तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 May 2019

सरस्वती विद्यालयातील १९७७ च्या बँचचे विद्यार्थी ४२ वर्षानंतर एकत्र


परळी वैजनाथ  दि.२९ (प्रतिनिधी) :- 
         येथील सर्वात जुन्या सरस्वती विद्यालयातील १९७७ च्या बँचच्या विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी यांचा स्नेह मिलन कार्यक्रम येथे नुकताच पार पडला.
       शहरातील सर्वात जुन्या सरस्वती विद्यालयातील १९७७ च्या बँचचे वर्गमित्र तब्बल ४२ वर्षा नंतर एकत्र येवून स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वर्गमित्रानीं १९७७ नंतर कधीच भेट न, झालेल्या, वर्ग मित्रासाठी या, गाठीभेटीचा, दुर्मिळ क्षण, डोळ्यात सामावुन घेण्यासाठी शनिवार (ता.२५) व रविवारी (ता.२६) या दोन दिवशी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी परळीतील व बाहेरगावी असलेले सर्व मित्र अगदी वेळ काढून उपस्थित होते. परळीतील संयोजकांनी वर्गमित्रांच्या आगमनासाठी, सायंकाळी पाच वाजता "नवगण महाविद्यालयात" संगीत रजनीचे आयोजन केले होते.
परळीतील संयोजक आपल्या मित्रांची वाट पहात होते.जस जसा वेळ पुढे सरकत होता, बाहेरगावी असलेल्या मित्रांचे आगमन होत गेले व प्रत्येक जण प्रत्येकाशी हस्तांदोलन करत होते, काही जण, गळा भेठ घेवुन मैत्रीचा सुगंध ह्रदयात सामावून घेत होते.
या स्नेह मिलन सोहळ्या निमित्त शनिवारी (ता.२५) रात्री आठ वाजता नवगण काँलेज येथे "संगीत संध्याचा" कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या, दुर्मिळ भेटीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गुरूजणांना पण आमंत्रित करण्यात आले होते. प्रत्येक विध्यार्थी गुरूजणांनचे पदस्पर्श करत व आपला परिचय देण्यात सरसावला. या विलोभनीय दृश्याने वातावरण भारावून निघाले.संगीत संध्या कार्यक्रम वेळेवर सुरु झाला. या वेळी आयोजकांंनी सह भोजनाची व्यवस्था केली होती. या भोजणाचा गुरुजणासह, विध्यार्थी व त्यांच्या बरोबर आलेल्या सह जोडीदार यांनी स्वाद घेतला.
स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने दुसऱ्या दिवशी.. रविवारी (ता.२६) सकाळी आपल्या शाळेत म्हणजे सरस्वती विद्यालयात गुरुजणांनचा सत्कार समारंभ पारपडला. सर्व विद्यार्थ्यां तर्फे, संयोजक विध्यार्थी वर्गाने गुरुजण वर्गाचा सत्कार केला.नंतर राष्ट्र गिताचा कार्यक्रम घेवुन नंतर जे, शिक्षक व वर्ग मित्र, हयात राहीले नाहीत. अशांना श्रंद्धाजली अर्पण करण्यात आली. वर्गमित्रा पैकी उषा रूपदे, उज्वला शेळके, रामेश्वरबांगड, अंतेश्वर नरवणे, अचुत पवार,यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. गुरूजणांना मध्ये श्री. देशमाने, श्रीमती टाक, श्री. भावटनकर , पी एन देशपांडे या गुरुजणानी, आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सिद्धेश्वर तिळकरी तर आभार जयंत दिक्षित यांनी मानले.
नंतर शाळेत व्रक्ष रोपण कार्यक्रम झाला.

No comments:

Post a comment