तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 16 April 2019

पालम येथे श्री हनुमान जयंती निमित्य अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन
अरुणा शर्मा


पालम :- या संत भुमीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जयंती निमीत्य अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी परायण व किर्तन सोहळा आसे विविध कार्यक्रम आयोजत करण्यात आले आहे. या सोहळयाची सुरुवात दि. 13 एप्रिल रोजी होणार आहे. तर सांगता दि. 19 एप्रिल रोजी आहे. तरी या सात दिवसात किर्तनकार श्री ह.भ.प. जगदीश महाराज सोनवणे बीड, श्री ह.भ.प. दिपक गुरु पांगरेकर भागवताचार्य, श्री ह.भ.प.भागवताचार्य शिवाजी बोकारे आळंदी, श्री ह.भ.प. भागवताचार्य वामन महाराज पालमकर, श्री ह.भ.प. शिवचरित्रकार किशोर महाराज ठाकुर आळंदी, श्री ह.भ.प. रामायणाचार्य रोहिदास मस्के यांचे किर्तन होणार आहे. दि. 19 एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सवा निमीत्य भजन कथा आणि गुलाल सुर्योदयाला अर्पण करण्यात येईल. त्यानंतर सकाळी 10 वाजता पालम नगरीतून भव्य दिंडी सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. नंतर पुजेचे किर्तन दुपारी 1 ते 3 श्री गुरुवर्य नारायण महाराज पालमकर यांचे होईल. किर्तनानंतर महाप्रसादाजे आयोजन केले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गांवकरी मंडळी पालम यांनी केले आहे. कार्यक्रमाचे स्थळ श्री हनुमान मंदिर, श्री विठल रुक्मिणी मंदिर पालम

No comments:

Post a Comment