तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 30 May 2019

फसवणुक प्रकरणीतील तीघांची बीडच्या कारागृहात रवानगी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी):-  
    शहरातील अरुणोद्दय मार्केट मधील चार दुकाने नावांवर करुन देतो म्हणून 31 लाख रुपयें उकळुन फसवणुक  करणार्‍या तीसर्‍या आरोपीस परळी शहर पोलिसांनी बुधवारी नांदेड येथे ताब्यात घेऊन अटक केले. या पुर्वी सोमवारी दोघां जणांना पोलिसांनी अटक केले होते. या तीन्ही आरोपींना अंबाजोगाईच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली बुधवारी तीन्ही आरोपींची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. 
    येथील राजेश झंवर यांना अरुणोद्दय मार्केट मधील चार  दुकाने विकत देतो म्हणुन बालकिशन मुरलीधर बाहेती, श्रीकिशन मुरलीधर बाहेती व दिपक बालकिशन बाहेती या तीघांनी 31 लाखां रुपयाला फसविले या प्रकरणी झंवर यांनी गेल्या महिन्यात परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. परंतु अनेकांना गंडा घालुन परळीतुन फरार झालेल्या तीघांच्या शहर पोलिसांनी मात्र मुसक्या आवळल्या. सोमार दि.27 रोजी बालकिशन बाहेती व श्रीकिशन बाहेती यांना अटक केली होती. दिपक बाहेती यास बुधवारी पोलिसांनी पकडले.   या तीघांना बुधवारी अंबाजोगाईच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात पोलिसांनी हजर केले. न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. बीडच्या कारागृहात तीघांची रवानगी केली.

No comments:

Post a comment