तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 April 2019

दिव्यांग मतदारांच्या जनजागृतीसाठी राजेंद्र लाड यांची " जिल्हा आँयकाँन " पदी निवडबाळू राऊत जिल्हा प्रतिनिधी 
   मुंबई : दि.13 (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी,ता.आष्टी,जि.बीड येथील राज्यपुरस्कार प्राप्त प्राथमिक पदविधर शिक्षक तथा शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हा सचिव राजेंद्र लाड यांच्या शैक्षणिक,सामाजिक व राष्ट्रीय कार्याची दखल घेवून बीड चे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दि.10 एप्रिल 2019 च्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी भारत निवडणूक आयोगाने " सुलभ निवडणूका " हे घोषवाक्य स्विकारलेले असून दिव्यांग मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करुन लोकशाही बळकट करण्यासाठी सहभाग नोंदवावा या कामी बीड जिल्हास्तरावर दिव्यांग मतदारांच्या जनजागृतीसाठी " जिल्हा आँयकाँन " तथा 
" ब्रँन्ड अँम्बेसिडर " म्हणून नियुक्ती केली आहे.
      राजेंद्र लाड हे नेहमीच शैक्षणिक कामाबरोबरच सामाजिक व राष्ट्रीय कार्यात तन,मन,धनाने सहभागी होत असतात.त्यांनी बीड जिल्ह्यातील दिव्यांगांची मतदार नोंदणी व्हावी यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमातून,बैठकीतून,वर्तमानपत्रामधून,
व्हाँटसअप ग्रुप,फेसबुक च्या माध्यमातून तसेच स्वताःच्या दुचाकीवर बँनर लावून मोठ्या प्रमाणात प्रसार व प्रचार केलेला असून सध्या ते जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी 100 % मतदानाचा हक्क बजवावा यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून तसेच स्वःतच्या दुचाकीवर बँनर लावून,वर्तमानपत्रात लिखाण करुन प्रचार व प्रसार करण्याचे काम करत आहेत.
    खरोखरच स्वताःच्या दिव्यांगत्वावर मात करुन इतर दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून झगडत असतात.त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय,मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण धरमकर,सहाय्यक निवडणूक अधिकारी नम्रता चाटे,नायब तहसिलदार श्रीकांत रत्नपारखी,राजेंद्र महाजन,परमेश्वर कानडे,आष्टीचे तहसिलदार हिरामण झिरवाळ,नायब तहसिलदार निलिमा थेऊरकर,शारदा दळवी,प्रदिप पांडूळे,राजकुमार पवार,दिलीप गालफाडे,दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्यउपाध्यक्ष अशोक आठवले,जिल्हाध्यक्ष महादेव सरवदे,कोषाध्यक्ष बप्पासाहेब ढवळे,गटशिक्षणाधिकारी,
विस्तार अधिकारी, केंंद्रप्रमुख,
मुख्याध्यापक,शिक्षकवृंद,
पत्रकार मित्र आदींनी अभिनंदन करुन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment