिधी
पाथरी:-,शहरात मुख्यंत्री देवेंद्र फडनविस यांची सभा असल्याने पेट्रोलिंग करत असतांना दुपारी १:४५ वा मोंढा कॉर्णर परिसरात माजलगाव हुन मानवत कडे जाणा-या इंडीका क्र एम एच १६ एटी १५६५ च्या चालकाने त्याची कार भरधाव वेगाने चालऊन पोलीसांच्या गाडीच्या डाव्या बाजुला जोराची धडक दिली त्यात गाडीतील पाथरी ठाण्याचे पोलीस निरिक्षक डि डि शिंदे, एएसआय आशोक गावंडे, सम्राट कोरडे,अन्य एक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर पाथरी ग्रामिण रुग्णालयात उपचार करण्यात आले या प्रकरणी पोलीस शिपाई भगिरथ जाधव यांच्या फिर्यादी वरून पाथरी पोलीसात तक्रार दिली आहे यात पोलीसांच्या गाडीचा दिड ते दोन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे असा ही उल्लेख केला आहे. या प्रकरणी इंडीका कारचा चालक फरार झाला असून अपघातग्रस्त इंडीका कार जागेवरच दिसुन येत आहे.या प्रकरणी एएस आय गंभिरे अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment