तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 28 May 2019

शेतक-यांना दुष्काळ अनुदानाचा दुसरा टप्पा वाटप करा;राविकाँचे जिल्हाबँकेला निवेदन

प्रतिनिधी
पाथरी:-पाथरी तालुक्याती शेतक-यांनी  जिल्हामध्यवर्ती बँक शाखा पाथरी अंतर्गत येणा-या  विविध गावांतील शेतक-यांना  दुष्काळ अनुदानाचा दुसरा टप्पा त्वरीत वाटप करावा अन्यथा राविकाँ च्या वतिने आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष कार्तिक धुंबरे यांनी निवेदना व्दारे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या शाखा व्यवस्थापकांना बुधवार २९ मे रोजी दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहेकी, तालुक्यातील शेतक-यांना  दुष्काळ अनुदानाचा निधि प्राप्त झालेला असून पहिल्या टप्याचेअनुदान वाटप आपल्या बँक शाखेच्या वतीने शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले.मात्र अजून ही दुसऱ्या टप्याचे दुष्काळ अनूदान अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही.या वर्षी तालुक्यात सर्वत्र दुष्काळ असून शेतकरी शेत मशागत आटोपत आहेत.येत्या खरीप हंगामा साठी संकटातील शेतक-यांना  बी-बियाणे,खते खरेदी साठी आणि शाळा, महाविद्यालयाच्या शैक्षणिक शुल्क भरण्या साठी या रकमेचा उपयोग होऊ शकतो अन्यथा शेतकरी खाजगी कर्ज काढतो. त्या मुळे शासनाच्या वतीने शेतक-यांना  देण्यात आलेल्या दुष्काळी अनुदानाचे आपल्या शाखे अंतर्गत असलेल्या तालुक्याच्या विविध गावातील शेतक-यांना  त्वरीत वाटप सुरू करावे अशी विनंती करण्यात आली असून अनुदान वाटप सुरू न केल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शेतक-यां सह बँके विरोधात लोकशाही मार्गाचा अवलंब करत आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.या वेळी या बँकेचे व्यवस्थापक टोनगे यांच्याशी राविकाँ पदाधिकारी यांनी चर्चा केली असता सद्या निराधारांचे अनुदान वाटप सुरू आहे या आठवड्यात हे वाटप संपल्या नंतर पुढील आठवड्यात दुष्काळ अनुदानाचा दुसरा टप्पा वाटप सुरू करणार असल्याचे टोनगे यांनी सांगून सर्वांनी वाटपास सहकार्य करावे असे आवाहन केले.या वेळी प सं सदस्य अजय थोरे, राविकाँ शहराध्यक्ष अमोल भाले,वक्ता सेल तालुकाध्यक्ष सुनिल जाधव,देवनांद्रा चे उपसरपंच प्रताप टेकाळे, राविकाँ तालुका उपाध्यक्ष भागेश पांचाळ, मोहन गोंगे, रायुकाँ शहराध्यक्ष खालेद शेख, राअकाँ सेलचे शहराध्यक्ष अहेमद अत्तार, माऊली काळे, गोविंद रणेर, सोपानराव सोगे आणि राकाँ कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment