तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 May 2019

पालम तालुक्यातील बरबडी येथे शॉट सर्कीट मुळे शेतातील गुरांच्या 2 गोठ्यांना आग....!आगीत गहू ज्वारीसह शेळ्यांची 9 पिल्ल,शेती उपयोगी अवजारे जळून खाक,शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान 


अरुणा शर्मा


पालम :- तालुक्यातील मौ.बरबडी येथील शेतशिवारातील सर्वे नं.३६ मधील दोन शेतकऱ्याच्या शेतातील गुरांच्या गोठ्याला शॉट सर्कीट मुळे भयंकर आग लागल्याची दुर्दैवी घटना काल मंगळवार दि. 28 मे रोजी दुपारी 02-50 वाजेच्या सुमारास घडली या घटनेत शेतकरी माणिकराव रामराव कर्वे यांचा गुराढोरांचा गोटा जळुन खाक झाला या आगीत शेळ्यांची 9 पिल आगीत जळून खाक झाली तसेच 1 शेळीचे पिल्लू व एक गाय जख्मी झाली तर  गहू 14 पिशवी 9 पिशवी ज्वारी 2 फवारे व तसेच शेती अवजारे तसेच जनावरांचे खाद्य अगीत खाक झाले. तर शेतकरी एकनाथ बापू कर्वे यांचे ही या घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यावेळी घटना स्थळावर उपस्थित शेतकऱ्यांनी तात्काळ विद्युत महावितरण कंपनीच्या ३३ केव्ही उपकेंद्राला फोनवर संपर्क केल्याने विद्युत प्रवाह बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.

No comments:

Post a comment