तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 5 April 2019

बजरंग बप्पांच्या प्रचारार्थ परळीत आघाडीच्या नेत्यांचे संयुक्त दौरे

शेतकर्‍यांचे वाटोळे करणार्‍या भाजपला लोकसभा निवडणुकीत धडा शिकवा- धनंजय मुंडे

विकासाच्या मुद्यावर मत मागायची हिंमत ठेवा- प्रा.टि.पी.मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने केलेल्या आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफी करावी लागली, मात्र ती ही नीटपणे सरकारला राबवता आली नाही. शेतकर्‍यांना हमीभाव नाही, कोणतेही अनुदान मिळालेले नाही, चारी बाजुने शेतकर्‍यांचे वाटोळे करणार्‍या भाजपा सरकारला या निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. तर विकासाच्या मुद्यावर मत मागायची हिंमत ठेवा असे आवाहन काँगे्रस प्रदेश सरचिटणीस प्रा.टि.पी.मुंडे यांनी केले. 

बीड लोकसभा आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ परळी तालुक्यातील धर्मापूरी गटातील गावांमध्ये मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत जि.प.सदस्य प्रा.मधुकर आघाव, कृ.उ.बा. समिती सभापती अ‍ॅड.गोविंद फड, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुर्यकांत मुंडे, कृ.उ.बाजार समिती उपसभापती विजय मुंडे, बबन दौंड, बाबुराव दहिफळे, शिवाजीराव दहिफळे, युवक नेते माधव मुंडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष राहुल कांदे आदी उपस्थित होते. 

शेतकर्‍यांचा विमा जिल्हा बँकेच्या सारडांनी दाबल्याचा आरोप करून सामान्य शेतकर्‍यांच्या पीक विम्यावर व्याज खाणार्‍यांना मतदान काय म्हणुन करणार ? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. ग्रामपंचायत निवडणुकीत चुकीचे मतदान केले तर गावाचे वाटोळे होते, पण लोकसभा निवडणुकीत चुकीचे मतदान केले तर संपुर्ण देशाचे आणि जिल्ह्याचे वाटोळे होते. मागील 5 वर्षात तेच झाले आहे, या पुढील काळात अशी चुक होऊ देऊ नका असे आवाहन श्री.मुंडे यांनी केले. प्रा.टि.पी.मुंडे यांनी ही बजरंग सोनवणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. 

यावेळी आघाडीच्या या नेत्यांनी खोडवा सावरगाव, हेळम, हाळम, दैठणा, गुट्टेवाडी आदी गावांचा दौरा केला.

No comments:

Post a Comment