तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 30 May 2019

गेवराई येथील नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे रस्त्याचे काम रखडले

सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. ३० ( प्रतिनिधी ) शहरातील मेन रोड भागातील पाईप लाईनसाठी खोदलेले खड्डे आणि खोदलेल्या खड्ड्यात भर टाकून खडी आंथरलेली आहे. सदरील सोलींग नंतर दुरुस्तीचे काम रखडल्याने रस्त्यावरुन पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठा नाहक त्रास होऊ लागला असून नगर परिषदेने काम हाती घेऊन पुर्ण करावे अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.
        याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई शहरातील मेन रोड भागामध्ये पाईपलाईन साठी सहा महिन्यापूर्वी खोदण्यात करण्यात आले होते. या खोदकाम नंतर दुरुस्तीचे काम अद्यापही होणे बाकी आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनाच्या टायर खालून मोठ मोठे दगडं उडून नागरिकांना त्याचा मार सहन करावा लागत आहे. अनेक महिला, बालके व पुरुषांना या खडीचा मार खावा लागला. 
      दरम्यान गेवराई नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे गेल्या सहा महिन्यांपासून काम रखडले असून संबंधित कंत्राटदाराला सबब देऊन सदरील काम पूर्ण करण्यात यावे गेवराई नगर परिषदेचे अध्यक्ष, मुख्याधिकारी व नगरसेवकांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून काम पूर्ण करावे अशी मागणी शहरातील व्यापारी व रहिवासी नागरिकांकडून होत आहे. 

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment