तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 30 May 2019

गेवराईत राजकीय धक्कातंत्र सुरूच अरुणराव चाळक भाजपाच्या वाटेवरसुभाष मुळे..
---------------
गेवराई,  दि. ३० __ या मतदार संघात अनन्य कारणाने राजकीय वातावरण तापू लागलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वासू आणि लोकांमध्ये देखिल विश्वास निर्माण करणारे उद्योजक अरुणराव चाळक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. दरम्यान चाळक हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळाले आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघात या मतदार संघात राजकीय वातावरण वातावरणात आता बदल होऊ लागला असून राजकीय धक्कातंत्र सुरूच आहेत.
         याबाबत अधिक माहिती अशी की, विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे मोठे प्राबल्य आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे खासदार प्रीतमताई मुंडे तसेच भाजपाच्या लोकाभिमुख कार्यामुळे नागरिक सुखी, समाधानी आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नुकताच संतोष आंधळे या युवा नेतृत्वाने भाजपात प्रवेश केला. मागील कार्यकाळातही राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी कर्तुत्वान युवकांची टिम भाजपमध्ये दाखल झाली. अलीकडच्या काळात नावारूपाला आलेले आणि विविध कार्यामध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणारे अरुणराव चाळक हे उमदे नेतृत्व असून किनगावचे सरपंच व मोठे उद्योजक म्हणून लौकिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांचे विश्वासू असलेले अरुणराव चाळक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
          येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराची आत्ताच हवा गुल झाली असून आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे लक्षात येते. चाळक यांची भारतीय जनता पक्षाच्या दिशेने वाटचाल असल्याचे संकेत असून गेवराई तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून राष्ट्रवादीचे नेते देखील हवालदिल झाल्याचे लक्षात येते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment