तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 30 May 2019

शरद पवार साहेबांनी बीड साठी दिलेल्या 30 टँकरचे धनंजय मुंडे , रोहित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
10 लाख लिटर पाण्यातून भागणार जिल्ह्यातील 100 गावांची दररोज तहान

बीड (प्रतिनिधी) :- दि 30  बीड जिल्ह्यातील दुष्काळी जनतेसाठी  पाण्याच्या रुपात दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. श्री. शरदचंद्रजी पवार यांनी शब्द दिल्याप्रमाणे 21 टँकर आज जिल्ह्यात दाखल झाले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, युवक नेते रोहितदादा पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर सुमारे 10 लाख लिटर क्षमतेचे हे टँकर जिल्ह्यातील 100 गावांची दररोज तहान भागवण्यासाठी वेगवेगळ्या भागात रवाना झाले.

दुष्काळामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे. अनेक ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी श्री शरद पवार साहेब आले असताना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यासाठी बारामतीच्या ऍग्रीकचर ट्रस्ट मार्फत 30 टँकर देण्याची घोषणा केली होती , त्यानुसार त्या पैकी 21 टँकर आज दाखल झाले त्याची प्रत्येकी 40 हजार लिटर इतकी क्षमता असून  आणखी 9 टँकर लवकरच दाखल होणार आहेत.

आज बीड शहरातील लॉ कॉलेज परिसरात पूजा करून , श्रीफळ फोडून व फीत कापून या टँकरचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी आमदार उषाताई दराडे, सुनील धांडे, सयद सलिम,  जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, ऍड. डी. बी. बागल, विजयसिंह पंडित, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे,  चंपावतीताई पानसंबळ, सतीश शिंदे, महेंद्र गर्जे, शेख महेबूब, जयसिंग सोळंके, बापू गवते आदी उपस्थित होते.

यावेळी धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याची तहान भागवल्याबद्दल पवार साहेबांचे आभार मानले. पवार साहेबांनी दुष्काळात जिल्ह्यात फिरताना शब्द दिला म्हणून हा उपक्रम हाती घेतला असून जोपर्यंत समाधानकारक पाऊस पडत नाहीत तोपर्यंत सुरू राहतील असे रोहित पवार यांनी पत्रकार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना सांगितले.

No comments:

Post a comment