तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 May 2019

परळीत आज गोपीनाथ गडावरील कार्यक्रमाचे नियोजनासाठी भाजपाची महत्वाची बैठकसर्व आघाड्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन-रवि कांदे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पांचव्या स्मृतीदिना निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठवाड्यातील भाजपा-शिवसेना युतीचे सर्व नवनिर्वाचित खासदार,  ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्यासह आदी मान्यवर  येत्या ३ जून रोजी गोपीनाथ गडावर उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आज गुरुवारी परळी विधानसभा मतदारसंघ भाजपाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पक्षाच्या सर्व आघाडीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व बुथ प्रमुख यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे तालुका सरचिटणीस रवि बंकटराव कांदे यांनी केले आहे.


       गुरुवार दि. 30 मे रोजी सायंकाळी 5 वाजता यशःश्री बंगला येथे या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 3 जुन रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहूणे उपस्थित राहणार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री प्रा राम शिंदे, ह. भ. प. रामराव महाराज ढोक , मराठवाड्यातील भाजपा शिवसेना युतीचे सर्व नवनिर्वाचित खासदार तसेच जिल्हयातील सर्व आजी माजी आमदार, महत्वाची नेते मंडळी व कार्यकर्तेसह मान्यवरांच्या उपस्थितीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा स्मृतिदिन साजरा केला जाणार आहे.  वैद्यनाथ साखर कारखाना परिसरातील गोपीनाथ गड येथे हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. यासाठी लाखो नागरिक येणार असून सर्वांची चांगली व्यवस्था व्हावी म्हणून कार्यक्रमाच्या तयारीसाठी या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या बैठकीला परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, गटप्रमुख, चेअरमन, सरपंच, उपसरपंच  सर्व शासकीय समित्यांचे पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख,  प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व बुथ प्रमुख  पदाधिकारी  यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे तालुका सरचिटणीस रवि कांदे यांनी केले  आहे.

No comments:

Post a comment