तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 6 May 2019

कन्हेरवाडीचे कल्पना मुंडे एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथममहादेव गित्ते 
-----------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-  

परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील सर्वसामान्य कुटुंबातुन शिक्षण घेत. एमपीएससी परिक्षा दिलेली कु.कल्पना वसंत मुंडे ही राज्यातुन एमपीएससी कर सहाय्यक परिक्षेत मुलींमध्ये सर्वप्रथम आली आहे. तीच्या या यशाबद्दल सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे. 

सध्या रत्नागिरी येथील नगर पालिकेत कार्यरत असलेल्या कल्पना मुंडे यांनी जुन 2018 मध्ये एपीएससी कर सहाय्यक पदाची परिक्षा दिली होती. त्या परीक्षेचा आज दि.06 मे रोजी निकाल लागला असुन ती या परिक्षेत 118 गुण घेऊन राज्यातुन मुलीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील अत्यंत गरिब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कल्पना यांनी कन्हेरवाडी येथील जि.प.शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण परळी येथील महाविद्यालयात घेतले. अत्यंत चिकाटी व मेहनतीने अभ्यास करत रत्नागिरी येथील नगर पालिकेत  सेवा बजावत आहेत. कल्पना यांचे वडील वसंत मुंडे यांनी अ‍ॅटो चालवत अत्यंत हालखीच्या परिस्थितीत आपल्या मुलीचे शिक्षण पुर्ण केले. आज कल्पना महाराष्ट्रातुन मुलींमध्ये प्रथम आली आहे. तीच्या या यशाबद्दल सर्वस्तरातुन कौतुक होत आहे. 

9 comments:

 1. हार्दिक अभिनंदन

  ReplyDelete
 2. हार्दिक अभिनंदन

  ReplyDelete
 3. हार्दिक अभिनंदन पुढील कार्यासाठी शुभेच्छा🌷🌷🌹🌺

  ReplyDelete
 4. Wish you avery .congregation

  ReplyDelete
 5. हार्दिक अभिनंदन!
  💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  ReplyDelete