तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 April 2019

ना. पंकजाताई मुंडे यांच्या उद्या नंदागौळ, पट्टीवडगांव, धर्मापूरी येथे सभानागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. १३----- बीड लोकसभेच्या भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-रयत क्रांती सेनेच्या उमेदवार खा.डॉ.प्रितमताई यांच्या प्रचारार्थ राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या उद्या रविवारी नंदागौळ, पट्टीवडगांव, धर्मापूरी येथे जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

      ना. पंकजाताई मुंडे यांच्या महाराष्ट्रात झंझावाती सभा होत आहेत. त्यांच्या सभांना चोहीकडे प्रचंड मागणी आहे आणि मोठा प्रतिसादही मिळत आहे. उद्या रविवारी १४ एप्रिल रोजीही ना. पंकजाताई मुंडे यांच्या अनेक ठिकाणी सभा होणार आहेत. त्यांचा उद्याचा दौरा पुढीलप्रमाणे सायंकाळी ६ वा. नंदागौळ, संध्याकाळी ७.३० वा. पट्टीवडगांव आणि रात्रौ धर्मापूरी  येथे त्यांच्या सभा होणार आहेत.

     या सभांना परिसरातील मतदारांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनभाजपा-शिवसेना-रिपाइं-रासप-रयत क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment