तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 31 May 2019

हवामान विभागावर कारवाई करा,पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र


प्रतिनिधी- भोकरदन

हवामान विभागाच्या चुकीच्या मान्सूनच्या अंदाजामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे दरवर्षी आर्थिक नुकसान होत असल्याने भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्पीड पोस्टाने पत्र पाठवून हवामान विभागावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच दुसऱ्यांदा पंतप्रधान पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन सुद्धा पत्राद्वारे केले आहे.त्यामध्ये सीमेवरील जवानांना ,शेतकऱ्यांना, वंचीताना योग्य न्याय मिळावा अशी माफक अपेक्षा व्यक्त केली आहे. पंतप्रधान कार्यालयाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की,मागील वर्षीच्या महाराष्ट्रातील हवामान विभागाने दिलेल्या चुकीच्या मान्सूनच्या अंदाजामुळे शेतकरी सुखावला होता.या अंदाजाच्या आधारे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची तयारी केली.बँकेकडून व खाजगी सावकारांकडून बी-बियाणे आणि खते आणण्यासाठी भांडवल आणले. मात्र हवामान विभागाने मराठवाड्यासाठी व्यक्त केलेला अंदाज साफ चुकला.सद्यपरिस्थितीत मराठवाड्याचा दुष्काळवाडा झाला आहे. सोयबिन, कापूस,तूर ही सगळी पिके पावसाअभावी दरवर्षी वाया जात आहे.यामध्ये दुबार पेरणी होत असल्याने कृषिविक्रेत्यांना फायदा तर शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.शेतकरी वर्ग देशोधडीला लागत असून शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.त्यामुळे चुकीचे अंदाज सांगणाऱ्या पुणे येथील हवामान विभागावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे.

परळीचे बि.एस.एन.एल. कार्याल्य पाच दिवसा पासून चालतेय डिझल इंजिनवर


महावितरणने थकबाकी मुळे तोडला  विद्युत पुरवठा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील भारत दुरसंचार निगमच्या परळी कार्याल्याचे 4लाख 80 हजार रू. विद्युत भाडे थकल्यामुळे  महावितरणने त्यांचे विद्युत कनेक्शन दि.27 मे रोजी कट केल्याने हे कार्याल्य सोमवार पासून चक्क डिझेल इंजिनवर सुरु ठेवून ग्राहकांना सेवा दिली जात आहे.
  परळी  येथील भारत दुरसंचार कार्यालय नेहमी कुठल्यान कुठल्या कारणाने चर्चेत असते.  तर चक्क या कार्यालयाचा विद्युत पुरवठा भाडे थकल्याने बंद करण्यात आला.शासकीय कंपनी आसतांना विद्युत पुरवठा तोडला गेल्याने ग्राहकातुन आश्चर्य व्यक्त होत असून अगोदरच खाजगी कंपन्यांशी स्पर्धा करत कसेबसे आपले अस्तित्व टिकवून ठेवलेल्या दुरसंचार कंपनीच सरकारला बंद करायची की काय असा सवाल ग्राहक उपस्थित करत आहेत. दुरसंचार ही शासकीय कंपनी असल्याने विद्युत बिल हे जिल्हा कार्याल्यातुन उपलब्ध फंड नुसार नियमित भरले जाते माञ या गत महीन्यातील बिल जिल्हा कार्याल्याने न भरल्याने महावितरणने ही कारवाई केली असून पाच दिवस होवून गेले तरी बिल अदा करण्यात   आले नसल्याने परिस्थिती जैसे थे आहे.विद्युत पुरवठा तोडल्या पासून हे कार्यालय चक्क सारखे डिझेल इंजिनवर चालु ठेवण्यात आले असून तासभरासाठी 10 लिटर डिझल जाळले जात आहे.येथील यंञणा कायम चालु ठेवण्यासाठी हे इंजिन कायम चालु ठेवण्यात येत आहे.त्यामुळे 24 घंट्यासाठी 240 लिटर डिझेल टाकून ग्राहकांना सेवा पुरविली जात असून बिल भरणा करण्या बाबत जिल्हा कार्याल्याकडून तत्परता दाखवली जात नसल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांना परिपूर्ण पोषक आहाराविषयी अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना


डॉ. पल्लवी दराडे 
बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई,  : आरोग्यपूर्ण जीवनशैलीत आहार हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. संतुलित आहार आणि सुरक्षित आहाराची उपलब्धता याविषयी जागरुकता विद्यार्थ्यांमध्ये कमी झालेली आहे. त्यामुळे आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने शालेय मुलांसाठी पोषक, पौष्टिक, स्वच्छ आणि सुरक्षित अन्न कसे देता येईल या उद्देशाने विशेष कार्यक्रम तयार केला आहे. त्याप्रमाणे मार्गदर्शक सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.
उच्च न्यायालय, दिल्ली येथे रिट पिटीशन क्रमांक 8567/2010 मध्ये दिलेल्या मार्गदर्शनपर आदेशानुसार भारतातील सर्व शाळांमधील मुलांना परिपूर्ण आणि पोषक आहार तसेच अन्न सुरक्षितता, स्वच्छता याबाबत अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, दिल्ली यांनी Guidelines for Making Available Wholesome and Nutritious Food to School Children तयार केल्या आहेत. त्याबाबतची माहिती अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शाळा व कॉलेज तसेच मुलांचे पालक यांना School & College Food Project पूर्णत्वास नेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ज्या अन्न पदार्थांमध्ये मेद, मीठ व साखर जास्त प्रमाणात असते अशा अन्न पदार्थांना HFSS (High Fat, Sodium & Sugar) अन्न पदार्थ म्हणतात. जास्त साखर खाल्ल्याने स्थूलपणा, मधुमेह इ. आजार बळावतात. मुलामुलींचे वजन वाढणे (लठ्ठपणा) व अति मीठ सेवनाने हा आजार बळावतो. HFSS (High Fat, Sodium & Sugar) घटक पदार्थ असलेले अन्न पदार्थांचे बाजारात आकर्षक जाहिरातींद्वारे सहजपणे कमी किंमतीत पॅकिंगमध्ये उपलब्ध होत असल्याने मुलांमुलीमधील खाण्याच्या सवयी बदलत आहेत. त्यामुळे कर्बोदके/प्रथिने व इतर आवश्यक घटक पदार्थ जे नैसर्गिकरित्या (फळे/भाजीपाला) व घरी बनविलेले ताजे अन्न पदार्थ मुलामुलींना मिळत होते त्याचे प्रमाण कमी झालेले आहे.
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे त्याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी शाळांमध्ये करण्यासाठी शासनाने दिनांक 3 मे 2019 रोजी मंजुरी दिलेली आहे.
अभ्यासाबरोबरच मुलांना परिपूर्ण आहार मिळणे आवश्यक असल्याने खालील संदेश दिला आहे.बर्गर, पिझ्झा, चॉकलेट, आईसक्रीम, फ्राईज इ.
थोडक्यात खा
Stringently
खाद्यतेल, फॅट, मिट, फिश, अंडी इ.
साधारणपणे खा
Moderately
फळे भाज्या
जास्त प्रमाणात खा
Liberally
कडधान्ये, तृणधान्ये, दूध
नियमित पुरेशा प्रमाणात खा
Consume Adequately
असा संदेश दिला जाणार असून त्याप्रमाणे शाळांच्या उपाहारगृहामधून पुरविल्या जाणाऱ्या/विक्री केल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा व लहान मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लठ्ठपणा (Obecity) कमी करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग सचिव डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम महाराष्ट्र राज्यात राबविला जात आहे.

ना. पंकजाताई मुंडे यांनी अहिल्यादेवींच्या चौंडीत तरूणांमध्ये जागवली 'नव चेतना'

समाजातील वंचितांसाठी लढणा-या तरूणांनी जातीभेद झुगारून काम करावे

अलोट गर्दीच्या साक्षीने पार पडला  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९४ वा जयंती समारोह

चौंडी (अहमदनगर)  (प्रतिनिधी) :- दि. ३१ ----- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी जे कार्य केले ते खूप मोठे आहे, त्यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करतांना आजच्या तरूणांनी समाजाच्या हितासाठी कांही करायचेच असेल तर जातीभेदाच्या भिंती तोडून एकजुटीने काम केले पाहिजे. पाठीवर जबाबदारीचं ओझं समजून पुढे  आले पाहिजे, यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेऊन काम करण्याची गरज आहे, मी सुद्धा  तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी  असेल अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज चौंडी येथे तरूणांमध्ये 'नवचेतना' जागवली.

   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९४ वा जयंती समारोह त्यांची जन्मभूमी असलेल्या चौंडी येथे आज मोठ्या उत्साहात व अलोट जनसागराच्या साक्षीने पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. गणपतराव देशमुख तर प्रमुख पाहूणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती खा. संभाजीराजे भोसले, जलसंधारण मंत्री तथा स्वागताध्यक्ष प्रा. राम शिंदे, खा. विकास महात्मे, अण्णा डांगे, आ. मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डीले, रामराव वडकुते, रमेश शेंडगे, बबनराव पाचपुते, आ. भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, गोपीचंद पडाळकर आदी  उपस्थित होते.

   पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, लोकनेते मुंडे साहेबांनी आयुष्यभर तळागाळातील सर्व सामान्य माणसासाठी काम केले, तेच काम मला पुढे न्यायचे आहे. वंचितांसाठी काम करतांना आम्ही कधीच राजकीय जोडे घातले नाहीत, नेहमी त्यांचेसाठी लढलो आणि लढत आहोत. समाज हितासाठी कांही करायचे असेल तर तरूणांनो जातीच्या भिंती झुगारा, राजकीय जोडे बाजूला ठेवा, जबाबदारीचं ओझं समजून पुढे या असे आवाहन त्यांनी केले. समाज हितासाठी तुम्ही कांहीतरी चांगले काम करत असाल तर मी ही तुमच्यासोबत आहे असेही त्या म्हणाल्या. धनगर समाजासाठी काम करणा-या गोपीचंद पडाळकर यांचे यावेळी त्यांनी कौतुक केले.

आरक्षणासाठी केंद्राचा अहवाल सकारात्मक
----------------------
काॅग्रेस राजवटीत धनगर समाजाला आरक्षण मिळू शकले नाही, धनगड चा धनगर करण्यात सत्तर वर्षे त्यांनी  घातली. परंतू आम्ही सत्तेवर येताच धनगर समाजाला न्याय देण्यासाठी आदिवासींच्या सवलती देण्याचा निर्णय घेत धनगर व धनगड हे दोन्ही एकच आहेत यासाठी टीसचा अहवाल मागितला. त्यांनीही सकारात्मक अहवाल दिला त्यानुसार  केंद्र सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे त्यामुळे आरक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे असा विश्वास देत ना. पंकजाताई मुंडे यांनी यासाठी राजकीय इच्छाशक्ती जपून ठेवण्यासाठी राजकीय शक्तीचीही गरज असल्याचे म्हटले.

हे ॠण जनतेचे ; सेवेत कमी पडणार नाही
-----------------------
लोकसभा निवडणुकीत तुम्ही आम्हाला देशात व राज्यात भरभरून मतं दिली. डाॅ. प्रितमताई मुंडे यांचाही बीडमध्ये मोठा विजय झाला. केंद्रात पुन्हा आम्ही सत्तेवर आलो, त्यामुळे तुमचे प्रत्येक मत हे आमच्यावर ऋण आहे, हे ऋण फेडायचे असेल तर तुमचे जीवनमान चांगलं करणं हे आमच्या प्रत्येक नेत्याचं कर्तव्य आहे. जनतेची सेवा करत राहणे हेच अहिल्यादेवीचे ध्येय होते आणि त्याच वाटेवर चालून मी सुद्धा आयुष्यभर जनतेची सेवा करण्यात कमी पडणार नाही असे त्या म्हणाल्या.

शपथविधीच्या वेळी मुंडे साहेबांचा चेहरा डोळ्यासमोर आला..
------------------------
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याची आठवण सांगताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, काल मी दिल्लीला गेले खरी परंतु शपथविधी सोहळ्यासाठी आंत जाण्याची हिंमत झाली नाही, कारण वंचित पिडित घटकांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर लढणारे मुंडे साहेब नाहीत, हे पाहून त्यांचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. जीवनात आता कमवायचे कांही राहिले नाही, कमवायचे आहे ते फक्त तुमचे आशीर्वाद व तुमचे उत्थान करण्यासाठी छोटेसे योगदान असे त्यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या भावनांना प्रतिसाद दिला.

   प्रारंभी ना. पंकजाताई मुंडे यांचे चौंडीत हेलिकाॅप्टरने आगमन झाले. व्यासपीठावर येण्यापूर्वी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे दर्शन घेतले. प्रा. राम शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्यभरातून धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने समारोहाला उपस्थित होता.

धनंजय मुंडेंच्या परळी येथील रोजा इफ्तारी कार्यक्रमास मोठा प्रतिसाद
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि.31....... विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आज परळी येथील लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे नटराज रंगमंदिर येथे आयोजित मुस्लिम बांधवांसाठीच्या रोजा इफ्तारीच्या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला.

सायंकाळी 07 वाजता धनंजय मुंडे यांनी मुस्लिम बांधवांना फळे व खजुर देऊन त्यांचा उपवास सोडला. रमजान महिन्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन सामाजिक एकता, बंधुता आणि प्रेम कायम रहावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. परळीतील मुस्लिम बांधवाच्या वतीने ही धनंजय मुंडे यांचा फरची टोपी, गमछा देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष आय्युब पठाण, सोमनाथअप्पा हालगे, भैय्या धर्माधिकारी, वाल्मिकअण्णा कराड, शकील कुरेशी, अजीज भाई,  राजभाई, जाबेरखॉं पठाण, शरीफ भाई, चंदुलाल बियाणी, अन्वर मिस्कीन, शेख शम्मो, सुरेश टाक, केशव बळवंत, किशोर पारधे, जयराज देशमुख   रवी मुळे, एलियासभाई, जब्बार सर, रहमान कुरेशी, मंजित सुगरे, शंकर कापसे, सय्यद जमिल अध्यक्ष, वाजेद भाई, तोफिक कच्छी, अकबर काकर, रज्जाक कची, युनूसभाई डिघोळकर, लालाखान पठाण, अल्लाउदीन गुत्तेदार, हाजीदुले पाशा रईसभाई, सिराजभाई, अल्ताफ पठाण, अथर खतीब, विनोद जगतकर, संजय फड, अल्पसंख्याक अध्यक्ष नाजेर भाई, शरद चव्हाण, ज्ञानेश्वर होळंबे, जयदत्त नारवटे आदींसह मुस्लिम समाज बांधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपजिल्हाधिकार्‍यांनी पकडलेला वाळूचा टिपर गायब; पोलिसांत गुन्हा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- 
परळीचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्या पथकाने परळी व परिसरातुन अवैधरित्य वाळुची वाहतुक करणार्‍या टिप्परवर कारवाई करत तहसील कार्यालयाच्या आवरात जमा केला. परंतु रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने कौतवालास धमकी देत हा टिप्पर तहसिल कार्यालयातुन गायब केला. याबाबत परळी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असुन हा टिप्पर मालकाने गायब केला की अज्ञात चोरट्यांनी लंपास केला याचा तपास पोलिस करत आहेत. 
परळी व परिसरातुन गंगाखेड, पोहनेर, सोनपेठ, डिग्रस आदि भागातुन गोदावरीच्या पात्रातील वाळुची अवैधरित्या उपसा करुन वाहतुक केली जाते. सर्रास पणे होत असलेल्या या वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असते. परंतु दि.30 मे रोजी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्या पथकाने शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ अचानक वाळुचा टिपर पकडला कुठलाही नंबर नसलेल्या या टिप्परची चौकशी केली असता सदरील वाळु अवैधरित्य वाहतुक केली जात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा टिप्पर तहसील कार्यालयाच्या आवारत आणण्यात आला. या टिप्पर मध्ये 469.7 ब्रास वाळु होती. सदरील वाळुची किंमत 24 हजार रु. असुन कारवाई नंतर तहसिल कार्यालयात लावण्यात आलेला हा टिप्पर रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींने हालविला यावेळी रात्रपाळीच्या कामांवर असलेले कौतवाल संतोष गित्ते यांनी त्यास हटकले परंतु कौतवालास दम देत हा टिप्पर तहसिल कार्यालयातुन पळवून नेला. उपजिल्हाधिकार्‍यांच्या पथकाने जप्त केलेला हा वाळुचा टिप्पर मालकाने पळवुन नेला की अज्ञात व्यक्तींने चोरुन नेला याचा तपास करण्याचे आवाहन पोलिसांपुढे असुन याबाबत परळी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द 379, 353, 427  भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरचा तपास परळी शहर पोलिस ठाण्याचे पो.नि.देविदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय.डोंगरे हे करत आहेत. 
********
प्रशासकीय इमारतीची सुरक्षा रामभरोसे 
परळीच्या प्रशासकीय इमारती मध्ये तहसील, उपजिल्हाधिकारी कार्यालयासह रजिस्टर कार्यालया, भुमि अभिलेख अशी महत्वाचे कार्यालय असतांना या इमारतीच्या सभोवताली असलेले तारेचे कुंपन कोलमडुन गेले आहे. तसेच इमारतीच्या समोरील प्रवेशद्वाराचे दोन्ही गेट निकामी असुन  24 तास उघडेच असतात. यामुळे कारवाई करण्यात आलेली वाहने किंवा अन्य वस्तु गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. जप्त केलेल्या वस्तु अथवा वाहने गायब झाल्यानंतर कारवाई मात्र कामावंर असलेल्या कौतवालांवर केली जात आहे.

परळी पत्रकार संघाची दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलला भेट !


 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  आज परळी पत्रकार संघाच्या सदस्यांनी परळी - बीड रोडवर स्थित दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल कॅम्पसला भेट दिली . CBSE पॅटर्नच्या शाळेच्या येत्या 2 जून 2019 रविवारी रोजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होणार आहे . या निमित्ताने पत्रकार संघाची भेट आयोजित करण्यात आली होती .
                 या शाळाभेटी दरम्यान प्रिंसिपल श्री . तेजेश कुमार यांनी पत्रकारांना शाळेचा परिसर , गणित लॅब , विज्ञानप्रयोग शाळा , कॉम्प्युटर लॅब , इंग्लिश लॅब , इन्ट्रॅकटिव्ह लरनिंग  इत्यादी सुविधा दाखवल्या . शाळा भेटी दरम्यान विविध प्रसार माध्यमांचे सदस्य यावेळी उपस्थित पत्रकार लक्ष्मन वाकडे दैनिक सकाळ , संजय खाकरे , दैनिक लोकमत , रविंद्र जोशी दैनिक पुढारी , प्रकाश सुर्यकर दैनिक दिव्यअग्नी , धनंजय आढाव दैनिक दिव्यमराठी , रामप्रसाद शर्मा दैनिक पार्श्वभूमी , रामप्रसाद गरड दैनिक वैद्यनाथ वार्ता , दिलीप जोशी , मोहन व्हावळे पी . सी . न . न्युज , संजीव रॉय दैनिक कार्यारंभ , सुकेसिनी नाईकवाडे सुदर्शन चॅनेल , प्रेमनाथ कदम दैनिक सूर्योदय , संतोष जुजगर दैनिक रणझुंजार , रानबा गायकवाड दैनिक सम्राट , अनंत गित्ते दैनिक लोकमंथन , धिरज जंगले चंपावती पत्र , महादेव गित्ते दैनिक अभिमान , गणेश आदोडे दैनिक सरकार , शेख मुकरम दैनिक सिटीझन , कैलास डुमने रणधुमाळी , भगवान साकसमुद्रे दैनिक मूलनिवासी , शेख बाबा दैनिक जंग , बालाजी ढगे बीड अक्षरधाम , आत्मलिंग शेटे परळी समाचार , बालासाहेब फड दैनिक सोमेश्वर साथी आदी पत्रकार उपस्थित होते

कोथरुळ मध्ये चोरांचा धुमाकुळ एकाच रात्री तीन घरे फोडली ; लाखो रुपयांची नगद रोकड सह सोने लंपासपरळी वैजनाथ / सिरसाळा (प्रतिनिधी)  :- माजलगाव तालुक्यातील कोथरुळ या गावी चोरांनी धुमाकुळ घातला आहे. एकाच रात्री तीन घरे फोडून  लाखो रुपयांची नगद रोकड सह सोन्याची दागीणे लंपास केल्याची घटना घडली आहे.  या प्रकारा मुळे कोथरुळ व परिसरातील नागरिकां मध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. याविषयी सविस्तर वृत्त असे कि  , दिनांक ३१ रोजी शुक्रवार मध्यरात्री अंदाजानुसार  १ वाजता ते पहाटे  ३ वाजता च्या दरम्यान कोथरुळ येथील शिवाजी आश्रूबा चोपडे, कल्याण राधाकिसन मोहिते, महादेव रामराव गायकवाड यांच्या  घरी चोरट्यांनी डल्ला मारला. उन्हाळा असल्याने या तिन्ही घरचे माणसे छतावरती झोपली होती. याचाच फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. शिवाजी चोपडे यांच्या घरात लोखंडी गेटचे कुलुप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत रोख नगद १ लक्ष १हजार रुपये सह ५ ग्रामच्या दोन  अंगुठ्या , ६ ग्रामचे झुबंर, ५ ग्रामचे सिवन पिस ५ ग्राम , सर्व मिळून २ तोळा १ ग्राम दागिने  चोरी करुन दुस-या दरवाज्यातून बाहेर पडले, जवळच असलेल्या कल्याण मोहिते यांच्या घरात समोरच्या दरवाज्याची आतील कडी लोखंडी सळीने तोडून आत प्रवेश करत रोख नगद ७१ हजार रुपये सह १ तोळे सोन्याची दागिने  चोरी करुन दुस-या दरवाज्यातून बाहेर पडले, या ठिकाणाहून जवळच असलेल्या महादेव गायकवाड यांच्या घरातही दरवाज्याची आतील कडी लोखंडी सळीने तोडून आत प्रवेश करत गंठन  ५ ग्राम ,झुबंर ५ ग्राम, मनी ३ ग्राम दागिण्यासह  रोख  १ हजार रुपये ऐवज लाबंवला. तिन्ही ठिकाणचा रोख व दागिणे  मिळून ३ लक्ष ९५ हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. घटना घडल्यापासुन काही वेळातच हा प्रकार  संबधीत घर मालकांच्या निदर्शनास आला.  गावभर वा-या सारखी बातमी पसरली सकाळी सिरसाळा पोलिस स्टेशन चे पोलिस उप.नि. मेंडके, बेद्रे, एएसआय गडदे,  पोकाॅ. घोसले यांनी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला. वरिष्ठ अधिका-यांना या बाबत कळवत पुढील कार्यवाही केली. यातील शिवाजी आश्रूबा चोपडे यांच्या फिर्यादी वरुन सिरसाळा पोलिस स्टेशन येथे कलम ४५७ ,३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            पो. उपाधीक्षक डिसले, एडीएस, स्वाॅन पथक, फाॅरेंसीक यांची भेट व पाहणी  : - 
              पोलिस प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत वेगाने सुत्र हलवली. पोलिस प्रशासनाचे फाॅरेंसीक लॅब पथक यांनी भेट देऊन पाहणी करुन चोरट्यांनी हाताळलेल्या काही वस्तू ताब्यात घेतल्या , स्वाॅन पथकाने भेट दिली, एडीएसच्या पथकाने भेट देऊन तपासाच्या दृष्टीने सुत्र हलवली तसेच माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डिसले यांनी भेट दिली. बारकाने पाहणी करत तीन्ही  घटनास्थळी भेटी दिल्या. 


    .....आणि राॅकी धावला ३०० मिटर पर्यंत  : स्वॅन पथकातील राॅकी नामक स्वॅन घटनास्थळा पासुन सुमारे ३०० मिटर पर्यंत संबधीत दिसेने धावला. नागरिंचा जो अंदाज होता कि, चोरट्या  ' ह्या' मार्गाने आले / गेले त्याच मार्गाने राॅकी धावला. राॅकी प्रथम मोहिते यांच्या घरा पासुन ते गायकवाड यांच्या घरात धावला व तिथुन पोहनेरला/ डिग्रस ला जाण-या कच्च्या रस्त्या पर्यंत गेला. यावरुन असे निश्चित समजले कि, चोरटे याच मार्गाने आले/ गेले असावेत.

लिंबुटा येथे सादग्राम निर्मिती प्रशिक्षण शिबिर संपन्न गाव विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  साद माणुसकीची फाउंडेशन पुणे, संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था लिंबुटा, ग्रामपंचायत लिंबुटा यांच्या संयुक्त विद्यमाने परळी तालुक्यातील मौजे लिंबुटा येथे  28 ते 30 मे 2019 दरम्यान तिन दिवशीय सादग्राम निर्मिती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
सादमाणूसकीची फाउंडेशन पुणेचे संस्थापक अध्यक्ष श्री हरीश बुटले, इन्फंट इंडिया बीड चे श्री दत्ताभाऊ व सौ संध्याताई बारगजे ,गेवराई चे श्री संतोष गरजे सादमाणुसकीची फाउंडेशन लातूर जिल्हा समन्वयक श्री नरसिंग मरडे , श्री शिवाजीराव खोगरे ,आरोग्य अधिकारी डॉ .विकास मोराळे अँड.प्रभाकर सातभाई आदींनी मार्गदर्शन केले. शाहीर उत्तम इंगोले यांच्या उत्कृष्ट जनजागृती गीतांची गावातील लोकसहभाग मिळविण्यासाठी मोठी मदत झाली. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील 16 स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी या सादग्राम प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले होते 
भगवान सेनेचे सरसेनापती व भाजपचे ज्येष्ठ नेते फुलचंद भाऊ कराड ,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भीमराव मुंडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यकांतराव मुंडे व गावातील सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते राजकारण बाजुला सारुन गाव विकासाकरिता एकत्र आल्याचा अनुभव आल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त केले जात असुन साद माणुसकिची फाउंडेशन पुणे व सेतुबंध संस्थांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
शिबिरात तिन दिवस सकाळी पाच वाजता वासुदेवाच्या पोशाखात उत्तम इंगोले आणि त्यांच्या टीमच्या गिताने गाव जागा केला. सकाळी दोन तास  संस्था प्रतिनिधींसह  ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावातील रस्त्याची व नालीची स्वच्छता केली .संपूर्ण कार्यक्रमात गावातील तरुणांचा चांगला सहभाग होता. स्वच्छता फेरीत निघालेला कचरा ट्रॅक्टर ट्रॉलीने घाण ग्रामपंचायत कडुन लगेच उचलण्यात आला. गावातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर अनेक वर्षापासून काही ग्रामस्थांनी केलेली अतिक्रमणे सहज आणि प्रेमाने तक्रार न करता काढून घेतली.श्री दत्ताभाऊ बारगजे, सौ. संध्याताई बारगजे व हरीश बुटले यांनी या कामी पुढाकार घेवुन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. जे काम ग्रामपंचायतीला पोलीस बळाचा वापर करूनही शक्य नव्हतं ते काम या शिबिराच्या माध्यमातून सहज आणि प्रेमाने साध्य झालं. "आमच्या गावाएवढं बेकार गाव दुसर नाही "असं म्हणणाऱ्या ग्रामस्थांनीच अखेरीस माझा गाव व गावातीलच गावकरी खुप चांगले आहेत अशा प्रतिक्रिया दिल्या.
शिबिरादरम्यान दर दिवशी रात्री आठ नंतर साद माणुसकीची फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीश बुटले यांचे मार्गदर्शन व शाहीर उत्तम इंगोले व त्यांच्या टीमचे  जनजागृती गीते , नाटिकांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. याच्या माध्यमातून मनोरंजन आणि मार्गदर्शन एकाच वेळी दोन्ही गोष्टी साध्य झाल्या.शिबिरात परळी रेल्वे संघर्ष समितीचे जी एस सौंदळे ,परळी तालुका शिक्षक संघाचे बंडू आघाव  ,मौजे दौनापूर येथे साद ग्राम निर्मिती प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्वश्री गोपाळ आघाव ,मुक्ताराम सोनवणे, बीडच्या मनिषा पवार ज्योती चौधरी, लातूरचे सचिन सुर्यवंशी,चंद्रपुरचे विनायक कोसरे, उस्मानाबादच्या कस्तुरा ताई  कारभारी व ग्रमस्थांनी परिश्रमघेतले.

Thursday, 30 May 2019

धनंजय मुंडेंच्या वतीने सिरसाळा येथे रोजा इफ्तारी संपन्नपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.30....... विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आज सिरसाळा येथे आयोजित मुस्लिम बांधवांसाठीच्या रोजा इफ्तारीच्या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला.

      सायंकाळी नमाज झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुस्लिम बांधवांना फळे व खजुर देऊन त्यांचा उपवास सोडला. रमजान महिन्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन सामाजिक एकता, बंधुता आणि प्रेम कायम रहावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. सिरसाळ्यातील मुस्लिम बांधवाच्या वतीनेही धनंजय मुंडे यांचा फर ची टोपी, गमछा देऊन सत्कार करण्यात आला. 
या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, अय्युबभाई पठाण, प्रा.डॉ.मधुकर आघाव, वाल्मिकअण्णा कराड, मोहनराव सोळंके, जानिमियॉं कुरेशी, राजेभाऊ पौळ, सिरसाळ्याचे पी.एस.आय.राठोड, चंद्रकांत कराड, प्रभाकर पौळ, संतोष पांडे, बाबासाहेब काळे, देवराव काळे, इम्रान पठाण, संजय जाधव, अक्रम पठाण, रामराव किरवले, शेख मोईन, अजमद पठाण, दौलत पठाण, गुड्डु मनियार, शेख मैनोभाई, शेख जावेद आदींसह मुस्लिम समाज बांधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापनदिन येत्या शनिवारी १ जून २०१९ रोजी सर्व बसस्थानकावर मोठ्या उत्सवात होणार साजरा


बाळू राऊत मुंबई प्रतिनिधी 
मुंबई, दि. ३० : राज्यातील खेड्यापाड्यांतून, गावागावांतून विहार करणारी लालपरी आता ७१ वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापनदिन येत्या शनिवारी १ जून २०१९ रोजी राज्यात सर्व विभागीय आणि जिल्हापातळीवरील एसटीच्या सर्व ५६८  बसस्थानकांवर  साजरा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.
राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी म्हणजे एसटीने काळानुसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत, असेही मंत्री श्री. रावते यांनी सांगितले. एसटीने लालपरीपासून सुरू केलेला प्रवास हिरकणी, शिवनेरी, शिवशाही ते विठाई असा सुखद टप्प्यावर आणला आहे. एसटीचा हा ७१ वा वर्धापनदिन राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवर उत्साहात साजरा करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यातील नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन आणि सत्कार संबंधित ठिकाणी करण्यात येणार असल्याचेही श्री. रावते यांनी सांगितले.
एसटीच्या मुंबईतील प्रमुख कार्यालयातही सोहळा करण्यात येणार असून यानिमित्ताने गोकुळदास तेजपाल सभागृहात एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. परिवहन आणि खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख तसेच एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, एसटीचे महाव्यवस्थापक, सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, संघटनांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तत्पूर्वी दुपारी दोन वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुरूवातीला ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर आणि रामदास फुटाणे आपल्या सदाबहार काव्यसुमनांची मेजवानी उपस्थित मान्यवर आणि कर्मचारी वर्गाला देणार आहेत. त्यानंतर नवनिर्वाचित खासदार अरविंद सावंत यांचे अभिनंदन आणि सत्कार तसेच सेवाज्येष्ठ एसटी कर्मचारी आणि उल्लेखनीय कामगिरी करीत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध सिनेतारका मेधा दाढे  उपस्थित राहणार आहेत. तसेच एसटीच्या चित्ररथाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. रावते यांनी राज्यातील सर्व कर्मचारी आणि एसटी प्रवाशांना ७१ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने तयार करण्यात आलेल्या खासदार परिचय पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात करण्यात आले


बाळू राऊत मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने 17व्या लोकसभेत महाराष्ट्रातून नवनिर्वाचित खासदारांची माहिती असलेली पुस्तिका तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुस्तिकेचे अवलोकन केले. सुबक मांडणी, उपयुक्त माहिती या पुस्तिकेत असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य शपथ घेत असताना अगदी औचित्यपूर्ण समयी तत्परतेने ही पुस्तिका तयार केली आहे, अशा शब्दात श्री. फडणवीस यांनी कौतुक केले.
मुख्यमंत्री कक्षात पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्यात महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा आणि उपसंपादक रितेश भुयार उपस्थित होते.
या खासदार परिचय पुस्तिकेत महाराष्ट्रातील लोकसभेवर निवडून आलेले  48 खासदार, राज्यसभेतील 19 व राष्ट्रपती महोदयांनी मनोनीत केलेले 2 अशा एकूण 69 खासदारांची माहिती देण्यात आलेली आहे. लोकसभेतील खासदारांची माहिती लोकसभा मतदारसंघानुसार देण्यात आली असून खासदार महोदयांचा पत्ता, ईमेल, भ्रमणध्वनी, ट्विटर हँडल व स्वीय सहायकाचा भ्रमणध्वनी देण्यात आला आहे. राज्यसभेच्या खासदार महोदयांची माहिती इंग्रजी वर्णमालेनुसार देण्यात आली आहे. राज्यसभा खासदार महोदयांच्या कालावधीसह उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. या पुस्तिकेचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात प्रत्येक पानावर संबंधित खासदार महोदयांची माहिती संकलित असलेला क्यूआर कोड देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातून ४ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात शपथ विधी


बाळू राऊत मुंबई प्रतिनिधी 
दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रिमंडळास आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शपथ दिली.  या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा समावेश आहे.
 राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित शानदार समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी घटक पक्षांच्या सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 25 कॅबिनेट मंत्री, 9 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व 24 राज्यमंत्री  यांचा समावेश आहे. यावेळी  ब्रेक्सिस्ट देशाचे प्रमुख, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्यासह विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह  विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.      
महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री
श्री. नरेंद्र मोदी  यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि अरविंद सावंत यांना राष्ट्रपती राम नाथ कोंविद यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ दिली.   तर रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांना राष्ट्रपती राम नाथ कोंविद यांनी राज्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ दिली.
याआधी वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री, जलसंसाधन मंत्री म्हणून तर पियुष गोयल यांनी उर्जा मंत्रालय व कोळसा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून तर प्रकाश जावडेकर यांनी माहिती व प्रसारण मंत्री, पर्यावरणमंत्री आणि मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून मंत्रिपद भूषविले आहे. तर रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाचे राज्यमंत्री म्हणून पद भूषविले आहे. रावसाहेब दानवे यांनीही राज्यमंत्री पद भूषविले होते. अरविंद सावंत आणि संजय धोत्रे यांनी प्रथमच केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली  आहे.

एकतिसाव्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेत ‘सोयरे सकळ’ प्रथम


बाळू राऊत मुंबई प्रतिनिधी 
 मुंबई, दि. ३० : एकतिसाव्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत येथील भद्रकाली प्रॉडक्शन संस्थेच्या ‘सोयरे सकळ’ या नाटकासाठी रु. ७ लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा केली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे -

जिगिषा आणि अष्टविनायक, मुंबई या संस्थेच्या हॅम्लेट या नाटकास रु. ४ लाख ५० हजाराचे द्वितीय पारितोषिक आणि अद्वैत थिएटर्स, मुंबई या संस्थेच्या आरण्यक या नाटकास रु. ३ लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

दिग्दर्शन :-   प्रथम पारितोषिक (रु.१ लाख ५० हजार/-) चंद्रकांत कुळकर्णी (नाटक-हॅम्लेट)
          
द्वितीय पारितोषिक (रु.१ लाख /- आदित्य इंगळे (नाटक-सोयरे सकळ)
          
तृतीय पारितोषिक (रु.५० हजार /-) अद्वैत दादरकर (नाटक-एका लग्नाची पुढची गोष्ट)

नाट्यलेखन : प्रथम पारितोषिक (रु.१ लाख /-) डॉ.समीर कुलकर्णी (नाटक-सोयरे सकळ)
          
द्वितीय पारितोषिक (रु.६० हजार /-) रत्नाकर मतकरी (नाटक-आरण्यक)
          
तृतीय पारितोषिक (रु.४० हजार /-) दिग्पाल लांजेकर (नाटक-ऑपरेशन जटायू)

प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-हॅम्लेट)
            
द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-सोयरे सकळ)
            
तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) शितल तळपदे (नाटक-आरण्यक)

नेपथ्य :       प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-हॅम्लेट)
             
द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-सोयरे सकळ)
             
तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) संदेश बेंद्रे (नाटक-ऑपरेशन जटायू)

संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) राहूल रानडे (नाटक-हॅम्लेट)
              
द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) अजित परब (नाटक-सोयरे सकळ)
              
तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) कौशल इनामदार (नाटक-आरण्यक)

वेशभूषा :       प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) गीता गोडबोले (नाटक-सोयरे सकळ)
              
द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-हॅम्लेट)
              तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) मेघा जकाते (नाटक-आरण्यक)
रंगभूषा :        प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) सचिन वारीक (नाटक-सोयरे सकळ)
द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) उल्लेश खंदारे (नाटक-हॅम्लेट)
तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) उल्लेश खंदारे (नाटक-आरण्यक)
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व रु.५० हजार /-
पुरुष कलाकार : भरत जाधव (नाटक-वन्स मोअर), प्रशांत दामले (नाटक-एका लग्नाची पुढची गोष्ट), सुमीत राघवन (नाटक-हॅम्लेट), उमेश कामत (नाटक-दादा एक गुड न्यूज आहे), सतीश राजवाडे (नाटक-अ परफेक्ट मर्डर)
स्त्री कलाकार : ऐश्वर्या नारकर (नाटक-सोयरे सकळ), तेजश्री प्रधान (नाटक-तिला काही सांगायचंय), ऋता दुर्गुळे (नाटक-दादा एक गुड न्यूज आहे), प्रतिभा मतकरी (नाटक-आरण्यक), माधूरी गवळी (नाटक-एपिक गडबड)
      ६ मे ते २० मे या कालावधीत दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले आणि प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरीवली या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १० व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अरविंद औंधे, विलास उजवणे, देवेंद्र पेम, अमिता खोपकर आणि शीतल क्षीरसागर यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

जेष्ठ शिवसेना नेते लिलाधर डाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी होणार नियुक्ती


बाळू राऊत मुंबई प्रतिनिधी 
मुंबई :-एनडीए सरकारने लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. राष्ट्रपती भवनात आज (३० मे) संध्याकाळी ७ वाजता आपल्या नव्या मंत्रिमंडळासह नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली . दरम्यान, मोदींच्या या मंत्रिमंडळात कोणाकोणाचा समावेश असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती . या पार्श्वभूमीवर, शिवसेनेकडून आज दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली 
लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाला तोंडघशी पाडत बहुमताने केंद्रात सत्ता स्थापन करत असलेल्या नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. अशातच शिवसेनेला मंत्रिपदासोबतच राज्यपालपदही दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मिझोरमच्या राज्यपालपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांच्या नावावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती  आहे.

साक्षात पांडुरंग परमात्‍म्‍याच्‍या समोर सेवा मिळणे हे जीवनातील सर्वात मोठे भाग्‍य- हभप विजयानंद महाराज आघावपरळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- परळी पंचक्रोषील भाविकांच्‍या वतिने श्रीक्षेत्र पंढरपुर येथील श्रीविठ्‍ठल रुक्‍मिणी मंदिरात अखंड हरिनाम सप्‍ताह तथा श्रीमद्‍ भागवत कथेचे दि 30/05/2019 ते दिले 5/06/2019 या कालावधीत आयोजन करण्‍यात आले असून या सप्‍ताहात पहिल्‍या दिवशी कथा निरुपण करताना हभप  विजयानंद महाराज बोलत होते. अनेक जन्‍मात केलेल्‍या पूण्‍याचा जेंव्‍हा उदय होतो तेंव्‍हा श्रीमद्‍ भागवत कथा श्रवणाचा लाभ होतो. या वेळी आपण ही कथा साक्षात पांडुरंगाच्‍या दरबारात साक्षात श्रीविठोबारायाच्‍या समोर कथा निरूपण, श्रवण करण्‍याची संधी मिळणं हे जीवनातील सर्वात मोठे भाग्‍य असल्‍याचे प्रतिपादन हभप विजयानंद महाराज यांनी केले. भक्‍ती, ज्ञान, वैराग्‍य, विवेक इत्‍याती अध्‍यात्‍मिक संज्ञांचे निरुपण महाराजांनी अत्‍यंत सोप्‍या भाषेत, सामान्‍यांना समजेल असे, वेगवेगळ्‍या शास्‍त्रांतील पुराव्‍यांच्‍या आधारे व वारकरी संतांच्‍या अभंगांचा आधार घेत केले. श्रीमद्‍ भागवताचे महत्‍व सांगत असताना कलीयुगात श्रीमद्‍ भागवत हे मुक्‍ती देणारं शास्‍त्र  कसं आहे या विषयीचं महाराजांनी केलेलं निरूपण श्रोत्‍यांच्‍या मनाचा ठाव घेऊन गेलं. उत्‍कृष्‍ठ भजन साथीत मुरलीआण्णा डाबीकर यांचे गायन श्रोत्‍यांच्‍या मनाला आनंद देत राहिले व त्‍यांना तबल्‍यावर जगदीश सोनवने,हार्मोनिअम वर श्रीनिवास बिरादार, सिंथसारजर वर दत्‍ता सोनवने यांनी सुंदर साथसंगत केली. पहिल्‍या दिवशी रात्रीची किर्तन सेवा हभप जगदीश म सोनवने यांची झाली. दि 31/05/2019 रोजी पंढरपुर येथील अजरेकर, अंबेकर फडाचे वारसदार,प्रगाढ अभ्‍यासक हभप कृष्‍णा महाराज चौरे यांची किर्तन सेवा होणार आहे. तरी,भाविकांनी हभप विजयानंद महाराज आघाव यांच्‍या मुखातुन चिंतनीय व रसाळ श्रीमद्‍ भागवत कथा श्रवणाचा तथा हभप कृष्‍णा महाराज चौरे यांच्‍या किर्तनाचा आस्‍वाद घ्‍यावा असे अवाहन -हभप मुरलीआण्णा डाबीकर, सिद्‍धेश्‍वर महाराज आंधळे, जगदीश महाराज सोनवने यांनी केले आहे..

फसवणुक प्रकरणीतील तीघांची बीडच्या कारागृहात रवानगी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी):-  
    शहरातील अरुणोद्दय मार्केट मधील चार दुकाने नावांवर करुन देतो म्हणून 31 लाख रुपयें उकळुन फसवणुक  करणार्‍या तीसर्‍या आरोपीस परळी शहर पोलिसांनी बुधवारी नांदेड येथे ताब्यात घेऊन अटक केले. या पुर्वी सोमवारी दोघां जणांना पोलिसांनी अटक केले होते. या तीन्ही आरोपींना अंबाजोगाईच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली बुधवारी तीन्ही आरोपींची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. 
    येथील राजेश झंवर यांना अरुणोद्दय मार्केट मधील चार  दुकाने विकत देतो म्हणुन बालकिशन मुरलीधर बाहेती, श्रीकिशन मुरलीधर बाहेती व दिपक बालकिशन बाहेती या तीघांनी 31 लाखां रुपयाला फसविले या प्रकरणी झंवर यांनी गेल्या महिन्यात परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. परंतु अनेकांना गंडा घालुन परळीतुन फरार झालेल्या तीघांच्या शहर पोलिसांनी मात्र मुसक्या आवळल्या. सोमार दि.27 रोजी बालकिशन बाहेती व श्रीकिशन बाहेती यांना अटक केली होती. दिपक बाहेती यास बुधवारी पोलिसांनी पकडले.   या तीघांना बुधवारी अंबाजोगाईच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात पोलिसांनी हजर केले. न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. बीडच्या कारागृहात तीघांची रवानगी केली.

श्री क्षेत्र पंढरपूर येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण


व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळयाचे आयोजन
भाविक भक्तांनी सप्ताहाचा लाभ घ्यावा- युवा किर्तनकार जगदीश महाराज सोनवणे
परळी वैजनाथ, (प्रतिनिधी) ः- पंचक्रोशीतील सर्व भाविकांना कळविण्यात आनंद होतो की जोग महाराज वारकरी शिक्षण आळंदी देवाची या संस्थेचे संस्थापक वै. सद्गुरु जोग महाराज यांच्या पुण्यतिथी शताब्दी महोत्सव निमित्ताने आरंभ दिनांक - 30/5/2019 पासून ते सांगता 5/6/2019 पर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर सभामंडप मध्ये अखंड हरिनाम सप्ताहचे भव्य दिव्य आयोजन केलेले आहे
सप्ताहतील कार्यक्रमाची रूपरेषा - सकाळी 7 ते 11 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी 1 ते 4 श्रीमद् भागवत कथा, कथाप्रवक्ते कार्यक्रमाचे आयोजक - ह.भ.प.विजयानंद महाराज आघाव दौनापूरकर आणि राञी 7 ते 9 यावेळे मध्ये हरिकीर्तन यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची दररोज किर्तनसेवा खालील प्रमाणे ह.भ.प.श्री. महादेव महाराज चाकरवाडीकर, ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे, ह.भ.प. कृष्णा महाराज चौरे पंढरपूरकर, ह.भ.प.महंत राधाताई महाराज सानप,ह.भ.प. प्रभाकर महाराज झोलकर, ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे शास्त्री, ह.भ.प अर्जुन महाराज लाड गुरूजी, आणि काल्याचे किर्तन ह.भ.प.परम पुज्य गुरूवर्य ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज अशा पद्धतीने सप्ताहाचे भव्य दिव्य स्वरूपात नियोजन केलेले आहे.
तसेच कार्यक्रमास उपस्थित मान्यवर मंडळीं मा.श्री.किरणकुमार गित्ते साहेब (सचिव नगरविकास व उद्योग विकास ञिपूरा) मा.श्री.महादेवजी तांबडे साहेब (पोलिस आयुक्त सोलापूर ),श्री.ढोले साहेब(कार्यकारी अधिकारी विठ्ठल रुक्मिणी मंदीर पंढरपूर),मा.श्री.दिनकरराव मुंडे गुरूजी, तरी पंचक्रोशीतील भाविक भक्त,श्रोते मंडळी, गुणवान,भजनी मंडळी, महाराज मंडळी आपणा सर्वांनी बहुसंख्येने पंढरपूर येथे उपस्थित राहून या ब्रम्हानंदाचा आवश्य लाभ घ्यावा हि निमंत्रण पुर्वक विनंती. तसेच कार्यक्रमास येणार्‍या सर्व भाविकांसाठी सर्वप्रकारची व्यवस्था निवासस्थान - श्री संत सखाराम महाराज संस्थान चंद्रभागा घाट प्रदक्षिणा मार्ग पंढरपूर याठिकाणी करण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी सहकुटुंब या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन युवाकिर्तनकार जगदीश महाराज सोनवणे टोकवाडी व त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे.

श्री वैजनाथ देवस्थांनच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 294 वी जयंती साजरीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राजमाताअहिल्याबाई होळकर यांनी सर्व समाजातील लोकांना एकत्र आनन्याचे काम केले त्यांनी संपुर्ण देशभरात विविध मंदिरांचा जीर्णीध्दार केले असल्याचे प्रतिपादन प्रा.बाबासाहेब देशमुख सर यांनी केले. 
      परळी येथे आज दिनांक 31/5/19 रोजी सकाळी 9 वाजता श्री वैजनाथ देवस्थांन मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 294 जयंती निर्मित आर्धा कृती पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादनं करतांना श्री वैजनाथ देवस्थांन कमिटीचे विश्वस्त प्रा. बाबासाहेब देशमुख आशोक पुजारी, दत्तात्रय जोशी बाबुराव पुजारी शिरीष स्वामी,पिंन्टू बुद्रे,यावेळी आदी कर्मचारी उपस्थित होते.

परळीत आज गोपीनाथ गडावरील कार्यक्रमाचे नियोजनासाठी भाजपाची महत्वाची बैठक


सर्व आघाड्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन-रवि कांदे 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पांचव्या स्मृतीदिना निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठवाड्यातील भाजपा-शिवसेना युतीचे सर्व नवनिर्वाचित खासदार,  ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्यासह आदी मान्यवर  येत्या ३ जून रोजी गोपीनाथ गडावर उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आज गुरुवारी परळी विधानसभा मतदारसंघ भाजपाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पक्षाच्या सर्व आघाडीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व बुथ प्रमुख यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे तालुका सरचिटणीस रवि बंकटराव कांदे यांनी केले आहे.


       गुरुवार दि. 30 मे रोजी सायंकाळी 5 वाजता यशःश्री बंगला येथे या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 3 जुन रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहूणे उपस्थित राहणार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री प्रा राम शिंदे, ह. भ. प. रामराव महाराज ढोक , मराठवाड्यातील भाजपा शिवसेना युतीचे सर्व नवनिर्वाचित खासदार तसेच जिल्हयातील सर्व आजी माजी आमदार, महत्वाची नेते मंडळी व कार्यकर्तेसह मान्यवरांच्या उपस्थितीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा स्मृतिदिन साजरा केला जाणार आहे.  वैद्यनाथ साखर कारखाना परिसरातील गोपीनाथ गड येथे हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. यासाठी लाखो नागरिक येणार असून सर्वांची चांगली व्यवस्था व्हावी म्हणून कार्यक्रमाच्या तयारीसाठी या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या बैठकीला परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, गटप्रमुख, चेअरमन, सरपंच, उपसरपंच  सर्व शासकीय समित्यांचे पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख,  प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व बुथ प्रमुख  पदाधिकारी  यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे तालुका सरचिटणीस रवि कांदे यांनी केले  आहे.

नगरपंचायतचे प्रथम नगरध्यक्ष तथा उपनगरध्यक्ष बालासाहेब रोकडे यांच्या वाढदिवसा निमित्त पाणपोईचे उदघाटन
अरुणा शर्मा


पालम :- बस्थानकावरील पवन वस्त्र भंडार कापड दुकाना समोर पालम शहराचे मा.नगरध्यक्ष तथा उपनगरध्यक्ष बालासाहेब रोकडे (भाऊ) यांच्या वाढदिवसा निमित्त वार्ड क्र.12 चे नगरपंचायतचे सदस्य विजयकुमार घोरपडे यांनी बसस्थानका वरील नागरीकांना ठंड पाणी पेण्यासाठी पाणपोई लावण्यात आली. या पाणपोईचे उदघाटन गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे (दादा) यांच्या हास्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच लक्ष्मणराव रोकडे (आकल), नगर अध्यक्ष जालिंदर हत्तिअंबिरे, गुलाबराव सिरस्कर, नगर सेवक सुनील सिरस्कर, ऊबेद पठाण, असदपठाण, लालखॉ पठाण, मोबिन खुरेशी, गफार खुरेशी, विजय घोरपडे, नगरसेवक ताटे, मुजाभाऊ रोकडे, ऑ. रामजी मणियार,  लिंबाजी टोले, गणेश घोरपडे, गणेश हत्तिअंबिरे, गजानद पवार, दत्तराम शिंदे, फुले आदी मान्यवर उपस्थित होते.

वैजनाथ देवस्थांन संस्थेचे सचिव तथा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणिस राजेश देशमुख यांच्या रोजा इफ्तार पार्टीस मोठा प्रतिसादपरळी वैजनाथ, (प्रतिनिधी) :- 
रमजाननिमित्त येथील वैद्यनाथ देवस्थान संस्थेचे सचिव तथा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणिस राजेश देशमुख यांच्या वतीने मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या रोजा इफ्तार पार्टीस मोठा प्रतिसाद मिळाला.

शेकडो समाज बांधवांनी यावेळी हजेरी लावली होती. श्री देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांचे राजेश देशमुख व त्यांच्या सहकार्‍यांनी टोपी देवून स्वागत केले. या रोजा इफ्तार पार्टीस चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी शेख करीम साहाब,माजी नगरअध्यक्ष जाबेर खाँन,वाहोजोदीन मुल्ला,अनवर सर,शेख अकबर काकर,एस.ए.समद,  सिराजोद्दीन मुल्ला, सय्यद दुल्हेपाशा, आयुब काकर, ताज खॉन, ताजु भाई,हाजी आहाम्मदभाई,नसीर खजुरे, पाशा कुरेशी, सय्यद मयुन, खालेदराज, मशुभाई,शफीक भाई,चाँदभाई,मुक्तार खॉन,फरकुंदअली बेग, प्राचार्य बशीर, हसनखान, समंदरखा पठाण, शेख मुकरम, रज्जाक कच्छी,ताहेर खॉन, बाबुभाई,मोइन राज,मोईन काकर,रफिक कच्छी,पाशा कुरेशी,मयनु भाई,खदिर सर,सय्यद ईमाम,एतेशाम सिद्दिकी, शेख मुस्तफा, शेख आकील, यांच्यासह बाबुराव मुंडे,दिपक देशमुख,धमानंद मुंडे,वैजनाथ सोंळके,सुरेश टाक,नगरसेवक पवन मुंडे,राजेश विभुते,नंदु तोतला,विजय वाकेकर, डॉ.शालीनी ताई कराड, डॉ.सुर्यकांत मुंडे, डॉ.मधुसूदन काळे,राजेद्र ओझा,विजयकुमार खोसे,विश्वनाथ गायकवाड,होलानी सेठ,दत्ताभाउ देशमुख, प्रकाश जोशी, प्रा.बाबासाहेब देशमुख, प्रदीपराव देशमुख,बाबुराव मेनकुदळे नंदकिशोर जाजू,अनिल तांदळे, डॉ.गुरूप्रसाद देशपांडे, रघुवीर देशमुख, शरद मोहरीर, नागनाथराव देशमुख, वसंतराव देशमुख,जगनाथराव देशमुख,तानाजीराव देशमुख,प्रभाकर देशमुख,माणिकराव हालगे,कुमार व्यव्हारे,जाराम देशमुख,प्रकाश वानखेडे,नितिन राजुरकर,सचिन गित्ते,नितिन समशेटी,शाम गडेकर,जेश तिळकरी यांच्यासह नागरिक, पत्रकार, वकील, व्यापारी उपस्थित होते.

ताडकळस गावात राष्ट्रवादीला मताधिक्य तर ताडकळस जि.प.गटात शिवसेनेला मताधिक्य


ताडकळस / प्रतिनिधी
पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांना 591 मताधिक्य मिळवुन आपल्या गावात राष्ट्रवादी चा बोलबाला आसल्याचे रायुकाँ तालुका अध्यक्ष गजानन आंबोरे यांनी दाखवून दिले.
 लोकसभा निवडणुकीत राजेश विटेकर यांना ताडकळस गावातून प्रत्येक वार्डातुन मताधिक्य मिळुन राष्ट्रवादीला या निवडणुकीत 1959 मते मिळाली तर शिवसेनाला 1368 मिते मिळाल्याने ताडकळस येथुन राष्ट्रवादी ला 591 मताधिक्य मिळाले आहे. या निवडणुकीत रायुकाँ तालुका अध्यक्ष गजानन आंबोरे, सरपंच राजेभाऊ आंबोरे, माजी सभापती रंगनाथ भोसले,चंद्रकांत रुद्रवार,रामराव आंबोरे व माजी आ.सिताराम घनदाट मित्र मंडळ,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे यांनी प्रचारात पुढाकार घेतला होता.
ताडकळससह खांबेगाव,शिरकळस, ईस्लामपुर या गावात राष्ट्रवादीला मोठे मताधिक्य मिळाले आहे.

ताडकळस जि.प.गटात शिवसेनेला मताधिक्य

ताडकळस येथिल जि.प.गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आसुन देखील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खा.संजय जाधव यांना ताडकळस जि.प.गटातील फुलकळस, खडाळा,माखणी, बलसा,सुकी,फुकटगाव,ममदापुर,गणपुर,कान्हेगाव या गावात शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळाले आहे.
यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि.प.गटात शिवसेनेने मुसांडी मारली आहे.शिवसेनेच्या प्रचारासाठी शिवसेना शहरप्रमुख दिलीप आंबोरे, बाजार समिती संचालक नरहारी रूद्रवार,भाजपा शहर आध्यक्ष मनुपाटिल आंबोरे,माजी जि.प.सदस्य रामनारायण मुंदडा,माणीक हजारे,मदण आंबोरे,पद्माकर आंबोरे,केशव आंबोरे, फुलकळस सरपंच गजानन शिराळे व शिवसेना भाजप महायुतीच्या कार्यकर्तेनी प्रचारात पुढाकार घेतला होता.
ताडकळस जि.प.गटात शिवसेनेचे खा.संजय जाधव यांना 6036 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश विटेकर यांना 5338 मते मिळाली तर वंचित आघाडीला 1547 मते मिळाली आसुन ताडकळस जि.प.गटात 698 मताधिक्य शिवसेनेला मिळाले आहे.

गेवराई येथील नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे रस्त्याचे काम रखडले

सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. ३० ( प्रतिनिधी ) शहरातील मेन रोड भागातील पाईप लाईनसाठी खोदलेले खड्डे आणि खोदलेल्या खड्ड्यात भर टाकून खडी आंथरलेली आहे. सदरील सोलींग नंतर दुरुस्तीचे काम रखडल्याने रस्त्यावरुन पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठा नाहक त्रास होऊ लागला असून नगर परिषदेने काम हाती घेऊन पुर्ण करावे अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.
        याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई शहरातील मेन रोड भागामध्ये पाईपलाईन साठी सहा महिन्यापूर्वी खोदण्यात करण्यात आले होते. या खोदकाम नंतर दुरुस्तीचे काम अद्यापही होणे बाकी आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनाच्या टायर खालून मोठ मोठे दगडं उडून नागरिकांना त्याचा मार सहन करावा लागत आहे. अनेक महिला, बालके व पुरुषांना या खडीचा मार खावा लागला. 
      दरम्यान गेवराई नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे गेल्या सहा महिन्यांपासून काम रखडले असून संबंधित कंत्राटदाराला सबब देऊन सदरील काम पूर्ण करण्यात यावे गेवराई नगर परिषदेचे अध्यक्ष, मुख्याधिकारी व नगरसेवकांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून काम पूर्ण करावे अशी मागणी शहरातील व्यापारी व रहिवासी नागरिकांकडून होत आहे. 

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

शरद पवार साहेबांनी बीड साठी दिलेल्या 30 टँकरचे धनंजय मुंडे , रोहित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
10 लाख लिटर पाण्यातून भागणार जिल्ह्यातील 100 गावांची दररोज तहान

बीड (प्रतिनिधी) :- दि 30  बीड जिल्ह्यातील दुष्काळी जनतेसाठी  पाण्याच्या रुपात दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. श्री. शरदचंद्रजी पवार यांनी शब्द दिल्याप्रमाणे 21 टँकर आज जिल्ह्यात दाखल झाले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, युवक नेते रोहितदादा पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर सुमारे 10 लाख लिटर क्षमतेचे हे टँकर जिल्ह्यातील 100 गावांची दररोज तहान भागवण्यासाठी वेगवेगळ्या भागात रवाना झाले.

दुष्काळामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे. अनेक ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी श्री शरद पवार साहेब आले असताना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यासाठी बारामतीच्या ऍग्रीकचर ट्रस्ट मार्फत 30 टँकर देण्याची घोषणा केली होती , त्यानुसार त्या पैकी 21 टँकर आज दाखल झाले त्याची प्रत्येकी 40 हजार लिटर इतकी क्षमता असून  आणखी 9 टँकर लवकरच दाखल होणार आहेत.

आज बीड शहरातील लॉ कॉलेज परिसरात पूजा करून , श्रीफळ फोडून व फीत कापून या टँकरचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी आमदार उषाताई दराडे, सुनील धांडे, सयद सलिम,  जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, ऍड. डी. बी. बागल, विजयसिंह पंडित, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे,  चंपावतीताई पानसंबळ, सतीश शिंदे, महेंद्र गर्जे, शेख महेबूब, जयसिंग सोळंके, बापू गवते आदी उपस्थित होते.

यावेळी धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याची तहान भागवल्याबद्दल पवार साहेबांचे आभार मानले. पवार साहेबांनी दुष्काळात जिल्ह्यात फिरताना शब्द दिला म्हणून हा उपक्रम हाती घेतला असून जोपर्यंत समाधानकारक पाऊस पडत नाहीत तोपर्यंत सुरू राहतील असे रोहित पवार यांनी पत्रकार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना सांगितले.

गेवराईत राजकीय धक्कातंत्र सुरूच अरुणराव चाळक भाजपाच्या वाटेवरसुभाष मुळे..
---------------
गेवराई,  दि. ३० __ या मतदार संघात अनन्य कारणाने राजकीय वातावरण तापू लागलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वासू आणि लोकांमध्ये देखिल विश्वास निर्माण करणारे उद्योजक अरुणराव चाळक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. दरम्यान चाळक हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळाले आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघात या मतदार संघात राजकीय वातावरण वातावरणात आता बदल होऊ लागला असून राजकीय धक्कातंत्र सुरूच आहेत.
         याबाबत अधिक माहिती अशी की, विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे मोठे प्राबल्य आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे खासदार प्रीतमताई मुंडे तसेच भाजपाच्या लोकाभिमुख कार्यामुळे नागरिक सुखी, समाधानी आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नुकताच संतोष आंधळे या युवा नेतृत्वाने भाजपात प्रवेश केला. मागील कार्यकाळातही राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी कर्तुत्वान युवकांची टिम भाजपमध्ये दाखल झाली. अलीकडच्या काळात नावारूपाला आलेले आणि विविध कार्यामध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणारे अरुणराव चाळक हे उमदे नेतृत्व असून किनगावचे सरपंच व मोठे उद्योजक म्हणून लौकिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांचे विश्वासू असलेले अरुणराव चाळक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
          येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराची आत्ताच हवा गुल झाली असून आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे लक्षात येते. चाळक यांची भारतीय जनता पक्षाच्या दिशेने वाटचाल असल्याचे संकेत असून गेवराई तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून राष्ट्रवादीचे नेते देखील हवालदिल झाल्याचे लक्षात येते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

Wednesday, 29 May 2019

येथे शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेस सुरुवात


 मँचींग सहेली या स्पर्धेस मोठा प्रतिसाद
 उद्या रक्तदान शिबीर युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे शनैश्वर प्रतिष्ठाणचे आवाहन
परळी वैजनाथ दि.२९ (प्रतिनिधी) :-
         येथे वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या शनिमंदिरात शनैश्वर जन्मोत्सवा निमित्ताने विविध सामाजिक , धार्मिक, महिलांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
             येथील शनिमंदिरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार (ता.२७) पासून अखंड शिवनाम सप्ताह, परमरहस्य पारायण सोहळ्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी (ता.२८) समाजातील महिलांसाठी मँचींग सहेली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये आपल्या मैत्रीणीसह संपूर्ण मँचींग करायचे होते. एक वेगळा संदेश यामाध्यमातून देण्यात आला. गुरुवारी (ता.३०) सकाळी आठ ते बारा भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी रामानंद तिर्थ आंबेजोगाई येथील शासकीय रक्तपेढी यासाठी सहकार्य करणार आहे. हे राष्ट्रीय कर्तृत्व पारपाडण्यासाठी युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शनैश्वर प्रतिष्ठाणच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

सरस्वती विद्यालयातील १९७७ च्या बँचचे विद्यार्थी ४२ वर्षानंतर एकत्र


परळी वैजनाथ  दि.२९ (प्रतिनिधी) :- 
         येथील सर्वात जुन्या सरस्वती विद्यालयातील १९७७ च्या बँचच्या विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी यांचा स्नेह मिलन कार्यक्रम येथे नुकताच पार पडला.
       शहरातील सर्वात जुन्या सरस्वती विद्यालयातील १९७७ च्या बँचचे वर्गमित्र तब्बल ४२ वर्षा नंतर एकत्र येवून स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वर्गमित्रानीं १९७७ नंतर कधीच भेट न, झालेल्या, वर्ग मित्रासाठी या, गाठीभेटीचा, दुर्मिळ क्षण, डोळ्यात सामावुन घेण्यासाठी शनिवार (ता.२५) व रविवारी (ता.२६) या दोन दिवशी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी परळीतील व बाहेरगावी असलेले सर्व मित्र अगदी वेळ काढून उपस्थित होते. परळीतील संयोजकांनी वर्गमित्रांच्या आगमनासाठी, सायंकाळी पाच वाजता "नवगण महाविद्यालयात" संगीत रजनीचे आयोजन केले होते.
परळीतील संयोजक आपल्या मित्रांची वाट पहात होते.जस जसा वेळ पुढे सरकत होता, बाहेरगावी असलेल्या मित्रांचे आगमन होत गेले व प्रत्येक जण प्रत्येकाशी हस्तांदोलन करत होते, काही जण, गळा भेठ घेवुन मैत्रीचा सुगंध ह्रदयात सामावून घेत होते.
या स्नेह मिलन सोहळ्या निमित्त शनिवारी (ता.२५) रात्री आठ वाजता नवगण काँलेज येथे "संगीत संध्याचा" कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या, दुर्मिळ भेटीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गुरूजणांना पण आमंत्रित करण्यात आले होते. प्रत्येक विध्यार्थी गुरूजणांनचे पदस्पर्श करत व आपला परिचय देण्यात सरसावला. या विलोभनीय दृश्याने वातावरण भारावून निघाले.संगीत संध्या कार्यक्रम वेळेवर सुरु झाला. या वेळी आयोजकांंनी सह भोजनाची व्यवस्था केली होती. या भोजणाचा गुरुजणासह, विध्यार्थी व त्यांच्या बरोबर आलेल्या सह जोडीदार यांनी स्वाद घेतला.
स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने दुसऱ्या दिवशी.. रविवारी (ता.२६) सकाळी आपल्या शाळेत म्हणजे सरस्वती विद्यालयात गुरुजणांनचा सत्कार समारंभ पारपडला. सर्व विद्यार्थ्यां तर्फे, संयोजक विध्यार्थी वर्गाने गुरुजण वर्गाचा सत्कार केला.नंतर राष्ट्र गिताचा कार्यक्रम घेवुन नंतर जे, शिक्षक व वर्ग मित्र, हयात राहीले नाहीत. अशांना श्रंद्धाजली अर्पण करण्यात आली. वर्गमित्रा पैकी उषा रूपदे, उज्वला शेळके, रामेश्वरबांगड, अंतेश्वर नरवणे, अचुत पवार,यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. गुरूजणांना मध्ये श्री. देशमाने, श्रीमती टाक, श्री. भावटनकर , पी एन देशपांडे या गुरुजणानी, आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सिद्धेश्वर तिळकरी तर आभार जयंत दिक्षित यांनी मानले.
नंतर शाळेत व्रक्ष रोपण कार्यक्रम झाला.

लोकनेत्याच्या अभिवादनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३ जूनला गोपीनाथ गडावरगोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण तरूणांसाठी रोजगार मेळावा ; युतीच्या नवनिर्वाचित खासदारांचाही होणार सन्मान

ना. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी सुरू

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. २९ ----- लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पांचव्या स्मृतीदिना निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठवाड्यातील भाजपा-शिवसेना युतीचे सर्व नवनिर्वाचित खासदार येत्या ३ जून रोजी गोपीनाथ गडावर उपस्थित राहणार आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने वतीने यंदा विविध सामाजिक उपक्रमां बरोबरच ग्रामीण भागातील बेरोजगार तरूणांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून नवनिर्वाचित खासदारांनाही यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी करण्यात येत आहे. 

   लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी म्हणजे येत्या ३ जून रोजी दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्याच्या काना कोप-यातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते आपल्या लाडक्या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहूणे उपस्थित राहणार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री प्रा राम शिंदे,  मराठवाड्यातील भाजपा शिवसेना युतीचे सर्व नवनिर्वाचित खासदार तसेच जिल्हयातील सर्व आजी माजी आमदार, महत्वाची नेते मंडळी व कार्यकर्ते यावेळी  उपस्थित राहणार आहेत. 

  सुरवातीला सकाळी ११ वा. रामायणाचार्य ह.भ.प. ढोक महाराज यांचे सुश्राव्य किर्तन होणार असून दुपारी १ वा. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मराठवाड्यातील भाजपा शिवसेना महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांचाही सत्कारही यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असून भाजपा महायुतीला बीडसह राज्यात घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे सर्व जनतेचे आभार मानणार आहेत. 

ग्रामीण तरूणांसाठी प्रतिष्ठान सरसावले
----------------------------
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आतापर्यंत लोकोपयोगी आणि सामाजिक उपक्रम राबवून एक आदर्श पायंडा पाडला आहे. महा आरोग्य शिबीर, अपंगाना साहित्य वाटप, बेरोजगारांना नोक-या, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत, आत्महत्या झालेल्या शेतक-यांच्या कुटूंबियांना मदतीचा हात आदी उपक्रमा बरोबरच अलिकडेच सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून प्रतिष्ठानने दुष्काळग्रस्त भागातील पालकांना आधार देण्याचे काम केले. आता आर्थिक परिस्थिती मुळे व्यावसायिक शिक्षण व कोर्स पुर्ण करू न शकणा-या ग्रामीण भागातील तरूणांसाठी प्रतिष्ठानने  रोजगार मेळावा आयोजित करून मदतीचा हात पुढे केला आहे. या मेळाव्यातून किमान दहावी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या बीड जिल्हयातील सुमारे पांच हजार विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणा बरोबरच त्यांच्या आवडीचा कोर्स पुर्ण करण्यासाठी एखाद्या नामांकित कंपनीत मानधन तत्वावर जाॅब देऊन कोर्स पुर्ण केला जाणार आहे, त्यासाठी पुण्याची 'यशस्वी ' ही संस्था सहकार्य करणार आहे. कोर्स पुर्ण झाल्यानंतर मिळालेल्या प्रमाणपत्राच्या आधारे त्याला चांगला रोजगार मिळू शकेल अशी व्यवस्था ना. पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने करण्यात आली आहे. 

    येत्या ३ जून रोजी होणा-या कार्यक्रमास व मेळाव्यास सर्व नागरिक तसेच भाजपा महायुतीच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

परळीत पाच वर्षीय बालिकेशी ५५ वर्षीय व्यक्‍तीचे अश्लील चाळे!


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
मानवी मूल्यांना पायदळी तुडवत एखाद्या हैवानारखे वर्तन असणारी घटना घडली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना परळीमध्ये घडली आहे. विकृत मनोवृत्तीच्या एका (55 वर्षीय) इसमाने अवघे पाच वर्षे वय असणाऱ्या चिमुकल्या बालिकेशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. आरोपी फरार असला तरी प्राथमिक स्तरावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 

शहरातील संभाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या उड्डाण पुलाखालील परिसरात एका अत्यल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. या बालिकेच्या शरीरावरील ओरखडे व खुणा दिसून आल्याने चौकशी केली असता, या मुलीने शेजारीच राहणार्‍या डोंगरे नामक व्यक्तीने घरात बोलावून घेतले तसेच शरीराशी छेडखानी केल्याचे तिच्या भाषेत माहिती सांगितली. ल्यावरुन तिच्याबरोबर गैरवर्तन झाल्याचे लक्षात आले. 

ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. या बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी  डॉक्टरांनी आवश्यक त्या तपासण्या केल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी सायंकाळी या पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार प्रथमदर्शनी आरोपींविरुद्ध कलम 354 नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय पठाण हे करीत आहेत. 

दरम्यान सध्या आरोपी फरार झालेला आहे. मात्र पोलिस तपास करीत असून, लवकरच आरोपीला ताब्यात घेतले जाईल. तूर्तास प्रथमदर्शनी या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय आहवाल व तपासातून निष्पन्न होणाऱ्या बाबीप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल, असे संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले.  

परळीत आज गोपीनाथ गडावरील कार्यक्रमाचे नियोजनासाठी भाजपाची महत्वाची बैठकसर्व आघाड्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन-रवि कांदे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पांचव्या स्मृतीदिना निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठवाड्यातील भाजपा-शिवसेना युतीचे सर्व नवनिर्वाचित खासदार,  ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्यासह आदी मान्यवर  येत्या ३ जून रोजी गोपीनाथ गडावर उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आज गुरुवारी परळी विधानसभा मतदारसंघ भाजपाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पक्षाच्या सर्व आघाडीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व बुथ प्रमुख यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे तालुका सरचिटणीस रवि बंकटराव कांदे यांनी केले आहे.


       गुरुवार दि. 30 मे रोजी सायंकाळी 5 वाजता यशःश्री बंगला येथे या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 3 जुन रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहूणे उपस्थित राहणार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री प्रा राम शिंदे, ह. भ. प. रामराव महाराज ढोक , मराठवाड्यातील भाजपा शिवसेना युतीचे सर्व नवनिर्वाचित खासदार तसेच जिल्हयातील सर्व आजी माजी आमदार, महत्वाची नेते मंडळी व कार्यकर्तेसह मान्यवरांच्या उपस्थितीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा स्मृतिदिन साजरा केला जाणार आहे.  वैद्यनाथ साखर कारखाना परिसरातील गोपीनाथ गड येथे हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. यासाठी लाखो नागरिक येणार असून सर्वांची चांगली व्यवस्था व्हावी म्हणून कार्यक्रमाच्या तयारीसाठी या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या बैठकीला परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, गटप्रमुख, चेअरमन, सरपंच, उपसरपंच  सर्व शासकीय समित्यांचे पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख,  प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व बुथ प्रमुख  पदाधिकारी  यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे तालुका सरचिटणीस रवि कांदे यांनी केले  आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज सिरसाळा येथे रोजा इफ्तारीचा कार्यक्रम ; धनंजय मुंडेंची उपस्थिती


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.29मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सिरसाळा येथे उद्या गुरुवार दि 30 मे रोजी रोजा इफ्तारी कार्यक्रमाचे  करण्यात आले असून विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरूवार दि.30 मे, रोजी सिरसाळा येथे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सायंकाळी 07 वाजता नमाज अदा करून रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांकरीता रोजा
इफ्तार दावतचे आयोजन केले आहे.

 तरी या रोजा इफ्तार दावतच्या कार्यक्रमास मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.