तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 May 2019

परळीत पाच वर्षीय बालिकेशी ५५ वर्षीय व्यक्‍तीचे अश्लील चाळे!


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
मानवी मूल्यांना पायदळी तुडवत एखाद्या हैवानारखे वर्तन असणारी घटना घडली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना परळीमध्ये घडली आहे. विकृत मनोवृत्तीच्या एका (55 वर्षीय) इसमाने अवघे पाच वर्षे वय असणाऱ्या चिमुकल्या बालिकेशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. आरोपी फरार असला तरी प्राथमिक स्तरावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 

शहरातील संभाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या उड्डाण पुलाखालील परिसरात एका अत्यल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. या बालिकेच्या शरीरावरील ओरखडे व खुणा दिसून आल्याने चौकशी केली असता, या मुलीने शेजारीच राहणार्‍या डोंगरे नामक व्यक्तीने घरात बोलावून घेतले तसेच शरीराशी छेडखानी केल्याचे तिच्या भाषेत माहिती सांगितली. ल्यावरुन तिच्याबरोबर गैरवर्तन झाल्याचे लक्षात आले. 

ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. या बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी  डॉक्टरांनी आवश्यक त्या तपासण्या केल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी सायंकाळी या पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार प्रथमदर्शनी आरोपींविरुद्ध कलम 354 नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय पठाण हे करीत आहेत. 

दरम्यान सध्या आरोपी फरार झालेला आहे. मात्र पोलिस तपास करीत असून, लवकरच आरोपीला ताब्यात घेतले जाईल. तूर्तास प्रथमदर्शनी या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय आहवाल व तपासातून निष्पन्न होणाऱ्या बाबीप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल, असे संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले.  

No comments:

Post a comment