तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 April 2019

स्नेहमीलनातून समाज संघटनेला बळ द्या, -नंदकुमार गादेवार
उत्सव नात्यांचा या स्नेहमिलन कार्यक्रमातून सामाजिक संदेश

बिड जिल्हा आर्य वैश्य महासभा कडून सूंदर आयोजन

अंबाजोगाई; 
आर्य वैश्य कोमटी समाजाचे संघटन प्रत्येक जिल्हा स्थानी पूर्ण परिवाराचे स्नेहमिलन कार्यक्रम घेऊन करण्यात येणार आहे त्याची सुरवात बिड जिल्ह्यापासून करण्यात आली असून सर्व जिल्ह्याचा असा कार्यक्रम घेऊन राज्यस्तरीय स्नेहमीलनाचा भव्य दिव्य कार्यक्रम नांदेड येथे घेऊन समाज संघटन करून सामाजिक प्रश्न सोडवले जातील असे प्रतिपालन उदघाटन प्रसंगी नंदकुमार गादेवार यांनी केले
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा बीड जिल्हा यांच्यावतीने जिल्ह्यातील आर्य वैश्य (कोमटी) समाजातील बांधवांचा सहपरिवार जिल्हास्तरीय स्नेहमिलन कार्यक्रम महाराष्ट्रात प्रथमच बीड जिल्ह्यात परळी येथे रविवार,दि.7 एप्रिल 2019 रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रथम बिड जिल्हा महासभेच्या कार्याची अनिल चिद्रवार संपादित "गरुडझेप" ही पुस्तिका काढण्यात आली त्याचे विमोचन उपस्थितीतांच्या हस्ते करण्यात आले
तर यावेळी आंतराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठल लहाने यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले. यासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाटिकेद्वारे बेटी बचाओ,लग्न विषयक, झाडे लावा,झाडे जगवा,स्वच्छ भारत, प्रदुषण टाळा आणि मोबाईलचा अति वापर आदींबाबत सामाजिक संदेश देण्यात आले. उत्सव नात्यांचा या स्नेहमिलन कार्यक्रमातुन सामाजिक संदेश देवून आर्य वैश्य कोमटी समाजातील बांधवांनी अभिनव उपक्रम सुरु केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे नटराज रंग मंदिर परळी वैजनाथ येथे आयोजित कार्यक्रमास प्रथम सत्रात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी दिपप्रज्ज्वलन व वासवी माता,रंगनाथ महाराज यांचे प्रतिमापुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नंदकुमार गादेवार, गोविंद बिडवई,सुभाष कन्नावार,भानुदास वट्टमवार,राज्यप्रसिद्धी प्रमुख प्रदिप कोकडवार,गजानन डुबे,महेश रुद्रवार, संजीव डुबे,सुर्यकांत महाजन,सुुमित रुद्रवार, विकासराव डुबे,
सुर्यकांत सिरपेवार (औरंगाबाद),सुधीर पाटील(परभणी) यांचे सहीत हिंगोली, परभणी,औरंगाबाद येथील जिल्हाध्यक्ष, सचिव व बीड जिल्हा कार्यकारीणीचे संपुर्ण सदस्य उपस्थित होते.
प्रारंभी माजलगाव येथील सौ.स्मिता रुद्रवार,सौ.शितल रुद्रवार,सौ.प्राजक्ता गुंडेवार,सौ.सोनाली रुद्रवार,सौ.सानिका गडम,सौ.पुजा रुद्रवार व राजश्री रुद्रवार यांनी गणेशवंदना सादर केली.तर परळी येथील सौ.सुलभा रुद्रवार व सौ.उषा देवशटवार यांनी स्वागतगीत सादर केले.तर मी मराठी झी मराठी हे स्वागतगीत परळी वैजनाथ येथील सौ.वंदना पारसेवार, सौ.प्रियंका देवशटवार, सौ.प्रगती डुबे, सौ.भाग्यश्री रुद्रवार, सौ.पुनम डुबे, सौ.अर्चना रुद्रवार, सौ.श्रद्धा कौलवार, सौ.वैशाली चिद्रवार, सौ.अर्चना रुद्रवार, सौ.प्रिया देवशटवार, सौ.गितांजली कोलपेकवार,कु.वैष्णवी पारसेवार,सौ.दिपाली लादे,सौ.सविता देवशटवार,सौ.पद्मा चौलवार आणि सौ.मनिषा वांकर यांनी सादर केले.या प्रसंगी सुर्यकांत महाजन यांनी प्रास्ताविक केले.तर नवनिर्वाचित आर्य वैश्य समाज परळी वैजनाथ नविन कार्यकारिणी मंडळाचा सत्कार करण्यात आला.बीड जिल्हाध्यक्ष गजानन डुबे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले तर महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची बीड जिल्हा कार्यकारिणी प्रथम जिल्ह्यात तयार करण्यात आली.या कार्यकारिणीने उत्सव नात्यांचा हा स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करुन एक चांगला पायंडा निर्माण केला आहे.त्यांचा हा उपक्रम स्तुत्य असून महाराष्ट्रात महासभेच्या वतीने अशा उपक्रमांचे उत्सव 
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा बीड यांचा आयोजनासाठी पुढाकार आयोजन करुन समाजात स्नेहमिलन घडवून आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे श्री गादेवार म्हणाले.यावेळी प्रत्येक तालुक्याने सहभाग घेतला.धारुर येथील सौ.सुप्रिया चिद्रवार,सौ.अनुजा चिद्रवार,सौ.स्मिता डुबे, सौ.सपना पिलाजी, सौ.रुपाली डुबे, सौ.वंदना रुद्रवार, सौ.राजश्री भाठाणकर, सौ.साधना खिलोजी, सौ.शिल्पा वडगावकर, सौ.मंजु भावठाणकर, सौ.स्वाती चिद्रवार, सौ.रुपाली पिलाजी यांनी “बेटी बचावो" या विषयावर नाटिका सादर केली.तर धारुर येथील सौ.गायत्री भावठाणकर, सौ.संगिता पिलाजी, सौ.सोनाली सातभाई, सौ.सपना डुबे, सौ.स्वाती रुद्रवार, सौ.संगिता डुबे, सौ.सुप्रिया डुबे, सौ.ज्योती वडगावकर, सौ.सुप्रिया चिद्रवार, सौ.कल्पना सातभाई , सौ.सुप्रिया भावठाणकर, सौ.संगिता भावठाणकर, सौ.प्रतिक्षा गुंडेवार, सौ.श्‍वेता वडगावकर यांनी झांज पथकाद्वारे उपस्थितांचे लक्ष वेधले तसेच माजलगाव येथील सौ.संध्या कोसलगे, सौ.सुजाता बोबडे, सौ.अंजली भावठाणकर, सौ.सविता रुद्रवार, सौ.संगिता पेकम, सौ.पुजा रुद्रवार, सौ.सविता गडम, सौ.मिरा बोबडे यांनी ‘मुलगी मोठ्या शहरात का द्यायची,व सुन खेड्यातील का करायची ’ या विषयावर नाटिका सादर केली.तसेच बीड येथील सौ.प्रतिमा महाजन,सौ.सारिका रेवणवार,सौ.सुचिता महाजन,सौ.प्रगती रेवणवार,सौ.विजया गुंडेवार,सौ.सुप्रिया रेवणवार,सौ.वैशाली गडम,सौ.वर्षा रेवणवार,सौ.सुनिता भावठाणकर, सौ.अनुजा रेवणवार यांनी ‘मोबाईलचा अति वापर' या विषयावर नाटिका सादर केली. तसेच परळी वैजनाथ येथील सौ.संपदा झरकर, सौ.अर्चना रुद्रवार,सौ.वंदना पारसेवार,सौ.प्रिया देवशटवार,सौ.प्रियंका देवशटवार, सौ.गितांजली कोलपेकवार, सौ.भाग्यश्री रुद्रवार, कु.वैष्णवी पारसेवार, सौ.रुचिका रुद्रवार, सौ.दिपाली लादे, सौ.सविता देवशटवार, सौ.अर्चना रुद्रवार, सौ.अर्चना रुद्रवार, सौ.पद्मजा चौलवार, सौ.श्रद्धा कौलवार, सौ.मनिषा वांकर, सौ.वैशाली चिद्रवार, सौ.सुनिता दिक्कतवार, सौ.राधा कोमावार यांनी झाडे लावा,झाडे जगवा या नाटिकेतून सामाजिक संदेश दिला. तर अंबाजोगाई येथील सौ.वंदना चक्रवार, सौ.संध्या तारे, सौ.स्मिता झरकर, सौ.उषा बिडवई, सौ.अनुराधा भावठाणकर,सौ.अर्चना सातभाई,सौ.सारिका भावठाणकर,सौ.निता भावठाणकर,सौ.स्मिता वट्टमवार यांनी स्वच्छ भारत नाटिकेतून स्वच्छतेचा संकल्प केला.अंबाजोगाई येथील सौ.सोनाली भावठाणकर,सौ.श्रद्धा गडम,सौ.अपर्णा वट्टमवार,सौ.रचिता बेजगमवार, सौ.अश्‍विनी गडम, सौ.विनया बेजगमवार, कु.ऋतुजा दमकोंडवार यांनी गोंधळी गीत सादर केले.तर केज येथील सौ.रंजना बिडवई, सौ.रुपाली पिलाजी, सौ.मिनाक्षी कामाजी, सौ.ज्योती दमकोंडवार, सौ.ज्योती कामाजी, सौ.अनिता चिद्रवार, सौ.पुनम कामाजी, सौ.सुनिता वडगावकर यांनी वासवी माता गुणगाण गीत सादर केले.या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते “गरुडझेप" या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तर सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठल लहाने यांचा सत्कार महेश रुद्रवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर डॉ.विठ्ठल लहाने यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुप्रसिद्ध गायक सौ.रागिनी जोशी व डॉ.प्रकाश जोशी, (नांदेड) यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजीव डुबे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी स्नेहमिलन प्रोजेक्ट चेअरमन सुर्यकांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहमिलन समिती गठीत केली होती. समितीच्या विविध बैठका घेण्यात आल्या त्यात कार्यक्रमाचा आढावा घेतला जात होता.त्यात समितीचे सदस्य गजानन डुबे, सुमित रूद्रवार, नंदकिशोर देवशटवार, महेश रुद्रवार,नागनाथ पारसेवार,संजीव डुबे, वैभव झरकर,अनिल चिद्रवार,प्रकाश कामाजी,दत्तात्रय दमकोंडवार आदींची उपस्थिती असायची. या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनासाठी परळी येथील समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले. वैभव झरकर यांनी यात महत्त्वाची भुमिका बजावली.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या गरुडझेप स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यांचे संपादन अनिल चिद्रवार,सुमित रुद्रवार यांनी केले.उत्सव नात्यांचा कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्यातून महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे सर्व पदाधिकारी,आर्य वैश्य कोमटी समाज बांधव हे सहकुंटूब सहपरिवार उपस्थित होते. संयोजकांनी नाष्टा, सुरुची भोज, अल्पोपहार व जलपाणाची उत्तम व्यवस्था केली होती. जिल्ह्यात प्रथमच एवढा मोठा कार्यक्रम साजरा झाला.महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा बीड जिल्हा संपूर्ण कार्यकारिणी,गजानन डुबे,महेश रुद्रवार, संजीव डुबे,वैभव झरकर,सुमित रुद्रवार, प्रणिल चिद्रवार,अनिल चिद्रवार,नंदकिशोर बेजगमवार,संतोष रेवणवार,शशिकिरण गडम,गणेश डुबे,राजेश कौलवार,रविकिरण गडम,समीर शेटे, दत्तात्रय दमकोंडवार, सुर्यकांत महाजन, प्रकाश कामाजी,अभय भावठाणकर,भारत पिलाजी,अजय रुद्रवार, नंदकिशोर देवशटवार, भारत रुद्रवार,राम हराळे,मार्गदर्शक सर्वश्री विकासराव डुबे, माणिकराव शेेटे,अभय कोकड,नागनाथ पारसेवार यांनी उत्सव नात्यांचा हा स्नेहमिलन कार्यक्रम उत्तमरितीने होण्यासाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment