तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 April 2019

काँग्रेस- राष्ट्रवादीवाल्यांनो काल्पनिक भीती दाखवून मत मागण्याचे हत्यार आता बोथट झाले - सलीम जहाँगिर मुस्लिम समाज यावेळीही मुंडे परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा


बीड ( प्रतिनिधी ) :- काँग्रेस - राष्ट्रवादीला  सत्तेसाठी वाट्टेल ते करू लागले आहेत. भाजपच्या विरुद्ध अपप्रचार करतांना मुस्लिम समाजाला शरियतमध्ये हस्तक्षेप होईल असे सांगितले जात आहेत तर इतरांना संविधानात बदल होईल अशी काल्पनिक भीती दाखवली जात आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा काल्पनिक भीती दाखवून मत मागण्याचे हत्यार बोथट झाले आहे. गेली 70 वर्ष मुस्लिम समाजाचा केवळ मतापूरता वापर करण्याऱ्या  काँग्रेस - राष्ट्रवादीने मुस्लिम समाजावर सर्वाधिक अन्याय केला. आघाडी सरकारच्या काळात हजारो निरपराध तरूणांना दहशतवादी कारवायाच्या नावाखाली गजाआड केले होते हे मुस्लिम समाज अजूनही विसरला नाही. भाजप सरकारने मात्र मुस्लिम समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले. जातीयवाद म्हणून ओरडणाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात एक तरी जातीय दंगल दाखवावी आणि मगच बोलावे असे आव्हान देत गेल्या पंचवार्षिक प्रमाणेच यावेळी जिल्ह्यातील मुस्लिम समाज ना. पंकजाताई आणि खा.प्रितमताई मुंडे परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल असा विश्वास भाजप नेते सलीम जहाँगिर यांनी व्यक्त केला. 

भाजप - महायुतीच्या उमेदवार खा. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ सलीम जहाँगिर शहरातील प्रत्येक भागात कॉर्नर बैठका घेत आहेत. बैठकीत सलीम जहाँगिर म्हणाले , देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा भाजप सत्तेवर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खा. प्रितमताई आणि ना. पंकजाताई यांनी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणून प्रचंड विकासकामे केली आहेत. रेल्वेच्या प्रश्नाला गती दिली, जलसिंचनामुळे हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आली आहे. भाजप सरकार सुख दुःखातही जनता आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. देशात सर्वाधिक  पीकविमा बीड जिल्ह्याला मिळाला तो केवळ दोन्ही ताईंच्या पाठपुराव्यामुळे. प्रितमताई आणि पंकजाताईंच्या नेतृत्वाने लोकविश्वास मिळवला आहे. त्याच लोकविश्वासाच्या बळावर आजही जिल्ह्यातील जनता ताईंच्या पाठीशी आहे. मात्र दोन्ही ताईंना मिळत असलेली लोकप्रियता पाहून काँग्रेस - राष्ट्रवादीला भुरळ येऊ लागली आहे. त्यामुळेच त्यांनी आता लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजप सत्तेवर आल्यास शरियतमध्ये हस्तक्षेप होईल तर दलित समाज बांधवांना संविधान बदलले जाईल अशी काल्पनिक भीती दाखवली जात आहे. मात्र आता काल्पनिक भीती दाखवून मतदान मागण्याचे हत्यार बोथट झाले आहे. आजपर्यंत काँग्रेस - राष्ट्रवादीने मुस्लिम समाजाचा मतांसाठी वापर केला. गेली 70 वर्षे या समाजाला दुर्लक्षित ठेवत त्यांचे हाल केले. मात्र भाजप सरकारने मुस्लिम समाजाचा विकास केला. सत्तेतील लाभापासून समाजाचे प्रतिनिधी जाणीवपूर्वक दूर ठेवले. शासकीय योजनांपासून समाजातील प्रत्येक घटकाला वंचित ठेवले. समाजाच्या नावावर आलेल्या योजना हडप केल्या. मात्र ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे आणि खा. प्रितमताई मुंडे यांनी पासपोर्ट कार्यालय सुरू केले, अल्पसंख्याकांसाठी भरीव निधीची तरतूद केली. गोरगरीब मुस्लिम कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी योजना सुरू केली. मुद्रा योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना स्वतः च्या पायावर उभे केले. त्यामुळे जिल्ह्यातील मुस्लिम समाज 2014 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही ना. पंकजाताई आणि खा.प्रितमताई या मुंडे परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि देशाच्या संसदेत खा. प्रितमताईंचा आवाज पुन्हा एकदा बुलंद करेल असा विश्वास भाजप नेते सलीम जहाँगिर यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment