तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 1 April 2019

खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ बँक काँलनीतील बैठकीस मतदारांचा मोठा प्रतिसादना.पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यामुळे बीड जिल्ह्यात विकासकामांना गती-कैलास फड

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यातील भागातील विकासकामांना ना. पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यामुळे गती आली असल्याने याहीवेळी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मतांनी निवडून देणार असल्याची ग्वाही  भाजपाचे युवा नेते कैलास फड  यांनी दिली. यावेळी घेण्यात आलेल्या काँर्नर बैठकीस मतदारांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे.

बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना - रासप - रिपाई महायुतीच्या उमेदवार डाॅ. प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ सोमवार दि.01 एप्रिल 2019 रोजी शहरातील बँक काँलनी भागात काँर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महिला व पुरुषांची या कॉर्नर बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मतदारांशी संवाद साधला. डॉ. प्रितमताई मुंडे यांना आपल्याच गल्लीतुन मताधिक्य देण्यासाठी पदाधिकाऱ्यां मध्ये स्पर्धा निर्माण झाली असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाचे कैलास फड  यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला मोठ्या प्रमाणात याभागातुन मतांची आघाडी मिळत असते.

      भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ निमित्ताने बैठकीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसादाने मिळाला. दि. १८ एप्रिल रोजी मतदानातून व्यक्त करून आपले आशीर्वाद डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे करा असे आवाहन फड यांनी यावेळी केले.
याप्रसंगी भाजपा युवा नेते कैलास फड, प्रा.अतुल दुबे, शिवाजी मुंडे, बाळू खाडे, मुंडे मामा, महादेव मुंडे ,माऊली फड, बळीराम कराड, महादेव ढाकणे, बापू मुंडे, दत्ता मुंडे व गल्लीतील खा.डॉ.प्रितमताई वर प्रेम करणाऱ्या महिला मंडळ यांच्या सह मोठ्या संख्येने उपस्थित होते .

No comments:

Post a Comment