तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 16 April 2019

लेकीच्या विजयासाठी बंजारा समाजाची वज्रमुठ


ना. पंकजाताई मुंडेंच्या उपस्थितीत कौठळी तांडा येथे  जिल्हयातील बंजारा बांधव भर पावसात एकत्र ; ज्येष्ठांसह युवकही सरसावले 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. १५ ------- भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी जिल्हयातील संपूर्ण बंजारा समाज बांधवांनी वज्रमुठ बांधली आहे. 
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत आज कौठळी तांडा येथे समाजातील ज्येष्ठ नागरिकांसह युवक हजारोंच्या संख्येने भर पावसात एकत्र आले होते. 

   जिल्हयातील विविध प्रचार सभा आटोपून ना  पंकजाताई मुंडे यांनी संध्याकाळी तालुक्यातील कौठळी तांडा बंजारा समाज मेळाव्यास हजेरी लावली, याठिकाणी जिल्हयाच्या काना कोप-यातून ज्येष्ठांसह युवा कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अचानक पाऊस सुरू झाला पण ना. पंकजाताई मुंडे यांचे भाषण ऐकायचे म्हणून कोणीही मागे हटला नाही. बंजारा समाजाचे प्रेम पाहून त्या ही भारावून गेल्या.

  लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना बंजारा समाज आपला नेता मानतो. उप मुख्यमंत्री असताना त्यांनी बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवीचा मोठ्या प्रमाणात विकास केला होता, त्यांच्यानंतर आता ना. पंकजाताई मुंडे यांनी सरकार दरबारी प्रयत्न करून या तीर्थक्षेत्रासाठी १२५ कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे, यातील २५ कोटी रुपये आर्थिक तरतूदही केली आहे. समाज बांधवांनी याबद्दल त्यांचे आभार मानले. 

लेकीच्या विजयासाठी वज्रमुठ
-----------------------------
ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी समाज बांधवांच्या पाठिशी मी नेहमीच खंबीरपणे उभा असते, भविष्यातही तुमच्या प्रश्नांसाठी कुठेही कमी पडणार नाही असे सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये समाजाला प्रतिनिधीत्व देऊ असे त्या म्हणाल्या. मुंडे साहेबांची लेक ही सगळ्या समाजाची लेक आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दोन्ही ताईना ताकद देण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू असा शब्द देऊन या निवडणूकीत डाॅ. प्रीतमताई मुंडे यांना मोठे मताधिक्य मिळवून देऊ अशी वज्रमुठ उपस्थित समाज बांधवांनी बांधली. 

बंजारा महिलांसोबत भाजी भाकरीचा आस्वाद
-----------------
ना. पंकजाताई मुंडे यांचे बंजारा महिलांनी पारंपारिक पद्धतीने यावेळी जोरदार स्वागत केले. याप्रसंगी महिलांसोबत जमिनीवर बसून त्यांनी भाजी भाकरीही खाल्ली. मंत्री पद व नेत्याचे सर्व सोपस्कार बाजूला ठेवून अतिशय मनमोकळेपणाने त्या समाज बांधवांमध्ये रममाण झाल्या, त्यांचा हा साधेपणा बंजारा महिलांनाही भावला. 

   मेळाव्याचे प्रास्ताविक पप्पू चव्हाण यांनी केले तर संतोष राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी माजी आमदार गोविंदराव केंद्रे, देविदास राठोड, भाऊराव चव्हाण, गोपीनाथ पवार, बी. एम. पवार, दिलीप जाधव, वसंत राठोड, रमेश पवार जीवन राठोड, सुशील पवार, नरेंद्र राठोड, जातेगांवचे राजाभाऊ चव्हाण, रमेश राठोड, विलास राठोड आदींसह असंख्य बांधव उपस्थित होते. काळवटी तांडा येथील काॅग्रेसचे कार्यकर्ते  अजित चव्हाण यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला, त्यांचे ना. पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले.

No comments:

Post a Comment