तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 7 April 2019

रावसाहेब दानवेंचे शक्तिप्रदर्शन अंगलट येण्याची शक्यताआचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार दाखल


बदनापूर / अंकुश कदम : गेल्या तीन टर्मपासून जालना लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांना आपल्या उमेदवारी अर्ज भरताना केलेले शक्तिप्रदर्शन चांगलेच अंगलट येण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे. दानवे यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक डोके यांनी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

जालना लोकसभा मतदार संघाचे भाजपकडून उमेदवार असलेले रावसाहेब दानवे यांनी २ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह आपला खाजगी वाहनाचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १०० मीटर परिसराच्या आतपर्यंत नेला होता. त्यामुळे हा वाहनांचा ताफा इतक्या आतपर्यंत नेणे, हे आचारसंहिता नियमाच्या विरोधात आहे. परिणामी, डोके यांनी दानवेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार देत गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष दीपक डोके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे केली आहे. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शेतकरी आणि जवानांना केलेल्या वक्तव्यामुळे मतदार संघात प्रचंड रोष व्यक्त होत आहे. यात आता शक्तिप्रदर्शनामुळे केलेल्या शंभर मीटर परिसरातील त्यांचा शिरकाव हा त्यांच्याच अंगलट येणार असून आता दानवे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल होईल कि नाही हे पाहणे निवडणूक विभागाच्या कारवाईवरून सिद्ध होईल. दानवेंच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर सभेतून विरोधी मुद्दे जोरदारपणे मांडले जात आहे. निवडणूक काळात दानवेंचे हे वक्त्यव्य त्यांना निर्माण करणारे ठरत आहे.

*तेजन्युज हेडलाईन*
 *प्रतिनिधी अंकुश कदम 8390515197*

No comments:

Post a Comment