तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

धनंजय मुंडेंच्या उद्या कन्हेरवाडी, नागापूर, आझादनगर आणि गणेशपार येथे जाहीर सभाप्रा.टी.पी.मुंडेंसह आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.10............ बीड लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उद्या गुरूवार दि.11 एप्रिल रोजी परळी तालुक्यात चार झंझावती सभांचे आयोजन करण्यात आले आहे. कॉंग्रेसचे नेते प्रा.टी.पी. मुंडे यांच्यासह आघाडीचे नेते ही या सभेस उपस्थित राहणार आहेत. 

सकाळी 8 वाजता परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथे त्यानंतर 10 वा नागापूर येथे या नेत्यांची जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी 06 परळी शहरातील आझादनगर भागात होणार्‍या सभेस हे नेते मार्गदर्शन करणार असून, रात्रौ 08 वाजता गणेशपार भागात होणार्‍या सभेसही ते उपस्थित राहणार आहेत.

यावेळी उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासह कॉंग्रेसचे संजय दौंड व आघाडीतील पक्षांचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभांना तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रचार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment