तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

पाथरी-माजलगाव महामार्गावर जीप-स्विफ्ट डिझायर ची समोरा-समोर धडक;एक ठार,अकरा जखमी;चार गंभिर
प्रतिनिधी
पाथरी:-शहरातून माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गा वर आष्टी फाट्या पासून एक दिड किमी अंतरावर बुधवार १० एप्रिल रोजी सायंकाळी साडे चारच्या सुमारास टाटा पॅशिओ क्र एम एच २३ इ ५३४४ आणि स्विप्ट डिझायर क्र एम एच २४ व्ही-८७८९ यांची समोरा समोर जोरदार धडक होऊन यात एकजन जागीच ठार झाला तर अकराजन जखमी झाले असून यात चार जन गंभिर जखमी झाले आहेत.
 टाटा पॅशिओ गेवराई हुन पोहरा देवी साठी जात होते तर स्विप्ट डिझायर ही केज कडे जात होती हा अपघात समोरा समोर झाल्याने या विषयी पाथरी ग्रामिण रुग्णालयातून मिळालेल्या माहिती नुसार स्विप्ट चालक लिंबाजी बन्सी चाटे वय ३५ रा तांबवा ता केज हे जागीच मृत पावले तर जातेगाव ता गेवराई येथून टाटा पॅशिओ मधिल बाबासाहेब गेम जाधव वय ३६ ,जिजाबाई काला राठोड ४८ कमलबाई बालासाहेब जाधव ५०  गेवराई, मालाबाई उत्तम पवार ५० जातेगाव हे चार जन गंभिर जखमी असून अतुल बालासाहेब जाधव १४,रत्नमाला प्रकाश ढोरमारे २०, शुभम रोहीदास पवार १२,,स्वप्निल रेहिदास पवार ८, शामल रेहिदास पवार ३६, काला गवा राठोड ६१ साकरळ, बप्पासाहेब पांडूरंग खंडागळे ५२ गेवराई हे जखमी असून सर्व जखमींना उपचारा साठी परभणी कडे पाठवले आहे. अपघाताची माहीती मिळताच रामप्रसाद कुटे,प्रताप शिंदे,अमोल शिंदे यांच्या सह अन्य काहींनी जखमींना तात्काळ पाथरी ग्रामिण रुग्णालयात आणण्या साठी मदत केली.

No comments:

Post a Comment