तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 30 May 2019

साक्षात पांडुरंग परमात्‍म्‍याच्‍या समोर सेवा मिळणे हे जीवनातील सर्वात मोठे भाग्‍य- हभप विजयानंद महाराज आघावपरळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- परळी पंचक्रोषील भाविकांच्‍या वतिने श्रीक्षेत्र पंढरपुर येथील श्रीविठ्‍ठल रुक्‍मिणी मंदिरात अखंड हरिनाम सप्‍ताह तथा श्रीमद्‍ भागवत कथेचे दि 30/05/2019 ते दिले 5/06/2019 या कालावधीत आयोजन करण्‍यात आले असून या सप्‍ताहात पहिल्‍या दिवशी कथा निरुपण करताना हभप  विजयानंद महाराज बोलत होते. अनेक जन्‍मात केलेल्‍या पूण्‍याचा जेंव्‍हा उदय होतो तेंव्‍हा श्रीमद्‍ भागवत कथा श्रवणाचा लाभ होतो. या वेळी आपण ही कथा साक्षात पांडुरंगाच्‍या दरबारात साक्षात श्रीविठोबारायाच्‍या समोर कथा निरूपण, श्रवण करण्‍याची संधी मिळणं हे जीवनातील सर्वात मोठे भाग्‍य असल्‍याचे प्रतिपादन हभप विजयानंद महाराज यांनी केले. भक्‍ती, ज्ञान, वैराग्‍य, विवेक इत्‍याती अध्‍यात्‍मिक संज्ञांचे निरुपण महाराजांनी अत्‍यंत सोप्‍या भाषेत, सामान्‍यांना समजेल असे, वेगवेगळ्‍या शास्‍त्रांतील पुराव्‍यांच्‍या आधारे व वारकरी संतांच्‍या अभंगांचा आधार घेत केले. श्रीमद्‍ भागवताचे महत्‍व सांगत असताना कलीयुगात श्रीमद्‍ भागवत हे मुक्‍ती देणारं शास्‍त्र  कसं आहे या विषयीचं महाराजांनी केलेलं निरूपण श्रोत्‍यांच्‍या मनाचा ठाव घेऊन गेलं. उत्‍कृष्‍ठ भजन साथीत मुरलीआण्णा डाबीकर यांचे गायन श्रोत्‍यांच्‍या मनाला आनंद देत राहिले व त्‍यांना तबल्‍यावर जगदीश सोनवने,हार्मोनिअम वर श्रीनिवास बिरादार, सिंथसारजर वर दत्‍ता सोनवने यांनी सुंदर साथसंगत केली. पहिल्‍या दिवशी रात्रीची किर्तन सेवा हभप जगदीश म सोनवने यांची झाली. दि 31/05/2019 रोजी पंढरपुर येथील अजरेकर, अंबेकर फडाचे वारसदार,प्रगाढ अभ्‍यासक हभप कृष्‍णा महाराज चौरे यांची किर्तन सेवा होणार आहे. तरी,भाविकांनी हभप विजयानंद महाराज आघाव यांच्‍या मुखातुन चिंतनीय व रसाळ श्रीमद्‍ भागवत कथा श्रवणाचा तथा हभप कृष्‍णा महाराज चौरे यांच्‍या किर्तनाचा आस्‍वाद घ्‍यावा असे अवाहन -हभप मुरलीआण्णा डाबीकर, सिद्‍धेश्‍वर महाराज आंधळे, जगदीश महाराज सोनवने यांनी केले आहे..

No comments:

Post a comment