तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 April 2019

ना. पंकजाताई मुंडेंनी आपल्या जबरदस्त वक्तृत्वाने पाटोद्यात जिंकली मतदारांची मनं
विकास कामे, राजकारण, जातीपातीच्या परखड भूमिकेवर जनता झाली प्रभावित

बीड (प्रतिनिधी) :- दि. ११ ------ मागील पांच वर्षात जिल्हयात केलेली कोट्यवधी रुपयांची  विकास कामे, इथले राजकारण आणि निवडणूकीत होत असलेला जाती पातीचा प्रचार या भूमिकेवर आपल्या भाषणात अतिशय स्पष्ट व परखड मत व्यक्त करत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज पाटोदा ममदापूर येथील सभेत मतदारांची मनं जिंकली, त्यांच्या भाषणाने प्रभावित झालेल्या ग्रामस्थांनी या निवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

   अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर हे मराठा समाजाची सर्वाधिक लोकसंख्या असलेले गांव..या गांवात आज ना. पंकजाताई मुंडे यांची मोठी सभा झाली. त्यांच्या सभेविषयी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती, शिवाय त्यांचे भाषण ऐकण्यासाठी महिला व आबालवृद्धांनी उशीर होऊनही सभेला प्रचंड गर्दी केली होती. ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणात जिल्हयाचा विकास, राजकारण आणि जातीपातीच्या मुद्यांवर परखड मतं मांडली. खा. प्रीतमताई मुंडे यांनी त्यांच्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यात हजारो कोटींचे राष्ट्री महामार्ग आणले, रेल्वे बीडच्या वेशीत आली आहे. बीड जिल्ह्यात आलेली विकासाची गंगा पाहून सैरभैर झालेल्या विरोधकांकडे आता मुद्देच उरले नाहीत त्यामुळे ते जाती-धर्माची ढाल पुढे करत आहेत. मी गांवा गावांत निधी देतांना कधी जात पाहिली नाही. इथली ग्रामपंचायत माझ्या ताब्यात नाही तरी सुद्धा मी भरभरून निधी दिला. कारण जातीचे राजकारण मला मान्यच नाही. तुम्ही सुद्धा अशा राजकारणाला थारा देऊ नका असे त्या म्हणाल्या. 

उप सरपंच म्हणाले, बारामतीच्या नेत्यांनी समाजाचा विकास केला नाही
--------------------------------
उप सरपंच गोविंद जामदार यांनी तर यावेळी जनतेचे डोळे खाडकन् उघडले. ते म्हणाले, जाती साठी माती खा, असं बारामतीच्या पुढा-यांनी आतापर्यंत आम्हाला शिकवलं, मात्र असं सांगणा-या लोकांनीच आपल्या समाजाचा विकास केला नाही, मागास ठेवलं. इतकी वर्षे आम्ही त्यांच्या पाठीमागे राहिलो पण खरा विकास काय असतो हे पंकजाताई यांनी बीड जिल्हयाला दाखवून दिले. विकास निधी देतांना कुठलाही जातीभेद अथवा भेदभाव त्यांनी केला नाही म्हणून आमच्यासारख्या बहूजनांतील लाखो तरूणांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचे ठरवले आहे. समाजातील तरूणांच्या मनातील भावनाच एक प्रकारे त्यांनी आपल्या भाषणातून जनतेसमोर मांडल्या.

No comments:

Post a Comment