तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 April 2019

श्रम व रोजगार मंत्रालय नाशिक विभाग अध्यक्षपदाचा वसंत मुंडे यांनी स्विकारला पदभार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकारच्या नाशिक विभागाच्या अध्यक्षपदी नुकतीच वसंत मुंडे यांची निवड झाली होती. दि.24 एप्रिल रोजी            त्यांनी नाशिक येथील कार्यालयात पदभार स्विकारला. 
श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकारचे नाशिक विभागाचे अध्यक्ष राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्डात प्रादशिक संचालनालय अध्यक्ष वसंत मुंडे व सदस्य डॉ.किशोर भालेराव यांनी दि.24 रोजी सकाळी 11 वाजता नाशिक येथील प्रादशिक कार्यालयास भेट दिली. व यावेळी अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला याप्रसंगी त्यांचा संचालक सिध्दार्थ मोरे, शिक्षणाधिकारी सारिका डफरे, कर्मचारी अरुणा बैसाणे यांनी स्वागत केले. यावेळी कामगार चळवळीचे कार्यकर्ते विशाल साळवे, योगेश ननावरे, संतोष सदाफुले, उद्योजक जैन आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a comment