तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 8 April 2019

पाच वर्ष जनतेला फसविणाऱ्या भाजपाला मते मागण्याची लाज वाटत नाही का ?
प्रा टी पी मुंडे यांचा संतप्त सवाल


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 


केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या चोरांच्या टोळीने पाच वर्षे जनतेची फसवणूक केली खोटी आश्वासने देऊन गोरगरिबांच्या भावनांचा अक्षरशः खेळ केला अशा निर्लज्ज भाजपवाल्यांना पुन्हा मत मागण्याची लाज कशी वाटत नाही असा संतप्त व जळजळीत सवाल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांनी केलाबीड लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ काल सायंकाळी प्रा टी पी मुंडे सर यांनी व महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सिरसाळा सर्कलमधील रेवली गोवर्धन हिवरा कासारवाडी /रामेवाडी पोहनेर दिग्रस तेलसमुख बोरखेड आदी गावांना भेटी देऊन मतदारांशी थेट संवाद साधला


      भाजपा सरकारच्या खोटारडेपणाला व फसवणुकीला वैतागलेल्या हजारो मतदारांनी या प्रचार दौऱ्यात सहभाग घेऊन मोदी फडणवीस सरकार बद्दलची तीव्र नाराजी व्यक्त करून भाजपवाल्यांना आता धडा शिकवायचा च असा निर्धार केला


      मतदारांशी बोलताना प्रा टी पी मुंडे सर यांनी पाच वर्ष शेतकरी शेतमजूर दीन-दलित अल्पसंख्यांक बहुजन व्यापारी नागरिक यांना फसविणाऱ्या भाजपाला पुन्हा मते मागण्याची लाज कशी वाटत नाही असा सवाल उपस्थित केला केंद्रात व राज्यात भाजपाच्या व जातीवादी पक्षाच्या चोरांच्या टोळक्याची सत्ता असून मोदी व अमित शहा या टोळीचे मुख्य सूत्रधार आहेत त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज असून आपल्या देशाचे पुरोगामित्व व संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना विजयी करा असे आवाहन प्रा टी पी मुंडे सर यांनी केले बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी केंद्रात त्यांच्याच पक्षाच्या भाजपाची व राज्यात त्यांच्याच भगिनी पंकजा मुंडे यांची सत्ता असतानाही बीड जिल्ह्याचा विकास का झाला नाही शेतकऱ्यांची फसवणूक बेरोजगारांचे प्रश्न विकासकामांचा अभाव आधी समस्या ज्वलंत असतानाच मुंडे भगिनींनी विकासाचे काय प्रयत्न केले काय दिवे लावले याचा हिशोब मतदारांना द्यावा वैद्यनाथ कारखान्याने चौदाशे रुपयांचा हप्ता देऊन दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आशा खोटारड्या भगिनींना पुन्हा निवडून देणार का असा सवाल प्रा टी  पी मुंडे सर यांनी उपस्थित केला


    या प्रचार दौर्‍यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत मुंडे जि प सदस्य प्रदीप भैया मुंडे मार्केट कमिटीचे संचालक राजाभाऊ पौळ माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय ढवळे राम कांदे माजी संचालक व गोवर्धन चे सरपंच संजय जाधव युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस बाळासाहेब पाथरकर डॉ माणिक कांबळे भीमाशंकर जाधव सरपंच नितीन काकडे अंगद काकडे गोविंद निर्मळ बंडू कांदे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष महाआघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment