तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 May 2019

शरद पवार साहेबांनी शब्द पाळला, जिल्ह्याची तहान भागविण्यासाठी बारामती धावली!


चाळीस हजार लीटर क्षमतेचे 21 पाण्याचे टँकर दाखल;

 ना.धनंजय मुंडे, रोहित पवारांच्या  उद्या शुभारंभ

प्रतिनिधी
बीड:-जिल्हा गेल्या चार वर्षा पासून दुष्काळाच्या आगीत होरपळत आहे, जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून  दुष्काळात तडफडणार्‍या लोकांकडे लक्ष्य द्यायला सरकारला वेळ नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  जिल्ह्याचा दुष्काळी दौरा करत नवगण राजुरीच्या छावणीवर शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेत आधार देण्याचेे आश्वासन दिले होते. यावर त्यांनी शेतकर्‍यांचे प्रश्न घेवून मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. सरकारला दुष्काळात होरपळणार्‍या माणसांना मदत करण्यासाठी सत्तेच्या खुर्चीत बसणार्‍यांना पाझर फुटला नाही परंतु शरद पवार साहेब मात्र बीडकरांच्या मदतीला धावून आले आहेत. पवार साहेबांनी दिलेला शब्द पाळत जिल्ह्याची तहान भागविण्यासाठी 40 हजार लिटर क्षमतेचे 21 पाण्याचे टँकर दिले आहेत. सदर पिण्याच्या पाण्याचे 21 टँकर जिल्ह्यात दाखल झाले असून आणखी काही टँकर लवकरच दाखल होणार आहेत.  याचा शुभारंभ उद्या राष्ट्रवादी भवन येथे सकाळी 10.00 वाजता राज्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा बारामती अ‍ॅग्रोचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.बीड जिल्ह्यातील जनतेची तहान भागविण्यासाठी सरकारला तर जाग आली नाही परंतू बारामती मात्र धावली अशा प्रतिक्रिया जिल्ह्यातील जनतेतून व्यक्त होवू लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार साहेब यांनी काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्याचा दुष्काळी दौरा केला. यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा बारामती अ‍ॅग्रोचे अध्यक्ष रोहित पवार, यांच्यासह जिल्ह्यातील नेतेमंडळी उपस्थित होती.शरद पवार साहेबांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या, छावणी चालकांचे प्रश्न समजून घेतले. शासनाकडून लोकसंख्येनुसार टँकरने पाणीपुरवठा केला जात नसल्याने पाण्यासाठी प्रचंड ओरड होत असल्याचे चित्र समोर आले. ‘साहेब गढूळ पाणी प्यावे लागते तेही भरपूर मिळत नाही, जनावरांचे तर हाल होतातच माणसांचेही पाण्यासाठी हाल होतायत.’सरकारला काही देणे घेणे नाही तुम्हीच आता आमचे आधार व्हा, सरकारला जागे करा अशी हाक नवगण राजुरीच्या मळ्यातील शेतकर्‍यांनी दिली.यावर शरद पवार साहेबांनी सकारात्मक दृष्टीाकोनातून शेतकर्‍यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांच्या कानी टाकल्या,परंतू सरकार मात्र दुष्काळात होरपळणार्‍या लोकांसाठी जागे झाले नाही. सरकार मदत करेल की नाही याची वाट न बघता शरद पवार साहेबांनी नवगण राजुरीच्या छावणीवर दिलेला शब्द पाळत जिल्ह्याची तहान भागविण्यासाठी बारामती येथून जिल्ह्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचे टँकर दिले आहेत. पवार साहेबांनी दिलेल्या या पाण्याच्या टँकरमुळे नक्कीच जिल्हावासियांची तहान भागणार असून लवकरच आणखी काही टँकर जिल्ह्यात दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a comment