तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 30 June 2019

जिंतूरात वासवी माता व श्री रंगनाथ महाराज या दोन बचत गटाची स्थापनाजिंतूर
जिंतूर शहरातील आर्य वैश्य समाज युवकांची श्री नगरेश्वर मंदिर येथे बैठक होऊन त्या बैठकीत दोन बचत गटाची स्थापना करण्यात आली मार्गदर्शन करण्यासाठी आर्य वैश्य युथ महाराष्ट्र अध्यक्ष श्री सूर्यकांत कोकड परभणी हे आवर्जून उपस्थित होते
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अशोक चिद्रवार होते

श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या प्रतिमा पूजाने बैठक सुरू झाली 
बचत गटाच्या माध्यमातून समाज संघटन समाज प्रबोधन व समाजातील गरजवंताला योग्य वेळी आर्थिक मदत होण्यासाठी बचत गट स्थापन करणे कसे योग्य व फायद्याचे आहे याचे सखोल मार्गदर्शन श्री सूर्यकांत कोकड यांनी केले त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 
बचत गट स्थापन करण्याचा उद्देशाने स्थापन घेण्यात आलेल्या बैठकीत वासवी माता बचत गट जिंतूर व श्री रंगनाथ महाराज बचत गट जिंतूर या नावाने दोन बचत गट  स्थापन करण्यात आले
या बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्याचे ठरविण्यात आले बचत गट प्रमुख म्हणून स्वप्नील येरमवार व शंकर चिद्रवार यांची निवड झाली या वेळी 
मार्गदर्शक म्हणून
मा सूर्यकांत कोकड परभणी
मा संतोष गुंडाळे परभणी उपस्थित होते 
कार्यक्रम अध्यक्ष
मा अशोक चिद्रवार हजर होते व्यासपीठावर
मा सुनिल वट्टमवार 
मा प्रदिप कोकडवार
यांची उपस्थिती होती
संचलन व आभार स्वप्नील येरमवार यांनी मानले बैठकीत समाजातील सर्व युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा रोप वे होणार प्रतापगडावर जाण्यासाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावल


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई, दि. 30 : छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावर पर्यटकांना पोहोचण्यासाठी जावळी गाव (ता. महाबळेश्वर) ते प्रतापगड असा रोपवे होणार आहे. पर्यटन धोरण 2016 अंतर्गत या रोपवे प्रकल्पाला विशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या पुर्ततेनंतर पर्यटकांना किल्ले प्रतापगडावर जाणे सोपे होणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

हा रोपवे जावळी गाव (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथून सुरू होणार आहे. जावळी गाव ते लँडविक पॉईंट तसेच प्रतापगड असा हा 5.6 किमी लांबीचा विशाल रोपवे प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे भविष्यात प्रतापगडावर येणाऱ्या पर्यटकांना चढण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार असून गडावर जाणे सोयीचे होणार आहे. राज्यातील गडकोट किल्ले संवर्धनासाठी शासन व्यापक प्रयत्न करीत आहे. प्रतापगडावर होणारा रोपवे प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा प्रकल्प असेल. या रोपवेमुळे महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवात भर पडणार आहे. यामुळे पर्यटकांची संख्याही वाढणार असून छत्रपती शिवरायांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे, असे पर्यटन मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
स्वराज्याच्या इतिहासाचा किल्ले प्रतापगड हा दुर्ग महत्त्वाचा साक्षीदार आहे. इतिहास प्रेमी पर्यटकांची किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी असते. प्रामुख्याने शनिवार आणि रविवारी आणि सुटीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी जातात. प्रतापगडावर जाण्यासाठी घाटरस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र, गडावर जाण्यासाठी अरुंद घाटरस्ता असल्याने वाहतुकीची कोंडी होते. तसेच पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर पर्यटकांना प्रतापगडावर जाणे सोयीस्कर व्हावे यासाठी रोपवे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री श्री. रावल यांनी दिली.

तापमानावर मात करण्यासाठी राज्यात वृक्षारोपण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. उमरेड येथील वृक्षदिंडी समारोपास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती


बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी राज्यात वृक्षारोपण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वन विभाग गेल्या पाच वर्षांपासून चांगले काम करत असून, हरित महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्यातील जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. उमरेड येथे वृक्षदिंडी कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वने राज्यमंत्री डॉ.परिणय फुके, नगराध्यक्षा श्रीमती विजयालक्ष्मी भदोरिया, खासदार कृपाल तुमाने, सर्वश्री आमदार प्रा.अनिल सोले, गिरीष व्यास, नागो गाणार, रामदास आंबटकर, सुधीर पारवे, विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव हे उपस्थित होते.
राज्यात पूर्व विदर्भ हरित म्हणून ओळखला जातो. मात्र आता पूर्व विदर्भातही गेल्या काही वर्षांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून अगदी 47 अंश सेल्सीअसच्याही पुढे जात आहे. त्यामुळे आता हरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. राज्य शासनाने यंदा 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, या मोहिमेत सर्वजण सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षारोपण करतील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला. 

यापूर्वीही राज्य शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षारोपण केले आहे. आताही ते 35 कोटी वृक्ष लागवड केल्याशिवाय थांबणार नाहीत. दरवर्षी लावलेल्या झाडांपैकी 80 टक्के झाडे वाचतात. कारण त्या झाडांचे योग्य ते संगोपन आणि संवर्धन केले जात आहे, त्यांना जिओ टॅगींगही केले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.वातावरणातील वाढत्या तापमानाची मोठी समस्या निर्माण होत असून, आता सर्वांनीच वृक्षारोपण करणे आवश्यक झाले आहे. पर्यावरण असंतुलनाची विविध कारणे असली तरी त्यामध्ये प्रामुख्याने वृक्षतोड ही आहे. वाढत्या प्रदूषणाचे संकट हे अतिरेकी स्वरुपाचे असून, वृक्ष लागवड करूनच, पर्यावरणपूरक विकास करताना प्रदुषणावर मात करुया, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार सुधीर पारवे यांनी अनेक विकासकामांच्या मागणीचा प्रस्ताव ठेवला आहे. ती कामे येत्या काळात पूर्ण होतील आणि उमरेड शहरात सत्र न्यायालयाची इमारत पूर्ण करण्यासाठीआवश्यक निधी दिला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी “जल है तो कल है” म्हणत, वृक्ष लावा हा वनाचा उपदेश आज राज्यातील प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचला आहे. 33 कोटी वृक्षारोपण व संवर्धन हा संकल्प पूर्ण करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. तसेच पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे आज वृक्षारोपण करणे काळाची गरज बनली असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.  1 ते 31 जुलै या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात वृक्ष लागवडीचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषीत केला. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेने वृक्षारोपणाचे महत्व जाणून, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे, यासाठी ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन या संस्थेकडून पूर्व विदर्भात वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. त्या वृक्षदिंडीचा समारोप आज उमरेड येथे करण्यात आला.
वाढते शहरीकरण, औद्योगिकरणामुळे मानवाचा विकास होत असताना  वृक्षतोड झाली. त्यामुळे पाऊस हा अनियमित आणि लहरी झाला असून, प्रत्येकाने एकतरी वृक्ष लावण्याचे आवाहन खासदार कृपाल तुमाने यांनी केले.
प्रास्ताविक करताना आमदार अनिल सोले यांनी निसर्गाकडून प्राणवायू मिळत असून, निसर्गाची परतफेड करायची असेल तर वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करा, असे आवाहन केले. आमदार सुधीर पारवे यांनी वन विभागाच्या तीन एकर जमिनीवर 900 च्या वर वृक्षारोपण करण्यात आले असल्याचे सांगितले.
यावेळी नागरिकांचा विशेष कार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मुग्धा या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचनही करण्यात आले.

परळी नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये- .प्रा.पवन मुंडे
परळीत अस्वच्छतेचा कळस,स्वछतेसाठी महिन्याला होणारा 18 लक्ष खर्च कोणाच्या घशात

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी नगर पालिकेने शहराच्या स्वच्छतेचे वाटोळे केले असून,परळीत जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे,परळी नगर पालिका महिन्याला जवळपास 18 लक्ष खर्च करते पण स्वछतेची कामे मात्र कोठे ही झालेली दिसत नाहीत, शहरातील ज्या नाल्या पूर्वी चार दिवसाला काढल्या जायच्या त्या नाल्या आता चार महिन्याला सुद्धा काढल्या जात नाहीत आणि एखाद्या वेळेस काढलेल्या नाल्यांचा कचरा परत उचलला जात नाही तो परत नालीत जाऊन पडतो आशा निष्क्रिय पणा मुळे आणि या अस्वच्छतेणे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले  या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ,मग नगरपालिकेचा महिन्याला स्वच्छता वरील खर्च नेमका कुठे जातो असा सवाल भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केला आहे.
       या वर्षी सुदैवाने  शहरात पावसाला थोडी का होईना सुरुवात झाली आहे पण पडत असणाऱ्या पावसाच्या पाण्याने या कचऱ्याचा घाण व कुबट वास सुटला आहे परिणामी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,या मुळे अनेक बालके व वृद्ध आजारी पडत आहेत,नागरिकांच्या आरोग्याशी नगर पालिका किती दिवस खेळणार असा सवाल या प्रसंगी भाजपा नगरसेवक  प्रा पवन मुंडे यांनी केला आहे
मान्सून पूर्व स्वछतेची कामे अपूर्ण झाल्या मुळे जिकडे तिकडे कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत तसेच शहरातून वाहणाऱ्या मोठ्या नाल्यांची स्वच्छता न केल्या मुळे शहरातील सर्व मोठे नाले हे कचऱ्याने भरून वाहत आहेत,येणाऱ्या काळात मोठा पाऊस आला तर या नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घरात शिरण्याची शक्यता आहे, अनेक भागात नाल्या न काढल्याने त्या कचऱ्याने तुडुंब भरलेल्या आहेत त्या मुळेंत्या नाल्यातील पाणी तुंबून त्या ठिकाणी मोठया प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊन परीसरात रोगराई चे वातावरण निर्माण झाले आहे.लोकांच्या सहनशीलतेचा अंत नगरपालिकेने पाहू नये,नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार नगरपालिकेला कोणी दिला असा प्रश्न प्रा पवन मुंडे यांनी उपस्थित केला आहे

कुटूंबासह स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था अभिषेक फॅमिली रेस्टॉरंटच्या माध्यमातून होईल राजेश विटेकर, बाजीराव धर्माधिकारी, विठ्ठलराव सुर्यवंशी व मान्यवरांचे प्रतिपादन


परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :-  परळी शहरात अंबाजोगाई रस्त्यावर शंकरपार्वती नगर भागात नव्याने सुर्यवंशी परिवाराने सुरु केलेल्या अभिषेक फॅमिली रेस्टॉरंट परळी व परिसरातील नागरीकांसाठी निवांतपणे भोजनाची उत्तम व्यवस्था मिळेल व दर्जाच्या कसोटीवर हे रेस्टॉरंट ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असे प्रतिपादन परभणी जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर व मान्यवरांनी केले. 
सर्यंवशी परिवाराच्या वतीने शंकर पार्वतीनगर, महिंद्रा शोरुम अभिषेक (ए.सी.)फॅमिली रेस्टॉरंट सुरु करण्यात आले आहे. या रेस्टॉरंटचा शुभारंभ परभणी जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, विठ्ठलराव सुर्यवंशी, जि.प.सदस्य बबनदादा फड, राजेश जाधव, लक्ष्मीकांतराव देशमुख, पालम पं.स.सभापती रत्नाकर शिंदे, सोनपेठ भाजपा तालुकाध्यक्ष महादेव गिरे, प्रभाकर सिरस्कर, आदींची उपस्थिती होती. यावेळी राजेश विटेकर, बाजीराव धर्माधिकारी, विठ्ठलराव सुर्यवंशी, राजेभाऊ जाधव आदींनी शुभेच्छा दिल्या. प्रारंभी अभिषेक (ए.सी.)फॅमिली रेस्टॉरंटचे वैजनाथ सुर्यवंशी, ऍड.सुरेंद्र सुर्यवंशी, अमोल सुर्यवंशी, दिनकर सुर्यवंशी, केशव सुर्यंवशी, शिवाजी सुर्यवंशी, रवि साबळे, पांडूरंग सुर्यवंशी आदींनी प्रमुख पाहूण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमांचे संचलन वैशाली रुईकर व आभार प्रदर्शन परभणी जि.प.सदस्य दशरथ सुर्यवंशी यांनी केले.

शेळीने दिला सहा पिलांना जन्म
किरण घुंबरे पाटील
पाथरी:-निसर्गाची लिला काही औरच असते नेहमी एक,दोन,तीन आणि अपवादात्मक वेळी चार पिलांना जन्म दिलेल्या शेळी विषयी एैकण्यात आले असेल मात्र रविवारी देवनांद्रा येथील माणिक शिंदे यांच्या शेळीने चक्क सहा पिलांना जन्म घातला यात पाच बोकड,असून एक पाट आहे.या विषयी गावात माहिती मिळताच हे कुतूहल पाहाण्या साठी शिंदे यांच्या कडे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे

Saturday, 29 June 2019

अभिषेक फॅमिली रेस्टॉरंटचा आज ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरातील कौटुंबिक आनंदासाठी नव्याने सर्व सुखसोयी व खाद्यपदार्थांच्या सुविधेसह उभारण्यात येत असलेल्या अभिषेक फॅमिली रेस्टॉरंटचा आज दि.३० जून रोजी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.
परळी-अंबाजोगाई रोडवरील शंकरपार्वतीनगर, महिंद्रा शोरुम, अंबाजोगाईच्या समोर नव्याने अभिषेक (ए.सी.) व्हेज अँड नॉनव्हेज या रेस्टॉरंटचा आज रविवार, दि.३० जून रोजी विधानपरिषद विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते दुपारी १२.११ वा. शुभारंभ होत असून या कार्यक्रमास परभणी जि.प.चे मा.अध्यक्ष राजेश विटेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे परळी शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी परभणी जि.प.चे सभापती विठ्ठलराव सुर्यवंशी, जि.प.सदस्य बबनदादा फड, कोपरगावचे रमेशभाऊ जाधव, यांची उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमास परळी शहरातील नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वैद्यनाथ सुर्यवंशी, ऍड.सुरेंद्र सुर्यवंशी, अमोल सुर्यवंशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विजेच्या धक्क्याने पुन्हा एकदा माकडाचा मृत्यूमंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजारची घटना

मंगरुळपीर-दि.३० जुनच्या  सकाळी शेलुबाजार येथे एका माकडाला विजेच्या जोरदार धक्का  लागला व ते माकड विजेच्या पोल वरून खाली पडले.  सदर माहिती वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळपीर शाखा वनोजा चे सदस्य आदित्य इंगोले यांना मिळताच ते तत्काळ त्यांचे सहकारी आकाश कांबळे यांच्या सोबत घटनास्थळी दाखल झाले. सदर माकड शेलुबाजार येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात असलेल्या विजेच्या पोलवर चढले होते. व तेव्हाच वीजप्रवाह सुरू झाला. त्यामुळे सदर माकडाला विजेचा जोरदार धक्का बसला. यावेळी आदित्य इंगोले यांनी तत्काळ घटनास्थळी  जाऊन पाहणी केली. कि ते माकड जीवंत आहे का पण तोपर्यंत खुप ऊशीर झाला होता. यानंतर याची माहिती कारंजा-मंगरूळपीर वन परिक्षेत्राचे वनधिकारी मा. श्री. अरविंद इडोळे व वाशिम जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे यांना देण्यात आली. माहिती वरून वनोजा परिक्षेत्राचे वनरक्षक श्री. देवकाते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. व नंतर टिम च्या सदस्यांच्या मदतीने माती देऊन माणुसकी चा परिचय करून दिला. यावेळी वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळपीर शाखा वनोजा चे आदित्य इंगोले, आकाश कांबळे, वैभव गावंडे तसेच वनविभागाचे वनरक्षक श्री. देवकाते व वनमजुर किसन राठोड उपस्थित होते.येत्या काळात विजेच्या धक्क्याने वन्यजीवांच्या मृत्यू मध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसा आधी वनोजा येथे सुध्दा एक माकड विजेच्या धक्क्याने मृत झाले होते.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

नाशिक विभागीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार-२०१९ यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.


धुळे प्रतिनिधी 
धुळे:-धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटी तर्फे आयोजित भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने तसेच शिक्षक दिनाचे अवचित्त साधून पुरस्कारासाठी या वर्षापासून नाशिक विभागीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार- २०१९ या पुरस्कारासाठी धुळे,जळगाव, नंदुरबार,नाशिक,अहमदनगर या जिल्ह्यातील कलाशिक्षकांकडून या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.नाशिक विभागीय आदर्श कलाध्यापक पुरस्कारासाठी ७५ कलाध्यापकांची निवड केली जाणार आहे.त्यासाठी खालील दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा.राहुल एच.पाटील,संस्थापक अध्यक्ष,धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटी,नगांव ता.जि.धुळे-४२४००५ या पत्त्यावर पाठवावे सदर पुरस्कारासाठी अर्ज पाठवावयाची अंतिम दि.२० जुलै २०१९ आहे.तरी वरील दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.अधिक माहितीसाठी What's app मो. क्र.:-8275007911/9561737067 या क्रमांकावर संपर्क साधावा.जे कलाध्यापक यांनी शैक्षणिक व सामाजिक तसेच सांस्कृतिक, चित्रकला क्षेत्रात कार्यरत असतील त्यांनी या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे. वरील पैकी आपण कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असाल तर आपण केलेल्या कार्याची माहिती उदा.फोटो, वर्तमानपत्रातील कात्रण, व्हिडीओ इ.स्वरूपात संयोजकापर्यंत दिलेल्या मुदतीत वरील What's app नंबर वर पीडीएफ फाईल स्वरूपात तयार करून पाठवावी.यावेळी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्याला पुरस्कारासाठी अर्ज सादर करता येणार आहे.असे आवाहन धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राहुल एच.पाटील,सचिव शशिकांत पाटील,उपाध्यक्ष योगेश वाघ,सरचिटणीस संभाजी बोरसे, सहसचिव मोहन सुळ,मार्गदर्शक वासुदेव शेलकर,चित्रकार विशाल निकम,सुरेश निकुंभ यांनी केले आहे.

वादळात जमिनदोस्त झालेल्या सिमेवरील जवानाच्या केळीचा महिणाभरा नंतर ही पंचनामा होईना;निवेदनाचा कागद घेऊन फिरतोय प्रशासनाच्या दारी

किरण घुंबरे पाटील
पाथरी:-जुन महिण्यात झालेल्या वादळात लोणी बु. शिवारातील शेतात वादळी वा-याने आसामात कार्यरत असलेल्या जवानाच्या उभ्या केळी जमिनदोस्त झाल्या या विषयी तहसिल प्रशासनाला निवेदन दिल्या नंतर आज पर्यंत ही या केळी पिकाचा पंचनामा न झाल्याने निवेदनाचा कागद घेऊन सुट्टीवर आलेला हा जवान महसुल प्रशासनाच्या दारी फिरत आहे.
जुन महिण्यात चार तारखेला सायंकाळी वादळी वारे झाल्याने लोणी बु. शिवारातील मुलीधर बालासाहेब धर्मे,प्रल्हाद बालासाहेब धर्मे यांच्या गट क्र ३१७ या शेतातील दोन एकर केळीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते या वेळी गावचे तलाठी श्रीनिवास तायनाक यांना या विषयी कल्पना दिली त्या नंतर तहसिलदार यांना गावातील भागवत रतनराव सौदरे,विठ्ठल रामकिशन काळे, लिंबाजी तान्हाजी कोरडे, नारायण मारोती खुपसे,या सह अन्य नुकसान झालेल्या शेतक-यांनी निवेदन दिले होते मात्र महिणा होत आला तरी या केळी पिकांचे पंचनामे केले गेले नाहीत या विषयी परभणी जिल्हाअधिकारी यांनी १३ जुन रोजी तालुक्यात झालेल्या पाऊस व वादळी वा-यातील फळ पिकांचे झालेल्या नुकसानिचे पंचनामे गावनिहाय संयुक्त पणे करून तात्काळ अहवाल या कार्यालयास द्यावा असे आदेश काढल्या नंतर पाथरी तहसिलदारांनी तलाठी, कृषी सहायक,ग्रामसेवक यांनी संयुक्त पंचनामे करून दोन दिवसात अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले होते. विलंब झाल्यास नैसर्गिक आपत्ती अधिनियम २००५ नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करणार असल्याचे पत्र दिले होते. या वेळी तलाठ्या सह कृषी सहायक,ग्रामसेवक यांनी पंचनामे केले नसल्याने शनिवार २९ जुन रोजी लोणी बु.येथील सैन्यात असलेला जवान मुरलीधर बालासाहेब धर्मे यांच्या सह प्रल्हाद बालासाहेब धर्मे, भागवत रतनराव सौदर्ये, विठ्ठल रामकिशन काळे, लिंबाजी तानाजी कोरडे,नारायन मारोती खुपसे, रघुनाथ नागोराव शिंदे आदी केळीचे नुकसान झालेल्या शेतक-यांनी निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

Friday, 28 June 2019

मराठी माणसाला सेनेनेच हद्दपार केले कपिल पाटील यांची घणाघाती टीका


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई, दि. 28 जून - 
मुंबई महापालिकेत ज्यांची सत्ता आहे, त्यांनीच मराठी माणसाला मुंबईतून हुसकावून लावलं आहे. बदलापूरच्या हद्दीत ढकललं आहे.  शिवसेनेच्या हाती सत्ता आहे. पण मुंबई महापालिका मराठीत बोलत नाही. मराठीत व्यवहार करत नाही. मराठी भाषेचं आणि मराठी माणसाचं सर्वात जास्त नुकसान मराठी भाषेच्या नावाने सत्तेवर आलेल्यांनीच केलं आहे, अशी घणाघाती टीका लोक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी आज विधान परिषदेत केली. 
मराठी भाषा सक्तीचा कायदा शाळांच्या आधी महापालिका आणि राज्यकारभाराला लावा अशी मागणी त्यांनी आज विधान परिषदेत केली. मुंबईतील 190 प्राथमिक मराठी शाळांना सेनेची सत्ता असलेली महापालिका एक रुपयाही अनुदान देत नाही. मराठी शाळा बंद करून, मराठी भाषा भवन बांधण्याची दांभिक मागणी बंद करा. अभिजात दर्जा मिळेल तेव्हा मिळेल. बहुजात मराठी संपवण्याचा डाव आधी बंद करा, अशी मागणी कपिल पाटील यांनी केली. 
मराठीसाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी द्या. मराठी शाळांना 100 टक्के अनुदान द्या. सर्व मराठी शाळा बाय लिंगवल करा. इतर बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांत 1ली पासून मराठीची सक्ती करा. शाळांना वेतनेतर अनुदान द्या. बोली भाषांचं संवर्धन आणि संरक्षण करा अशा मागण्या त्यांनी केल्या.
अहिराणी, खान्देशी, माडिया, गोंडी, गोरमाटी, मालवणी, वऱ्हाडी, सामवेदी, वाडवळी आदी बोली भाषांच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापित  करा. मराठी दुर्बोध झाल्याने मुलं अन्य भाषा शिकतात याकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितलं मराठी विषय स्कोअरिंग व आनंददायी करावा. रोजगार निर्मिती मराठी केंद्रित करण्यासाठी उपयोजित मराठी विषय सुरू करावा. त्रिभाषा सूत्रात विविध भाषांचे पर्याय द्यावेत.

कुशल सांस्कृतिक कलेचा उपाशक बारा-बलुतेदारांची व्यथा


बाळू राऊत प्रतिनिधी 
 मुंबई :कुशल कौशल्य विकास म्हणजे काय........? देशाच्या  सामाजिक, सांस्कृतीक कलेच्या माध्यमातून उपजीविकेच्या रचनेतील पिढ्यानपिढ्या कुशल कर्म करत राहणारयांच्या हाताना,अवयवाना कलेतील साचेबद्ध कामाच्या सवईतून सततच्या कर्माने कुशल कौशल्यातुन पैलूंना चालना मिळवतो. सुक्ष्म अवजाराच्या तंत्रापासून साकार होणारे कर्म नसानसात भिड़ते आणि त्याची स्मूर्ती मेंदुच्या एका कप्प्यात विकसित होते तेथून विश्वकर्मियांना पारंपारीक सांस्कृतीच्या कर्मातून कलेच्या आविष्कार प्राप्त होतो. तो असाच नाही प्राप्त होत, त्यासाठी परंपरागत पिढ्यानपिढ्या कर्माच्या योगदानातून जी कला हस्तगत होते, तो त्या कुशल कौशल्याचा कर्मकर्ता,कारागीर होतो.त्याकर्मातून मिळालेल्या मोबदल्यात उदरनिर्वाह करतो त्याला विश्वकर्मीय,बलुतेदार,अलुतेदार कारागिर वर्ग म्हणून संबोधले गेले.त्याचेच रूपांतर पारंपारिक,वैचारिक बांधणीत ह्या वर्गाना कौशल्य निहाय कर्मानुसार जातींचे स्वरुप निर्माण झाले.ते उदरनिर्वाहाच्या कर्मकांडात  सातत्याने आपापल्या कर्मात कुशलतेत प्रावीण्य प्राप्त करत असलेल्या उद्योगाचेक दावेदार झालेत. उद्योगाच्या स्वरूपातुन सामजिक व्यवस्तेत जातिय वर्गीकरण झालीत.त्या आताच्या नव्हे तर हजारो वर्षापुर्वी युग-युगांतरापासून कर्म करत असलेले कुशल-कौशल्य जाती आहेत त्यांना पुरावा देण्याची अवश्यकता नाही.शासने त्यांना वरील सांस्कृतिक आधारावर सरळ त्याच्या क्षेत्राशी संलग्न कारागीर जातींना निरीक्षनामार्फहात मुलाखतीतून   कुशल कारागीर म्हणून कौशल्य विकासांतर्गत प्रमाणपत्र देऊन नोकर भरतीत विना निकस नोकरी द्यावी व उधोगासाठी एम आय डी सित उधोगनिहाय माफक दरात भूखंड देऊन बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. शाहूमहाराजानी बाराबलुतेदारांना राज्यभर प्रत्येक गावात उधोगासाठी व राहण्यासाठी जागा दिल्या होत्या त्यांना आज सुतार वाडा,राज वाडा,चामभार वाडा,मांग वाडा,लोहार वाडा,शिंपी वाडा,गुरव वाडा,कुंभार वाडा,धोबी वाडा,सोनार वाडा,कासार,तांबट व गल्ली,असे राज्यभर नावारूपाला आहेत परनु आज व्यवसायाला जागा  नसल्याने शासनाने भूकंड द्यावेत तेथूनच बारा-बलुतेदार विकास साधू शकतील*

     *जागतिक स्तरावर प्रत्येक देश्यात आर्किटेक्चर, इंजिनिअर, इन्फ्रास्ट्रक्चरपासून पुरातन वास्तु, राजवाडे, शस्रे,वाहने,मंदिरे, व गाव व्यवतेतिल मानवी उपजीवीकेची सर्वच कुशल कलात्मक        कौशल्यपूर्ण कर्म  करणारा वर्ग म्हणजेच विश्वकर्मीय जाती सुतार,लोहार,पाथरवट,तांबट,सोनार होय. चांभार,शिंपी,नाव्ही,धोबी,कुंभार,कोष्टी,महार,मांग,गुरव,वासुदेव/दोशी ह्या सर्व बाराबलुतेदार जाती होय,आज देश्याबरोबर प्रगत देशही कुशल कौशल्य तंत्रज्ञानाचा अभ्यास पूर्वक शिक्षणात समावेश करून सिव्हिल,मॅकॅनिकल,इलेक्ट्रिकल,आटो,मेटलकासस्टिंग,प्रॉडकशन,मशनरी,ड्रेस मेकिंग,लॉन्द्री इंडस्ट्री,लेदर इंडस्ट्री,रोफ/स्वीपर मटेरियल प्लास्टिक*इंडस्ट्री,फर्निचर,हार्डवेअर इंडस्ट्री,स्टील बिल्डिंग इरेकशनसारखे कोर्स आय टी, इंजिनिअरिंग,डॉक्टर क्षेत्रातील सर्वच शिक्षण कौशल्याचे जनक बाराबलुतेदार वर्गच आहेत.त्यांच्या कौशल्यातून विकास साधताना सामाजिक अवस्थेतुन ह्या कौशल्याच्या जनकास विशेष सवलतीतून वरील क्षेत्रारात स्किल इंडिया अंतर्गत वाव मिळाल्यास देश्याचा प्रगतीस जागतिक स्पर्धेत मेक इन इंडियाला चालना मिळू शकेल

      गाव निहाय तर परिसर निहाय फिरुन गरजेच्या वास्तु तयार करून पुरवणारा आठरा-पगड जातींचे अलुतेदार मुळात हे वर्ग कुशल आहेत,यांच्या बरोबर देशाच्या विकासात विश्वकर्मीय,बलुतेदार शेती, कारखाने, इन्फ्रास्ट्रक्चर ह्या क्षेत्रात हाच वर्ग कार्यरत होता आजही आहेत, कारण तो कुशल आहे. आपल्या कर्मात गुरफटलेला असल्यामुळे ते शिक्षण स्पर्धेत तग धरु शकले नाहीत.पर्यायी आर्थिक सक्षम होउ शकले नाहीत. उधोग, मायक्रो इंडस्ट्री पासून मोठया इंडस्ट्री पर्यंत हा कारागीर वर्ग कार्यरत असल्याने ते देश्याच्या विकासात कणा बनले आहेत.ह्या वर्गान्ना  कोणी वाली नव्हते,प्रतिनिधी नव्हते. परन्तु जाणताराजा शिवरायांनी बारा-बलुतेदार व अठरा अलुतेदाराना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. कारण ग्रामीण भागातील गावांमध्ये शेतकऱयांना गावगाडा चालवण्यासाठी ह्या वर्गाशिवाय राज्यांची प्रगती नाही. लहान उद्योजकांमुळेच मोठे उद्योजक प्रगती करु शकतात.हे जाणून त्याकाळी शिवाजी महाराजांनी ह्या वर्गाचा उद्धार केला, परन्तु त्यांचे दुर्दैव्य हे कष्टकरी वर्ग असल्याने त्यांची सामाजिक, शैक्षणिक, आधोगिक व आर्थिक प्रगतिसाठी त्या काळात दुर्लक्षित राहिलेत

   देशअंतर्गत स्वातंत्र्यानंतर समाजरत्न बाबासाहेब आम्बेडकरानी शाहू महाराज, क्रांतिसूर्य जोतिबा फूले, सावित्रीबाई फुलेना गुरुस्थानी मानत होते. वंचित बहुजनांना समानतेच्या नाऱ्यातून कायदामंत्री असताना भारताच्या लोकशाही घटनेत इतर मागास जातींच्या गटात सामिल करून ३४० व्या कलमान्वये आरक्षण दिले.सरदार वल्लभ भाई पटेलांनी व सवर्णानी आरक्षणाला विरोध केला तेंव्हा बाबासाहेबानी मंत्रिपदाचा राजीनामा पटेलांना दिला तेंव्हा नाममात्र आरक्षण देण्याचे षड़यंत्र योजले.पुढे स्व.इंदिरा गांघी, स्व.व्ही.पी.सिंह,यांही आरक्षणाला मजबूती देण्याचे काम केले.तेथून दिलासा मिळत शिक्षण,नोकारित फायदा मिळाला.परंतू स्पर्धेच्या यांत्रिक युगात धनाड्यानी यांचे उधोग बळकावून बलुतेदातीतील मूळ कुशल कारागिराना काम शिल्लक ठेवले नाही.त्यांचा शासनात आज पर्यंत प्रतिनिधी नसल्याने त्यांची अवस्था फार बिकट झाली आहे त्यांना न्याय मिळणे देशहिताचेच राहील कारण तो कुशल कौशल्याधिस्ट आहे.
      
     बलुतेदारांच्या अवस्ता फार गंभीर आहेत.त्यांहा मिळणारे खादीग्रामोद्योगचे कर्ज बंद करण्यात आलीत. मुद्रा लोन मॉर्गेज शिवाय मिळत नाही, पंतप्रधान योजनेतील कर्ज बँकेचे कर्मचारी नातेवाईकाना किंवा दहा टक्केवाले डल्ला मारतात.नोट बंदीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्वताचाच पैसा लाइनित उभे राहुनही मिळत नव्हता बँकखाती हॅक होत होते,सर्व क्षेत्रात मंदीची लाट आली उदारनिर्वाहसाठी काम मिळत नाही, हातात पैसा नाही, अघोषित आणीबाणी सदृष्य स्थिति निर्माण झाल्यासारखे वातावरण निर्माण झाल्याच्या वर्त्तमानपत्रातुन, टी.व्ही.च्या चर्चेतून बातम्या सुरु आहेत. देश मागे जात आहे. आणि शासनास देश्यात पन्नास कोटी कुशल-कौशल्यबळ हवे आहे.हे कसे शक्य आहे...? त्यासाठी जातिवंत तयार कुशलांचा संच म्हणजे बाराबलुतेदार व विश्वकर्मीय होय, तो आर्थिक सक्षम नाही शिक्षण स्पर्धेत टिकाव धरु शकला नाही, परन्तु कुशल कारागिर म्हणून तेच नावारूपाला आहेत त्यांना न्याय मिळावा. त्यांच्या कुशलतेने देश जागतिक स्पर्धेच्या प्रवासात नक्कीच अंतर गाठू शकतो. 
देशातील विद्यार्थ्यांमध्ये कुशलता येण्यासाठी कौशल्य विकास, इंजिनियरिंग, टेक्नीकल क्षेत्रातुन प्रयत्न केले जात आहेत. परंतु कुशल कलेच्या नैसर्गिक कौश्यल्याचा आविष्कार ठरलेला विश्वकर्मीय वंशज, बालुतेदार व अठरा अलुतेदार ह्या जाती पारम्परिकतेच्या उद्योगाने कौशल्यपूर्ण आहेत. देश्यात कौशल्य विकासातून आलेले विद्यार्थी शिकुनही कला आत्मसात होत नाही, आणि दुसऱ्या माध्यमातून ते नोकरीत डल्ला मारतात खरा कुशल कारागिर बाजुलाच रहातो.

     स्पर्धेच्या यंत्र युगात बलुतेदारांना स्किल इंडिया आधारित शासकीय योजनेत स्वतंत्र प्रशिक्षण व्यवसंस्थेतून नोकरीत सामिल करावे, व्यवसायाला खादी उद्योग अथवा कौशल्य विकासांतर्गत सारथी योजने प्रमाने स्वतंत्र बिन व्याजाची मराठा-कुणब्याना जाहीर योजने प्रमाणे व्यवस्था व्हावी, उद्योगासाठी भूखंड द्यावा, कुशल बलुतेदाराना पूरक मानसिकता कशी घडवता येईल यावर लक्ष केंद्रित करून त्यांना सॉफ्टस्किलच्या प्रशिक्षणातून व्यवसायाची संधि निर्माण करून द्यावी, त्यातून उधोग क्षेत्राची रचना कशी करावी, प्रोडक्ट डिज़ाइन, ग्राहक सेवा, नफा सूत्र या संदर्भात शासनाने बलुतेदारांना तालुका निहाय प्रशिक्षण द्यावे. केंद्र-शासनाने पूर्वी ह्या सुविधा खादी-ग्रामोद्योगातून दिल्या होत्या, परन्तु आज राज्यशासनाला बलुतेदारांच्या  सुविधांचे गाम्भीर्य दिसून येत नाही, देश्यात व राज्यात  कौशल्य विकासांतर्गत शासन स्थरावर जसा गाजावाजा होत आहे तशी चालना नाही, शासनाने सारथी योजनेप्रमाणे कुशल-बलुतेदार योजना ह्या नावाने स्किलइंडिया अंतर्गत न्याय द्यावा.त्यातून हा वर्ग सक्षम होऊन देशाला कुशल कारागीरांच्या समर्थनातून लहान मोठ्या उद्योगाना पूरक ठरतील, त्यातून मेक इन इंडियाच्या प्रवासालाही गती,बळकटी मिळेल आणि बलुतेदार ही सक्षम होतील.
   
चंद्रकांत डी गवळी,      9372712221
राज्य सरचिटणीस
बारा बलुतेदार महासंग,महाराष्ट्र

परभणी जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सकल मराठा समाजाचे अभिनंदन !


मराठा समाजाला कोर्टातील प्रदिर्घ लढाईनंतर न्याय मिळाला असुन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आम्ही सकल मराठा समाजाचे आरक्षण व्यवस्थेत स्वागत करत आहोत, असे एका पत्रकाद्वारे जिल्हाध्यक्ष चक्रधर उगले यांनी कळविले आहे.

उच्च न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयाचा आम्हाला मनापासुन आनंद वाटतो. मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने शांततेच्या मार्गाने आंदोलन केले होते. त्यांनी केलेल्या या आंदोलनाला आज न्याय मिळाला आहे. त्याचबरोबर ओबीसी समाजाला जी भीती वाटत होती, ते आरक्षण सुद्धा कमी झालेलं नाही. एकूण सर्व समाजाला आनंद देणारा असा हा निर्णय असून, महाराष्ट्रामध्ये काही वर्षापासून चाललेला ताणतणाव या निर्णयामुळे दूर होईल आणि अतिशय एकोप्याने महाराष्ट्रातील मराठा समाज, ओबीसी समाज, दलित समाज आणि आदिवासी समाज आपआपल्या आरक्षणाचा फायदा घेतील. त्यामुळे आम्ही आजच्या या निर्णयाचे मन: पूर्वक स्वागत करतो असे परभणी जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

पाथरी तालुक्यात अजूनही पावसाची प्रतिक्षा;दुबार पेरणीचेही संकट

प्रतिनिधी
पाथरी:-मृग नक्षत्र कोरडे गेल्या नंतर आर्द्रा नक्षत्रात तालुक्यात काही भागात मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले.अनेक शेतक-यांनी मजुरांची उपलब्धता होत नाही म्हणून धूळ पेरणी केली मात्र कमी पाऊस झाल्याने आता धूळ पेरणी वाया जात असून या शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.
शेतक-यांच्या पाठी संकटांची मालिका अजून ही सुरूच आहे. गेली पाच वर्षा पासून खंडवृष्टी मुळे आणि दुष्काळाचा सतत सामना करणारे शेतकरी या वर्षी मान्सूनच्या आगमनाची आतूरतेने वाट पाहात आहेत एप्रिल महिण्यातील ४८° सें. तापमानात भारतीय हवामान विभागाच्या पावसाच्या बातम्यांनी शेतकरी थंडाव्याची अनुभूती घेत या वर्षी तरी पाऊस वेळेवर आणि  समाधान कारक होईल ही अपेक्षा दर वर्षी ठेवतो गत आठवड्यात शुक्रवारी तालुक्याच्या अनेक भागात पाऊस झाला काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जोरदार बरसला कासापुरी भागात नदी नाले प्रथमच वाहिले.या पावसा मुळे धुळ पेरणी केलेल्या शेतातील बियाणे कोमेजले मात्र जमिनिची तृप्ती झालेली नसल्याने अंकूरलेले बियाने जळून जातांना दिसत आहे.या आठवड्यात पुन्हा पावसाला सुरूवात झाली मात्र विशिष्ठ ठिकाणीच तो पडत असल्याने शेतक-यां मध्ये चिंता दिसून येत आहे. आजही तालुक्याच्या दक्षिण भागात गुंज,उमरा,अंधापुरी,कान्सूर,लोणी,मसला,बाबूलतार,टाकळगव्हाण,जैतापुरवाडी,तुरा,सारोळा,पिंपळगाव,फुलारवाडी,विटा,लिंबा,वाघाळा,रेणापुर,पोहेटाकळी,या भागात आणि तालुक्यातील अन्य भागात अजून ही पेरणी योग्य पाऊस नाही या भागा लगतच असलेल्या मानवत तालुक्यातील केकरजवळा,इटाळी,रामेटाकळी,वझूर,हमदापुर,कुंभारी,वांगी भागतची परिस्थिती सारखीच असल्याचे शेतकरी सांगत आहेत.दोन दिवसा पासून पाऊस पुन्हा सुरू झाला मात्र लहरी पणाने पडत असल्याने शेतक-यांची चिंता तर वाढली आहे मात्र आता पिण्याच्या पाण्याचे संकट ही गंभिर बनत चालले आहे.राज्यात अनेक भागात दमदार पाऊस पडत असल्याच्या बातम्या एैकिवात येत असतांना पाथरी तालुक्या सह मानवत तालुक्याचा दक्षिण भाग खंड वृष्टीचा सामना करत आहे.पेरणी साठी किमान सत्तर मीमी पाऊस पडणे गरजे असल्याचे जाणकार सांगतात मात्र अजून ही पाऊस न झाल्याने शेतक-यांची तर चिंता वाढलीच मात्र आता पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चा-याचे संकट गडद होत चालले असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे 42 वे राष्ट्रीय अधिवेशन 17 आणि 18 ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये


देशभरातून अडीच हजार पत्रकार उपस्थित राहणार 

मुंबईः देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या मराठी पत्रकार परिषदेचे 42 वे राष्ट्रीय अधिवेशन 17 आणि 18 ऑगस्ट 2019 रोजी नांदेड येथे संपन्न होत आहे.नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघानं या अधिवेशनाचं यजमानपद स्वीकारलं आहे.देशभरातून अडीच हजार पत्रकार या अधिवेशनास उपस्थित राहतील असा विश्‍वास मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे व्यक्त केला आहे.या अधिवेशनाच्या प्राथमिक तयारीसाठी नांदेड येथे 30 जून रोजी एक व्यापक बैठक होत असून या बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा होणार असल्याची माहिती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर यांनी दिली . 
मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन 27 आणि 28 जुलै रोजी होणार असल्याचे यापुर्वी जाहीर कऱण्यात आले होते.मात्र स्थानिक पातळीवर हॉलची उपलब्धता या तारखांना होत नसल्याने तारखेत बदल करून ते 17 आणि 18 ऑगस्ट रोजी घेण्याचे नक्की झाले आहे.नांदेड येथील मालेगाव रोडवर असलेल्या भव्य भक्ती लॉन्सवर हा अधिवेशऩाचा दिमाखदार सोहळा होत असून येथे 1500 लोक बसू शकतील असा भव्य हॉल उपलब्ध आहे.या सोहळ्यासठी राज्यभरातूून आणि देशभरातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन दर दोन वर्षांनी नियमितपणे होत असते.यापुर्वी 2011 मध्ये रायगड जिल्हयात रोहा येथे,2013 मध्ये औरंगाबाद येथे,2015 मध्ये पिपरी-चिंचवड येथे 2017 मध्ये शेगाव येथे अधिवेशन झाले होते.2019 मध्ये हे अधिवेशन नांदेड येथे होत आहे.नांदेडला मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन होण्याची ही दुसरी वेळ असून 1998 मध्ये नांदेडला अधिवेशन झाले होते.त्यानंतर आता तब्बल 21 वर्षांनी हे अधिवेशन नांदेडला संपन्न होत आहे.
शेगाव अधिवेशनासाठी 2000च्यावर पत्रकार उपस्थित झाले होते.नांदेडला विमान सेवा आहे,तसेच रेल्वे आणि रस्ता मार्गे नांदेडला जाणे सोयीचे असल्याने नांदेड अधिवेशनासाठी अडीच हजार पत्रकार उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.मराठी पत्रकार परिषद ही देशातील पत्रकारांची अशी एकमेव सस्था आहे की,ज्याचे अधिवेशऩं नियमितपणे होतात आणि त्याला एवढया मोठ्या संख्येनं पत्रकार उपस्थित असतात.नांदेडसाठी पुणे आणि मुंबई येथून थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकाराने सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्यातील पत्रकारांचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्‍न मार्गी लागले आहेत.पत्रकार संरक्षण कायद्यासाठी पुन्हा एकदा सरकारवर दबाव वाढविण्याचा निर्णय परिषदेने घेतला असून हा कायदाही सरकारला करावा लागणार आहे.त्यामुळं नांदेडचे या अधिवेशऩात पत्रकारांचा अधिक उत्साह बघायला मिळेल.दोन दिवस चालणार्‍या या अधिवेशनात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 17 च्या रात्री पत्रकारांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रमही ठेवण्यात येणार आहे.
देशातील मराठी पत्रकारांसाठी वैचारिक पर्वणी ठरणार्‍या या अधिवेशनासाठी जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन एस.एम.देशमुख विश्‍वस्त किरण नाईक परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी कार्याध्यक्ष गजानन नाईक सरचिटणीस अनिल महाजन, माजी सरचिटणीस चारूदत्त चौधरी कोषाध्यक्ष शरद पाबळे,उपाध्यक्ष विजय दगडू ,विभागीय चिटणीस विजय जोशी आणि प्रमोद माने तसेच नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर,कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी,माजी अध्यक्ष प्रकाश कांबळे,सरचीटणीस सुभाष लोणे,नांदेड महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्‍वनाथ देशमुख आदिंनी केले आहे.

साखरा हिवरखेडा परिसरात विजेचा लपणडाव महावितरणच्या अधिकार्यांचे दुर्लक्षसाखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 


साखरा हिवरखेडा परिसरात विजेचा लपणडाव सुरू आहे त्यामुळे नागरिकांना उकड्याचा त्रास सहन करवा लागत आहे  मात्र या कडे महावितरण च्या अधिकार्यांचे दुर्लक्ष होत आहे साखरा सर्कल मधे घोरदडी येथील 33 केव्हा वरून विद्युत पुरवठा केला जातो मात्र गेल्या चार ते पाच दिवसा पासून रोज सध्याकाळी वीजपुरवठा बंद होत आहे हिवरखेडा येथील लाइनमेन गेल्या दोन महिन्यापासून गवत देखील आले नाहीत परंतु सद्यः पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्युत रोहीत्रात नेहमीच बिघाड होत आहे साखरा हिवरखेडा परिसरात लाईन नेहमीच जात आहे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रात्रीही त्रास सहन करवा लागत आहे लाईन मेन गावात येत नसल्याने गावात जर रोहीत्रात काही बिघाड जाला गावकरी वरिष्ठाणा कळवतात मात्र लाईन मेन साहेब काय गावात येत नाहीत सद्यः रोज संध्याकाळी वीजपुरवठा बंद होत आहे मात्र या कडे वरिष्ठ अधिकारी पण दुर्लक्ष करीत आहेत हिवरखेडा डी.पी ला  फिव्ज कॉल पण नाहीत पूर्ण पणे डायरेक तार टाकून दिलेले आहेत   रात्री अपरात्री हे फीव्ज कॉल टूट तात ते पण गावातील नागरिकांना टाकावे लागतात हिवरखेडा परिसरातील विद्युत पुरवठा वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देऊन  लवकरात लवकर सुरळीत करवा अशी मागणी या परिसरातील नागरीकाकडून होत आहे 


तेज न्यूज़ हेडलाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

मराठी माणसाला सेनेनेच हद्दपार केले कपिल पाटील यांची घणाघाती टीका


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई, दि. 28 जून - 
मुंबई महापालिकेत ज्यांची सत्ता आहे, त्यांनीच मराठी माणसाला मुंबईतून हुसकावून लावलं आहे. बदलापूरच्या हद्दीत ढकललं आहे.  शिवसेनेच्या हाती सत्ता आहे. पण मुंबई महापालिका मराठीत बोलत नाही. मराठीत व्यवहार करत नाही. मराठी भाषेचं आणि मराठी माणसाचं सर्वात जास्त नुकसान मराठी भाषेच्या नावाने सत्तेवर आलेल्यांनीच केलं आहे, अशी घणाघाती टीका लोक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी आज विधान परिषदेत केली. 
मराठी भाषा सक्तीचा कायदा शाळांच्या आधी महापालिका आणि राज्यकारभाराला लावा अशी मागणी त्यांनी आज विधान परिषदेत केली. मुंबईतील 190 प्राथमिक मराठी शाळांना सेनेची सत्ता असलेली महापालिका एक रुपयाही अनुदान देत नाही. मराठी शाळा बंद करून, मराठी भाषा भवन बांधण्याची दांभिक मागणी बंद करा. अभिजात दर्जा मिळेल तेव्हा मिळेल. बहुजात मराठी संपवण्याचा डाव आधी बंद करा, अशी मागणी कपिल पाटील यांनी केली. 
मराठीसाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी द्या. मराठी शाळांना 100 टक्के अनुदान द्या. सर्व मराठी शाळा बाय लिंगवल करा. इतर बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांत 1ली पासून मराठीची सक्ती करा. शाळांना वेतनेतर अनुदान द्या. बोली भाषांचं संवर्धन आणि संरक्षण करा अशा मागण्या त्यांनी केल्या.
अहिराणी, खान्देशी, माडिया, गोंडी, गोरमाटी, मालवणी, वऱ्हाडी, सामवेदी, वाडवळी आदी बोली भाषांच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापित  करा. मराठी दुर्बोध झाल्याने मुलं अन्य भाषा शिकतात याकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितलं मराठी विषय स्कोअरिंग व आनंददायी करावा. रोजगार निर्मिती मराठी केंद्रित करण्यासाठी उपयोजित मराठी विषय सुरू करावा. त्रिभाषा सूत्रात विविध भाषांचे पर्याय द्यावेत.

गावकऱ्यांनी श्रमातून केले गाव पाणीदार !


हजारो घनमीटर केलेल्या कामात दिसतेय पाणी 

फुलचंद भगत
मंगरुळपीर: तालुक्यातील पिंप्री खु येथे या वर्षी गावाने पाणी फाउंडेशन च्या आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप 2019 मध्ये सहभाग घेतला असल्याने स्पर्धे दरम्यान हजारो घनमीटर गावकऱ्यांनी जलसंधारण चे काम केले असल्याने गेल्या दोन दिवसांच्या पडलेल्या पावसाने गाव पाणीदार झाले , गावाने तयार केलेले शेततळे , सलग समतर चर , नाला खोलीकरण अगदी तुडूंब भरले असल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला , केलेल्या कामात पाणी पाहून या वर्षी चा पाऊस जणू काही गावात मुक्काम करतो आहे  असे जाणवते तर गावकरी आच्छर्यचकीत होऊन परिसरात पाणी पाहतात , गावात पाणी पाहणे गावकऱ्यांसाठी नवीन नाही , गावाला लागून च असलेल्या तलावात पाणी दरवर्षी येते ते पाहण्यासाठी गावकर्यांना कुतूहल नाही कारण ते पाणी गावकर्यांनी मिळवले नाही , 50 दिवस गावकऱ्यांनी श्रमदान केले , मशीन चे काम स्वता केले असल्याने अडविलेल्या पाण्याला पाहण्यात गावकर्यांना कुतूहल वाटते असे मत यावेळी   गावकऱ्यांनी व्यक्त केले , हे काम तालुक्याचे तहसीलदार किशोर बागडे ,  पिंप्री खु के एन सुर्वे पाटील यांच्या पुढाकाराने व पाणी फाउंडेशन च्या तालुका समन्वयक समाधान वानखडे , अतुल तायडे , तांत्रिक प्रशिक्षक चेतन आसोले , कल्याणी वडस्कर , पाणलोट सेवक निलेश भोयरे , कृषी विभाग चे कृषी सहायक यांनी मार्गदर्शन केले असून 50 दिवस गावातील तरुण , वृद्ध , बाल गोपाल , महिला , पुरुष यांनी परिश्रम केले


"  परीसरात पाणी पाहून गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो , श्रमदानाचे फलित झाले , जलसंधारण काम गावकऱ्यांनी स्वता केले असल्याने हे श्रेय त्यांचे आहे ,गाव एकत्र येण्यासाठी निमीत्त होते फक्त वॉटर कप स्पर्धा.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

सेलूत पञकार डासाळकर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांचा नकार.


 स्थानिक  पत्रकारांचे मौन.

  सेलु ,प्रतिनिधी

येथील पञकार दिलीप डासाळकर यांना दि.२७जुन रोजी सायंकाळी ७च्या दरम्यान मारहाण झाली .या मारहाणीत  हललेखोरानी डासाळकर यांच्या डोळयावर व तोंडावर मारहाण केल्यामुळे त्यांचा तोंडातुन रक्त येत होते .तसेच झालेल्या याझटापटीत त्यांचा खिशयातील   ४७०० रुपये काढुन घेवून हल्लेखोरांनी पळ काढला .याप्रकरणी सेलु पोलिसात तक्रार दखल करण्याकरिता डासाळकर गेले असता तोंडातुन निघालेले रक्त, गेलेले पैसे व पञकार डासाळकर यांना मारहाण झाली असतांना देखील सेलु पोलिसांनी केवळ अदखल पाञ गुन्हा नोंद करु असे म्हटल्यावर   पञकारांनी  संताप व्यक्त केला. 
     दिलीप डासाळकर यांनी नगरपालिका तसेच शहरातील इतर प्रकरणा संदर्भात वृत प्रकशित केले होते .व त्यांमुळे सबधीत प्रकरणाची जिल्हाधिकारी यांनी दखल घेवुन संबधितांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.कदाचित या चौकशीच्या सामोरे जाण्याचा भितीपोटी डासाळकर यांना मारहाण झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे .
   पञकाराना मारहाण होऊ नये म्हणुन याचे कायदेयात रुपांतर झाल्याची केवळ चर्चा होते.माञ त्याबदल गंभीरतेने  घेतले जात नाही. यात काही पञकरानी अपंगतव स्विकारले तर काहींना आपला जीव गमवला आहे .वास्तविक पाहता पञकार आपल्या जिवावर उदार होवुन समाजातील काही प्रकरणे जनतेसमोर आणतो व ती प्रकरणे शासनाकडे पाठवुन त्याचा पाठपुरावा करून त्या प्रकरणाना न्याय देण्याचा प्रयत्न करतो.माञ शेवटी पञकराच्या नशीबी फरफटच येते. तरी प्रकरणी संपुर्ण मराठवाड्याततुन निषेध व्यक्त होत आहे. माञ या प्रकरणाची हवी तसी गांभीर्याने दखल घेतली जात नाही.स्थानिक पोलीस देखील दबावाखाली असल्याने पोलिसांनी जुजबी गुन्हा दाखल करा असे डासाळकर यांना सुनावले तेव्हा तक्रार चं दाखल करण्यात आली नाही. याबाबत जिल्हा पोलिस आधिक्षक यांनी याबाबत सखोल चौकशी करून पत्रकार डासाळकर यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे .

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये परळी नगर परिषदेचा राष्ट्रपतींकडून दोन वेळा गौरव; - सरकारकडूनच माहिती


भूमिगत गटार योजनेचे टेंडर तपासणार

राजकीय सुडबुध्दीने त्रास देऊ नका - अजित दादा पवार

माध्यमांनी खोट्या माहितीवर बातम्या देऊ नयेत

मुंबई (प्रतिनिधी) :- दि.28....... परळी वैजनाथ नगर परिषदेला केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सन 2016-17 व 2017-18 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला असल्याचे राज्य सरकारच्या वतीनेच आज विधान परिषदेत सांगत परळीचा एक प्रकारे गौरव करण्यात आला. 

परळीच्या भूमिगत गटार योजनेचे टेंडर अद्याप अंतिम झाले नसून  ते विभागीय आयुक्तांमार्फत तपासून घेतले जाईल, असे नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी सांगितले. 

दरम्यान परळीच्या विकासात खोडा घालण्यासाठी राजकीय दृष्टीकोनातून त्रास देऊ नका असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित दादा पवार यांनी सरकारला सुनावले आहे.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नामुळे परळी शहराला मंजुर झालेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामाचे निविदा अंतिम होणे आधीच त्यामध्ये गैर व्यवहार झाल्याचे सांगत निविदा प्रक्रीया रद्द करण्याची मागणी केजच्या भाजपच्या आमदार प्रा.सौ.संगिता ठोंबरे यांनी आज विधान सभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती, या कामाची अद्याप निविदाही पुर्ण झालेली नसतांना या कामाबाबत तक्रार केली, त्याला उत्तर देताना नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी या कामाच्या निविदेसाठी ऑनलाईन शासनाच्या वेबसाईटवर निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. राज्य, राष्ट्रीय व स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्या आहेत. निविदेत भाग घेतलेल्या तिन्ही कंपन्यांपैकी सर्वात कमी बोली असलेल्या कंपनीसोबत आणखी निघोशीशन करण्याचे काम सुरू आहे. या निविदा प्रक्रीयेत अंतिमदृष्ट्या कोणतीही चुक नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. 

प्रा.ठोंबरे यांनी केलेल्या शहरातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारीबाबत ही मंत्री महोदयांनी या योजनेचे 95 टक्के काम पुर्ण झाले असून, वाण धरणामध्ये पाणीच नसल्याने टेस्टिंगची व इतर किरकोळ कामे प्रलंबित आहेत. पाऊस पडल्यानंतर ती पुर्ण होतील असे सांगितले. या शहराला राष्ट्रपतींच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षणाबाबत गौरव करण्यात आल्याचेही ते म्हणाले. 

राजकीय द्वेषातून त्रास देऊ नका - अजितदादानी सुनावले

दरम्यान आम्हीही 15 वर्ष सरकार चालवले, 10 वर्ष पाणी पुरवठा विभागाचा मंत्री म्हणुन काम केले, आमच्या काळात शिवसेना किंवा भाजपच्या ताब्यातील नगर परिषदांना कधीही त्रास दिला नाही. जे खरे आहे ते करा मात्र राजकीय दृष्टीकोनातून त्रास देऊ नका असे स्पष्ट अजित दादांनी सुनावले. 

वर्तमानपत्रांनी खात्री करून बातम्या द्याव्यात

दरम्यान राजकीय द्वेषापोटी विकास कामात अडथळा आणणार्‍या काही प्रवृत्तींनी या प्रश्‍नाबाबत चुकीच्या बातम्या माध्यमांना दिल्या असून, माध्यमांनी सत्याची  खातरजमा केल्याशिवाय बातम्या देऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकरी लोखंडी अवजारांकडे वळल्याने,सुतार व्यवसायकांवरती उपासमारीची वेळ

बाळू राऊत प्रतिनिधी 
पूर्वी शेतीसाठी लागणाऱ्या कृषी साहित्यांसाठी शेतकर्‍यांना सुतारांकडे धाव घ्यावी लागत होती. मात्र, आता लाकडी अवजारांऐवजी रेडीमेड मिळणारी लोखंडी अवजारे उपलब्ध झाल्याने पूर्वीच्या बलुतेदार पद्धतीवर अवकळा आल्याने कारागिरांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून 
सुतार व्यवसायकांवरती उपासमारीची वेळ आली आहे.

बारा बलुतेदारांमध्ये सुतार समाज हा महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रत्येक गावा-गावांत सुतार समाजाचे आस्तित्त्व आहे. सुतार समाज म्हटले की, लाकडाचे काम करणारे कारागीर आपल्या नजरेसमोर येतात घर बांधकाम असो की अन्य फर्निचर कामे असो यात काळानुसार मोठे बदल झाले आहेत.प्राचीन व मध्ययुगीन काळात ग्रामीण भागातील बलुतेदारी पद्धती अस्तित्वात होती. ही पद्धती काळाच्या ओघात लुप्त पावत चालली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक खेडेगावात बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार होते. बलुतेदार व अलुतेदार गावातील शेतकऱ्यांना वर्षभर सेवा पुरवत असून त्या मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून मोबदला म्हणून धान्य मिळे. परंतु, यांत्रिक युगाचा प्रारंभ झाल्यापासून शेतीमध्ये लागणाऱ्या लाकडी अवजाराऐवजी कारखान्यातूनच रेडिमेड मिळणारी लोखंडी अवजारे उपलब्ध होत असल्याने बारा बलुतेदारांमध्ये समाविष्ट असलेल्या सुतारांच्या व्यवसायावर पाणी फेरले आहे. सुतार कुटुंबीयांचे संपूर्ण जीवन हे त्यांच्या कलाकौशल्यातून घडविलेल्या विविध लाकडी वस्तूंच्या मिळकतीतून घडविले जात असे. शेतीसाठी लागणारे, नांगर, वखर, फन, डवरा, ज्यू, भोवऱ्या खाचरा बंडी, तिफन, खातवा, रुमण आदी इत्यादी अवजारे तर घरगुती साहित्यात पलंग, टेबल, खूर्ची, पाट, घराचे छप्पर ठोकणे, दरवाजे, खिडक्या, कोरपाट-बेलन आदी वस्तू तयार करीत असे. घरगुती साहित्य असो की, शेतीची अवजारे पावसाळा सुरू होण्यापूर्वी नवीन साहित्य बनविण्यासाठी किंवा त्यांची दुरुस्ती करण्यासाठी शेतकरीवर्ग सुताराकडे येरझारा मारत असत. सुतारही त्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन पाहिजे त्या आकारात शेतीची अवजारे बनवून देत असत. सुतार बनवलेल्या अवजारांपासून मिळालेल्या मिळकतीतून आपल्या कुटुंबीयांची गरज भागवीत असे. परंतु आता लोखंड व प्लास्टिकपासून बनविलेली शेतीची अवजारे बाजारात उपलब्ध झाली आहेत. किंमतीच्या बाबतीत ही अवजारे थोडी महाग असली तरी टिकावू होत असल्याने रेडिमेड अवजारांकडे आकर्षित होत आहे. यामध्ये बैलगाडी, भोवरी, वखर, डवरा शहरात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे एकेकाळी १२ बलुतेदारांत महत्वाचा मानला गेलेला सुतार व्यवसाय करणाऱ्या सुतारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
उदरनिर्वाहाचे साधन हरवले
ग्रामीण भागात वडिलोपार्जीत व्यवसाय मि करत असून माझ्यावरती कालौघात उपासमारीची वेळ आली आहे.आमच्या अंगातील कला जिवंत ठेवण्यासाठी शासनाने प्रभावीपणे उपाय योजना राबविली पाहिजे,
व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी आवश्यक प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करु न देण्याची गरज आहे. नामशेष होणा-या या कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत करुन देत व्यवसायाला उभारी दिली पाहिजे.
            -परमेश्वर गावडे (सुतार व्यवसायिक)

अ‍ॅट्रासिटी, चोरी, लुटमार गुन्हयामध्ये पाच वर्षापासुन फरार असलेला इरफान खॉन पोलिसांच्या ताब्यातपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
       अ‍ॅट्रासिटी, चोरी, लुटमार, फसवणुक या गुन्हयात पाच राज्यातील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला व मागील पाच वर्षापासुन  फरार असलेल्या गुन्हेगारास परळी शहर आणि संभाजीनगर पोलिसांनी सापळा रचुन अटक केली. अटक केलेल्या इरफान खान शरीफ खान यास   संभाजीनगर पोलिसांनी दाखल केले असता त्यास एक गुन्हयात एक दिवसाची पोलिस कोठडी ठोवठवण्यात आली. 
   परळी शहरातील इराणी वस्तीमध्ये राहणारा इरफान खान शरीफ खान याने नागापुर, परळी सह तेलंगणा, गुजरात, मध्यप्रदेश कर्नाटक या राज्यामध्ये  अ‍ॅट्रासिटी, चोरी, लुटमार, फसवणुक व  लुटमारीची गुन्हे केले आहेत. तो मागील पाच वर्षापासुन पोलिसांना गुंगारा देत आला आहे. नागापुर येथील पोलिसांना अनेक गुन्हे मध्ये हवा असलेला आरोपी परळी शहरात असल्याची गुप्त माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे डी.बी.पथक यांनी पथक तयार करुन शहरातील  इराणी वस्तीत सापळा रचला परंतु तो इराणी वस्तीतुन गायब झाल्याची माहिती मिळताच परळी शहर पोलिस ठाण्याचे डी.बी.पथकातील जमादार  बाळासाहेब बांगर, माधव तोटेवाड यांनी गुप्त माहिती घेत हा नागपुर पोलिसांना हवा असलेला आरोपी नवीन थर्मल नजीक असलेल्या सेलु झोपडपट्टी येथे एका महिलेच्या घरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर  सेलु झोपडपट्टी येथे नागपुर येथील पीएसआय राऊत, संभाजीनगर पोलिस ठाण्याच्या अनुसया माने, सविता दहिवाळ, सचिन सानप, दत्ता गित्ते , रमेश सिरसाट आदींनी  सापळा रचला व त्यास रात्री 1 वाजता झोपडपट्टीतील घरातुन अटक केली. सदरील प्रकरण हे संभाजीनगर पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने त्यास संभाजीनगर पोलिसांच्या स्वाधिन केले. यावेळी नागापुर  पोलिसांना हवा असलेला आरोपी हा नसुन दुसराच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या आरोपीची चौकशी केली असता तो इरफान खान असल्याचे निष्पण्ण झाले. इरफान खान याच्यावर परळी शहर, संभाजीनगर पोलिस ठाण्यास परराज्यातील अनेक पोलिस ठाण्यामध्ये अ‍ॅट्रासिटी, फसवणुक, चोरी, चैन स्नॅचींग, लुटमार असे गुन्हे दाखल आहेत. तसेच तो मागील पाच वर्षापासुन अनेक गुन्ह्यामध्ये फरार असल्याचे समजते. अटक केलेल्या इरफान खानला आज दि.28 रोजी परळी न्यायालयात हजर केले असता त्यास एक गुन्हयात एक दिवसाची न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली असुन दुसर्‍या एका गुन्हयात न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. इतर गुन्ह्यामध्ये त्यास दि.29 रोजी न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. सदरील प्रकरणाचा तपास संभाजीनगरचे सहाय्यक पो.नि.सलिम पठाण हे करीत आहेत.

उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामेश्वर लटपटे सत्कार

                            परळी वैजनाथ :- २८ ( प्रतिनिधी )
    येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामेश्वर लटपटे यांच्या माध्यमातून अवघड शस्त्रक्रिया करण्याचा क्रम वाढतच असून आज अशीच एक अपेंडीक्स ची अवघड शस्त्रक्रिया केल्याने डॉक्टर लटपटे यांचे परिसरात अभिनंदन होत आहे.
       उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि परळी शहराचे प्रसिद्ध जनरल सर्जन डॉक्टर रामेश्वर लटपटे यांनी या ठिकाणचा पदभार स्वीकारताच मोठ मोठ्या शस्त्रक्रिया करण्यास प्रारंभ केला. अन्ननलिका स्तणाची कॅन्सर, पोटाचे विकार यासारख्या अवघड शस्त्रक्रिया यांच्या हस्ते यशस्वीरित्या संपन्न झाल्या.
     अशीच एक पोटाच्या विकाराची अवघड शस्त्रक्रिया डॉक्टर रामेश्वर लटपटे यांच्या हस्ते यशस्वीरित्या संपन्न झाली ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांचे पुतणे गोपाल बद्दर वय चोवीस हे गेली आठ दिवसापासून पोटाच्या दुखण्याने त्रस्त होते त्यांनी डॉ लटपटे यांना दाखवले असता त्यांनी गोपाल बद्दर यांना तपासले व विविध तपासण्या करून घेतल्या असता तपासण्याच्या अहवालावरून गोपाल बद्दर अपेंडिक्स ने त्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे ऑपरेशन करणे आवश्यक असल्याचे समोर आल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला व ऑपरेशन यशस्वीरीत्या करून गोपाल बद्दर यांच्या पोटातून गाठ काढली.
       वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामेश्वर लटपटे यांच्या माध्यमातून परळी उपजिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य जनतेसाठी देवरूपी डॉक्टर मिळाले असून आपल्या पुतण्याची यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केल्या बद्दल ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांनी डॉ लटपटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार केला.
     या यशस्वी शस्त्रक्रिया करणे कामी डॉक्टर रामेश्वर लटपटे यांना भूलतज्ञ डॉक्टर एल डी लोहिया स्टाफ नर्स विभागाच्या प्रमुख संगीता फड व शिवकन्या सेफ यांनी सहकार्य केलं.

जाधव कुटूंबियांंकडून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्यसेवा व खाऊचे वाटप


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २८ __ संत सम्राट श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कै. पत्रकार विठ्ठल शेषेराव जाधव यांच्या स्मरणार्थ वै.ज्ञानेश्वर माऊली खराद मालेगावकर (ता.गेवराई) दिंडी क्र.१९६ हि आळंदी येथुन माऊलीच्या रथामाघे पंढरपुरला जाताना पुणे येथे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा व खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे आयोजन सुलभा विठ्ठलराव जाधव व ज्ञानेश्वर नारायणराव जाधव यांनी केले.
         दरवर्षी प्रमाणेषया हि वर्षी कै. पत्रकार विठ्ठल शेषेराव जाधव यांच्या स्मरणार्थ गेवराई तालुक्यातील पाथरवाला हल्ली मु. पुणे येथील रहिवाशी असलेल्या जाधव परीवारांने मोफत आरोग्यसेवा व खाऊचे वाटप पुणे येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गेट नं. २ येथे केले. यावेळी कार्यक्रमास डाॅ. विजय भोर, डाॅ. शुभांगी भोर यांनी मोलाचे सहकार्य केले तर डाॅ. संदीप औटी, डाॅ. सागडे यांनीही कार्यक्रमाला भेटी दिल्या. रावसाहेब मामा सपकाळ, अॅड. सारीकाताई पवार, जगदीश पवार, जेष्ठ पञकार शकीला मॅडम, युवा संवादचे धनराजजी गरड, चेकमेट टाईम्सचे धनराजी माने, पञकार दिपक आवळे, आविनाश गायकवाड, अभिनव कला भारती, सविताताई मालपेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
        हा  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुष्णा देशमुख, योगेश जाधव, हर्षवर्धन जाधव, नागेश जाधव यांनी प्रयत्न केले. तर अमोल घुले, बाळराजे भाकड, शुभंम मस्के, प्रियंका डुमने, अमोल गावडे, शिदेश्वर जाधव, रामेश्वर जाधव, ह.भ.प.शेषेराव जाधव, दिंडी चालक ह.भ. संदिपान काका खराद, दिंडी विनेकरी ह.भ.प.अशोकभाऊ वाकडे, राजु गाडे, ज्ञानेश्वर खराद. नंदु खराद, हारी काका घुले, आशाबाई खराद, गोकुळ गोरे, सुनिल खराद आदी उपस्थित होते. या वारी निमित्ताने पुण्यनगरीत आलेल्या वारकऱ्यांचे सुलभा विठ्ठलराव जाधव परिवार कडुन स्वागत करण्यात आले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

खा.डाॅ. प्रितमताई मुंडे शेतक-यांच्या मदतीला धावल्या ; संसदेत तारांकित प्रश्नांद्वारे केली मागणी दुष्काळात होरपळणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र शासनाने मदत करावीबीड (प्रतिनिधी) :- दि.२८------ सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे संकटात सापडलेल्या दुष्काळग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र शासनाने मदत करावी अशी मागणी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आज संसदेत  तारांकित प्रश्नांद्वारे केली. 

  राज्यासह मराठवाडा व विशेषतः बीड जिल्हयातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या प्रचंड तीव्रतेचा सामना करत आहे. मराठवाड्यात व प्रामुख्याने बीड जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.परंतु पावसाअभावी राज्यासह मराठवाडा व बीड जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे, कापूस या नगदी पिकाचे उत्पादन घेणारा शेतकरी वर्ग नैसर्गिक संकटासोबतच आर्थिक अडचणींनाही तोंड देत आहे. अशा वेळी अडचणीत सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकरी वर्गाला आधार देण्याची गरज आहे. केंद्र शासनाने अशा परिस्थितीत शेतक-यांना मदत करून दिलासा द्यावा अशी मागणी जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केली.

 खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रश्नांला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी हातमाग,यंत्रमाग व वस्त्रोद्योग विभागातर्फे नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या दुष्काळग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले.

दरम्यान, दुष्काळ आणि नापिकीमुळे नैसर्गिक व आर्थिक संकटांना तोंड देणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी वर्गाच्या प्रश्नांना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी देशाच्या संसदेत वाचा फोडल्याने अडचणीत सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र शासन निश्चित मदत करेल असा विश्वास शेतकरी वर्गात निर्माण झाला आहे.

चैन साखळी चोरणार्‍या दोन बुरखाधारी महिलांना परळी शहर पोलिसांकडुन अटक


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- 
परळी शहरातील सोने चांदीचे व्यापारी बालाजी टाक यांच्या दुकानातुन दि.08 जुन रोजी सोन्याच्या चैन दाखविण्याच्या बहाण्याने चैन चोरी करणार्‍या दोन बुरखाधारी महिलांना परळी शहर पोलिसांच्या डी.बी.पथकाने औरंगाबाद येथुन अटक केली. सदरील दोन्ही महिला या बहिणी असल्याचे समजते. 
परळी शहरातील सोने चांदीचे व्यापारी बालाजी प्रकाशराव टाक यांच्या दुकानात दि.08 जुन रोजी सोने खरेदीच्या निमित्ताने चैन साखळी बघण्यासाठी दोन बुरखाधारी महिला घुसल्या व त्यांनी सात ग्रॅमची 23 हजार 100 रु.ची सोन्यची चैन पळवली ही बाब बालाजी टाक यांच्या लक्षात येताच त्यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातुन सदरील महिलांची ओळख पटविण्याचा व शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या कुठेच आढळुन न आल्याने दि.20 जून रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील महिलांचा शोध घेण्याचे परळी शहर पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. शहर पोलिसांनी पो.नि.देविदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.मेंडके, डी.बी.पथकातील जमादार बाळासाहेब बांगर, माधव तोटेवाड, सुंदर केंेदेे, गुड्डे, दहिवाळ यांनी पथक तयार केले. सदरील चोरी प्रकरणात वापरण्यात आलेल्या गाडी क्रं. एम.एच.20 ई.एल.1621 चा चालक मोहम्मद फरहाण (वय 24) यास  औरंगाबाद येथुन दि.21 जुन रोजी अटक केली. व त्यास पोलिस कोठडी मिळताच सदरील महिलांची ओळख व ठिकाणा सांगितल्या नंतर सदरील सोन्याचे चैन चोरणार्‍या सय्यद शबाना बेगम उर्फ शबो इम्रान वय 34 वर्षे रा.नंदनवन कॉलनी औरंगाबद व मुन्नी उर्फ परवीन शेख अब्दुल रहिम वय 37 रा.संजयनगर, भाईज पुरा औरंगबाद यांना अटक केली व त्यांच्याकडुन चोरी केलेला 23 हजार 100 रु.चा मुद्देमला जप्त केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर या बुरखाधारी महिलांच्या परळीशहर पोलिसांनी अवघ्या सात दिवसात मुसक्या आवळल्या.

भ्रष्ट्राचाराच्या मुद्दाला बगल देण्यासाठी परिषदेत सत्ताधा-यांकडून गोंधळ - धनंजय मुंडे


धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे कडाडले

मुंबई (प्रतिनिधी) :- दि. 28 ----विधान परिषदेत आज १६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा सभागृहात मांडला जाणार होता. त्याला बगल देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नाहक गोंधळ घातला. सभागृह तहकूब करायला भाग पाडले. सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत आहे अशा सरकारचा आम्ही निषेध करतो, या शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

सलग दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजला. धनगर आरक्षणाचा मुद्दा सुरू असताना सत्ताधाऱ्यांनी पुन्हा गदारोळ घातला.
परिणामी सभापतींना सभागृह दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. सत्ताधाऱ्यांची वर्तवणूक विधिमंडळाच्या प्रथेला लागलेला कलंक आहे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की, विधिमंडळाच्या इतिहासात आज पाहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाकडून एखाद्या समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केला गेला आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा सभागृहात मांडला जाऊ नये यासाठी जाणीवपूर्वक गोंधळ घातला गेला. यातूनच सरकारची नियत कळते असा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान धनगर आरक्षणाच्या मुद्दावरून गदारोळ झाल्याने सभागृह दोन वेळा तहकूब करण्यात आले आणि तिसऱ्यांदा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

पाथरी शहरात नवोदीत क्रिकेट खेळाडूं साठी लेदर बॉल आकादमी;न प गट नेते जुनेद खान दुर्रांनी कडून उपहारप्रतिनिधी
पाथरी:-पाथरी प्रिमियर लिग च्या तुफान यशा नंतर क्रिकेट खेळावर निस्सीम प्रेम करणारे पाथरी न प चे गट नेते जुनेद खान दुर्रांनी यांनी अवघ्या सहा महिण्यात पाथरी शहरातील नवोदित क्रिकेट खेळाडूं साठी दुर्रानी पेट्रोल पंपाच्या बाजूलाच मराठवाड्याचा आंतरराष्ट्रीय कसोटी पट्टू इक्बाल सिद्दीकी यांच्या नावे लेदर बॉल अकादमी सुरू केली असून यात नाम मात्र शुल्क घेत अनुभवी प्रशिक्षकां मार्फत क्रिकेटचे शात्रशुद्ध धडे देण्यात येत आहेत.
पाथरी शहर आणि तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंना हक्काचे व्यासपिठ मिळावे म्हणून न प चे गट नेते जुनेद खान दुर्रानी यांनी दोन वर्षा पुर्वी पाथरी प्रिमियर लिग च्या माध्यमातून व्यावसाईक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धांची सुरूवात केली या स्पर्धेला अभूतपुर्व यश मिळाल्या नंतर टेनिस बॉल क्रिकेट पेक्षा लेदर बॉल ला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व असल्याने खेळाडूंचे भवितव्य घडू शकते हा उद्देश समोर ठेवत शहरातील सेलू कॉर्नर येथील दुर्रानी फ्यूल स्टेशन च्या पाठी मागिल जागेत नवोदित खेळाडूं साठी कसोटी पट्टू इक्बाल सिद्धीकी यांच्या नावे सर्व सुविधायुक्त,तज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करत क्रिकेट अकादमी सुरू केली आहे. यात सोळा वर्षा आतील खेळाडू आणि त्या वरिल वयाच्या खेळाडूं साठी वेगवेगळ्या वेळा ठेवण्यात आल्या आहेत. येथे प्रवेशा साठी नाममात्र पाचशे रुपये शुल्क आकारला जात असून प्रति महिना पाचशे रुपये फिस खेळाडूंना द्यावी लागनार आहे. तर ड्रेस आणि खेळाच्या साहित्याची संपुर्ण किट घेण्या साठी पाच हजार रुपये द्यावे लागणार आहेत. सोमवार २४ जुन पासून प्रवेशाला सुरूवात झाली असून बुधवार पर्यंत सोळा वर्षा खालील १७ खेळाडूं चे प्रवेश झाले असून येथेल खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावा हा सामाजिक उद्देश ठेऊन ही अकादमी सुरू केली असल्याची प्रतिक्रीया न प गट नेते जुनेद खान दुर्रानी यांनी दिली.

जखमी हरणाच्या पाडसाची कुत्र्याच्या तावडीतून केली मुक्तता;चार तास पाहिली अधिका-यांची वाट


प्रतिनिधी
पाथरी:-तालुक्यातील रेणाखळी रस्त्यालगत देवेगांव पाटी जवळ एका जखमी हरणाच्या पाडसाचे कुत्रे लचके तोडत असतांना तरून शेतक-यांनी या पाडसाची कुत्र्याच्या तावडीतुन मुक्तता करत त्याला पाणी पाजून वनविभागाला फोन केला तब्बल चार तासाच्या विलंबा नंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळावर पोहचले आणि त्यांनी या जखमी हरणाच्या पाडसाला ताब्यात घेऊन परभणी कडे घेऊन गेले.
देवेगाव फाट्या जवळून देवेगाव येथील तरून शेतकरी सतिष देवराव गलबे,गजानन संजय गलबे,शेतावर जात असतांना सकाळी साडे दहाच्या सुमारास एका जखमी झालेल्या हरणाच्या पाडसाचे कुत्रे लचके तोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने तळमळणा-या या पाडसाची कुत्र्याच्या तावडीतून मुक्तता केली.या वेळी वनविभागाच्या अधिका-यांशी या तरूणांनी संपर्क केला असता सुरुवातीला तुम्हीच घेऊन या असे सांगण्यात आले मात्र शेतीची कामे असल्याने आम्ही येऊ शकत नाही,जनावरे बांधलेली आहेत असे या तरूण शेतक-यांनी सांगितले या नंतर तब्बल चार तास हे तरुन शेतकरी वनविभागाचे कर्मचारी येण्याची वाट पहात तेथेच बसून राहिले. पावने तीनच्या सुमारास वनविभागाचे रामराव राठोड,संदिप ठाणके यांनी या जखमी पाडसाला घेऊन उपचारा साठी घेऊन गेल्याची माहिती सतिष गलबे यांनी दिली.

सेलूचे पत्रकार दिलीप डासाळकर यांच्यावर हल्ला


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबईः परभणी जिल्हयातील सेलू येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप डासाळकर यांना काही अज्ञात व्यक्तींनी थोडयावेळापुर्वीच जबर मारहाण केली.
ते आपल्या घरून ऑफीसकडे जात असताना त्यांची गाडी अडवून दोघा अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी रोखली आणि लाथा-बुक्क्यानी त्यांना मारहाण करायला सुरूवात केली.हल्लयाचे नेमके कारण समजू शकले नसले तरी डासाळकर यांनी सातत्यानं नगरपालिकेच्या कारभाराच्या विरोधात बातम्या लावल्या आहेत.त्यातून काहींवर कारवाई देखील झाली आहे.या व्देषातूनच ही मारहाण झाली असावी अशी शक्यता डासाळकर यांनी व्यक्त केली आहे.डासाळकर सध्या पोलीस तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत.काही दिवसांपुर्वीच येलदरी येथील पत्रकाराच्या घरावर रॉकेल ओतून ते पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.त्यातील आरोपी अद्याप सापडलेले नसतानाच पुन्हा हा प्रकार घडला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषद या हल्लयाचा निषेध करीत आहे.
7 एप्रिल 2017 रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला.तो मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठविला गेला मात्र तो दिल्लीतच पडून असल्याने संमत झालेल्या विधेयकाचे अद्याप कायद्यात रूपांतर झाले नाही.सरकारनं या विषय दुर्लक्षित केलेला असल्याने राज्यातील पत्रकारांवर सातत्यानं हल्ले होत आहेत.

मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय झाला कोर्टाच्या निकालावर धनंजय मुंडेंनी व्यक्त केले समाधान


बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई  (प्रतिनिधी) :- दि. 27 ----- मराठा आरक्षण कायदा उच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे  महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक प्रवेशात आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. हा मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया देत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटरद्वारे ही प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. आरक्षणासाठी विरोधी पक्षाने सातत्याने या मागणीबाबत  सभागृहात आणि  पाठपुरावा केला, आंदोलनात सहभाग घेतला. शेवटी निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागला याचे समाधान वाटते.

गेल्या पाच वर्षांपासून विविध मार्गाद्वारे धनंजय मुंडे आणि इतर विरोधीपक्षातील नेते सभागृहात व सभागृहाबाहेर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडत होते. मराठा समाजाच्या बाजुने निकाल लागल्याने मुंडे यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पुर्णा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वक्ता प्रशिक्षण विभाग शहराध्यक्षपदी दिनाजी सोनकांबळे यांची निवड...!


तालुकाध्यक्ष शिवाजीराव बोबडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

पुर्णा/येथील सामाजिक कार्यकर्ते दिनाजी उर्फ दिनेश शंकरराव सोनकांबळे देऊळगावकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वक्ता प्रशिक्षण विभागाच्या पुर्णा शहराध्यक्ष पदावर आज गुरुवार दि.२७ जुन २०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री.प्रदिप सोळुंके व परभणी जिल्हा वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष संदिप पाटील माटेगावकर यांच्या मार्गदर्शनाने पुर्णा तालुकाध्यक्ष श्री शिवाजीराव बोबडे यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे निवड केली केली असुन सदरील नियुक्ती पत्रात असे नमुद केले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब,मा.अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष .जयंत पाटील,खा.सुप्रियाताई सुळे,वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रदिपदादा सोळुंके यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्न कराल तसेच पक्ष बळकटीसाठी व मजबुत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले सदैव सहकार्य राहिल असा आम्हाला विश्वास आहे.सदरील निवडीचे नियुक्तीपत्र त्यांना तालुकाध्यक्ष शिवाजाराव बोबडे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष संतोष सातपुते बालाजीराव पोपळे सर,पुंडलीकराव जोगदंड सर,भरत बोबडे,आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते....

स्टेट बँक आँफ इंडीया शाखा पालम यांनी लेखी आश्वासन देवुन हि अद्याप कर्ज वाटप नाही


आनखीन उपोषनास बसणार
     अवधुत जाधवअरुणा शर्मा


पालम :- येथील स्टेट बँक आँफ इंडीया शाखा पालम यांनी लेखी आश्वासन देवुन ही अद्याप कर्ज वाटप केले नाही.
  सविस्तर वृत आशे कि अवधुत बालासाहेब जाधव पंतप्रधान स्वयंरोजगार योजने अंतर्गत निवड झालेला सुशिक्षीत बेरोजगार आहे. जाधव यांना बँकेने उद्योगासाठी कर्ज मंजुरीचे पत्र दिलेले आहे. तसेच त्यांनी कर्ज घेण्यासाठी आवश्यक लागणारे प्रशिक्षण पुर्ण करुन प्रशिक्षण प्रमाणपत्र वैयक्तीक कागदपत्र सादर केले आहे. विशेष या अगोदर पालम तहसिल कार्यालयासमोर दि. 1-10-2018 रोजी उपोषनास बसले असतांना बँकेने 15 ते 20 दिवसात कर्ज वाटप करु असे लेखी आश्वासन दिले होते. या नंतर दि. 29-10-2018 रोजी पालम तहसिल कार्यालयात कर्ज वाटप न झाल्या चे लेखी कळलीले. तरी दिनांक 25-6-2019 पर्यंत बँकेने जाधव यांच्या कर्जाचे वाटप केलेले नाही. तरी कर्ज वाटपा बाबत बँकेस पत्र पाठवावे अन्यथा आनखीन उपोषनास बसनार आसे निवेदन दि. 25 जुन रोजी तहसीलदार यांना देण्यात आले.

परळी पालिकेच्या अनागोंदी कारभाराचे आ. संगीता ठोंबरे यांनी सभागृहात काढले वाभाडे !


 नगरोत्थान योजनेच्या कामांची विभागीय आयुक्त केंद्रेकरांमार्फत चौकशी करू - नगर विकास राज्यमंत्र्यांचे उत्तर

मुंबई (प्रतिनिधी) :-  दि. २८ ----- परळी (जि.बीड) येथे शासनाच्या सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून झालेली बोगस व अर्धवट कामे, रखडलेली पाणी पुरवठा योजना, घाणीचे साम्राज्य या व अशा अनेक दाखल्यांसह पालिकेच्या अनागोंदी कारभाराचा पाढा वाचत केजच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी आज सभागृहात लक्षवेधी मांडून सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी लावून धरली. दरम्यान, परळी शहरातील नगरोत्थान योजनेच्या कामांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल असे नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी उत्तरात बोलतांना सांगितले. 

   परळी शहरात शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत रस्ते, नाल्या व इतर कामे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. ही कामे करताना पालिकेने कुठल्याही नियमाचे पालन केले नाही. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून देखील ही कामे निकृष्ठ दर्जाची व अर्धवट स्थितीत झाली आहेत, याकडे आ. संगीता ठोंबरे यांनी आज सभागृहात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. 

  शासनाने परळी शहरासाठी मंजूर केलेल्या ३५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम मार्च २०१९ पर्यंत पुर्ण होणे अपेक्षित होते. वास्तविक ही योजना २०१२ मध्येच मंजूर झाली होती व २०१४ अखेर पर्यंत ती पुर्ण होऊन रहिवाशांना पाणी मिळायला हवे होते पण अजूनही किरकोळ कामे, चाचणी अशी कारणे पुढे करून याचे काम रखडून ठेवले गेले असल्याने रहिवाशांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.  शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे, कच-याचे वर्गीकरण व योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अगोदरची कामे अर्धवट अवस्थेत असताना नवीन मलनिःस्सारण प्रकल्प टप्पा १ साठी १०१ कोटी ८६ लक्ष रूपये मंजूर केले गेले आहेत. या कामाच्या मंजूरीचा जीआर शासनाच्या  संकेतस्थळावर उपलब्ध नाही शिवाय  चढ्या दराने निविदा भरण्यात आल्या, त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर असून ती रद्द करावी अशी मागणी आ. ठोंबरे यांनी केली. 

  दरम्यान, या प्रश्नाची दखल घेत नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी नगरोत्थान योजनेतील सर्व कामांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल व नंतरच पुढील कार्यवाही करू असे सांगितले. 

विरोध विकासाला नाही
मलिदा लाटण्याला..
---------------------------
नगरोत्थान योजनेची निकृष्ट व बोगस कामे झाली आहेत, तीच अवस्था पाणीपुरवठा योजनेची असून रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेचा अनागोंदी कारभार पाहता नवीन प्रकल्पाचीही तीच गत होणार आहे. जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी परळीच्या विकासाला कधीच विरोध केला नाही उलट सहकार्याची भूमिका ठेवली आहे, त्यांचा विकासाला विरोध नसून मलिदा लाटण्याला आहे असे आ. संगीता ठोंबरे म्हणाल्या.

मिलिंद आठवले यांना जनसंवाद विषयात पी.एचडी प्रदान


औरंगाबाद (प्रतिनिधी) :-  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विषयात मिलिंद आठवले यांना पीएच.डी पदवी प्रदान केली. मिलिंद आठवले यांनी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्रांचा संवादशास्त्रीय अभ्यास" या विषयावर संशोधन केले.त्यांना जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागाचे विभागप्रमुख माध्यम व्यवस्थापनतज्ञ डॉ. दिनकर माने यांनी मार्गदर्शन केले. मिलिंद आठवले याना याबद्दल डॉ. वि. धारूरकर, (कुलगुरू , केंद्रीय विद्यापीठ त्रिपुरा) जेष्ठ साहित्यीक, सामाजिक विचारवंत व स्तंभ लेखक,डॉ.सुधीर गव्हाणे (माजी कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ), जनसंपर्कतज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी (हिंदी भाषा प्रचार, प्रसार सभेचे महामंत्री) प्रा. जयदेव डोळे,( राजकीय विचारवंत व माध्यम समीक्षक) प्रा.डॉ. दिलीप घोंगडे, प्रा. सुनील मगरे ,डॉ. किशोर साळवे, प्रा. डॉ. शंकर अंभोरे,प्रा.डॉ. संजीव सावळे,डॉ. प्रभू गोरे, डॉ. रवी सूर्यवंशी,प्रा. संजय पाईकराव,प्रा. संजय शिंदे, सतीश दवणे,प्रा. पी. एस. आठवले व प्रा. प्रकाश इंगळे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या तसेच त्यांचे आई- वडील, नातेवाईक व मित्र परिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

विधानसभेसाठी वंचितकडून डॉ. नितिन सोनवणे यांना उमेदवारी द्या


बीड,दि.28 (प्रतिनिधी)ः-बीड विधानसभेसाठी वंचित बहूजन आघाडीकडून डॉ. नितिन सोनवणे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे. डॉ.नितिन सोनवणे यांचे बहूजन चळवळीत मोलाचे योगदान असून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकीत त्यांनी वंचित आघाडीचे अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यामुळे बीड विधानसभेसाठी  त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी आता जनतेतून होत आहे.
वंचित बहूजन आघाडीचे जिल्हा महासचिव डॉ. नितिन सोनवणे यांचे बहूजन चळवळींमध्ये मोलाचे योगदान आहे. एवढेच नाही तर त्यांचा अन्य वंचित समाजामध्ये देखील दांडगा जनसंपर्क आहे. डॉ. नितिन सोनवणे हे उच्चशिक्षीत आहेत. अशा उच्चशिक्षित अभ्यासू व्यक्तीमत्वाला वंचित बहूजन आघाडीची बीड विधानसभेची उमेदवारी दिल्यास वंचित बहूजन आघाडीचा झेंडा बीड विधानसभेवर फडकल्याशिवाय राहणार नाही. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकीत वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार प्रा.विष्णु जाधव  यांच्या प्रचारार्थ चांगली रणनिती आखून वंचितला तीसर्‍या स्थानावर नेवून ठेवण्याचे काम डॉ. नितिन सोनवणे यांनी केलेले आहे. त्यामुळे त्यांना बीड विधानसभेची वंचितकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी आता जनतेतून होत आहे.

Thursday, 27 June 2019

साखरा येथे pm kisan सन्मान निधी योजने अंतरगत साखरा येथे दि 28/जून रोजी मेळावासाखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 

साखरा येथे pm kisan सन्मान निधी योजनेसाठी साखरा येथे दि 28/जून रोजी सकाळी 10 वाजता शेतकरी मेळावा घेण्यात येणार आहे या साठी साखरा सज्जा अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थितित राहावे या साठी लागणारे कागत पत्रे pm kisan सन्मान निधी योजने साठी पात्र कुटुंबातील 1व्यक्तींनी स्वयघोषणा पत्र तत्काळ भरून द्यावे या साठी लागणारे कागद पत्रे आधार कार्ड मतदान कार्ड राशन कार्ड आणि बँकेचे पासबुक झेरॉक्स हे उद्या सकाळी साखरा येथे शेतकरी मेळाव्यात  सोबत आणून साखरा येथील कागत पत्रे तलठि महेंद्रकर साहेब यांच्या कडे तर हिवरखेडा येथील ग्रामसेवक संतोष बार्शीकर साहेब यांच्या कडे द्यावे बोरखेडि पी.येथील ग्रामसेवक गाढवे साहेब यांच्या कडे द्यावे व या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थितीत रहावे 


तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

डॉक्टर सिद्धेश्वर ठोसर यांचे वैद्यकीय क्षेत्रात उज्वल यशसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २७ ( प्रतिनिधी ) तालुक्याचे भूमिपुत्र आणि बीड जिल्ह्याचा स्वाभिमान असलेले डॉ. सिद्धेश्वर श्रीकिसन ठोसर यांनी शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करून एमबीबीएस नंतर अर्थोपेडिक्स मध्ये एम. एस. च्या परिक्षेत प्रथम श्रेणीत उतीर्ण होऊन उज्वल यश मिळविल्याबद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
         याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील सिंदखेड येथील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्रीकिसन सिताराम ठोसर यांचे चिरंजीव डॉ. सिद्धेश्वर ठोसर यांनी आपल्या जीवनामध्ये उज्ज्वल यश मिळवले आहे. सर्वप्रथम ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन आपल्या यशाचा पाया रोवला. गेवराई तालुक्यातील जय भवानी हायस्कूल गढी या ठिकाणी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण हे बीड येथील बलभीम महाविद्यालयात घेतले. या महाविद्यालयातून उत्तुंग यश मिळाल्यानंतर मुंबई येथील जे.जे. हॉस्पिटल या ठिकाणी राहून एम. बी. बी. एस. चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथील एम.आय.एम.ई.आर मेडिकल महाविद्यालयात आर्थोपेडिक मध्ये एम. एस. ची परीक्षा देऊन प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला.
      डॉक्टर सिद्धेश्वर श्रीकिसन ठोसर यांनी आपल्या कार्य कर्तुत्वावर चांगले यश संपादन करून व आपल्या कुटुंबातील सुसंस्कारित ज्ञान बाळगून आणि गावातील थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेत सज्जन मित्र परिवाराच्या सहवासातून मिळवलेले उज्ज्वल यश जीवनाला कलाटणी देणारे ठरले आहे. डॉक्टर सिद्धेश्वर श्रीकिसन ठोसर यांनी मिळवलेल्या या उज्वल यशाबद्दल माजी आमदार अमरसिंह पंडित, पत्रकार सुभाष मुळे, माऊली ठोसर यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

नरसिंहपुर येथे कृषीदुतांनी केले हुमणी किड नियंत्रणाचे प्रात्यक्षिक


बाळू राऊत प्रतिनिधी 
नरसिंहपुर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभवासाठी दाखल झाले आहेत. नरसिंहपुर येथील ७०-८० एकर क्षेत्रातील ऊस हुमणीपासून वाचवण्यासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक व जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. या विद्यार्थ्यांनी सापळा लावून हजारो किडे पकडून विल्हेवाट लावली. आणखी सात दिवस सापळे लावण्यात येणार आहेत. यावेळी कृषीदूतांनी हुमणी नियंत्रणाबद्दल मार्गदर्शन केले. 
 जून ते आॅगस्ट हुमणीचे भुंगेरे जमिनीवर येतात व जमिनीतून बाहेर आल्यावर हे किडे कडूनिंब बोर बाभूळ यासारख्या वृक्षावर राहुन गुजरान व नर माधी मिलन करतात. सूर्योदयापुर्वी परत जातात. त्यामुळे हि किड दिसून येत नाही. प्राथमिक अवस्थेत किडवर कमीत कमी खर्चाने नियंत्रण करण्यासाठी प्रकाश सापळे प्रभावी ठरतात. 
हे कृषीदुत शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे अध्यक्ष मा.श्री. जयसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डि. पी. कोरटकर प्राचार्य आर. जी. नलावडे कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. एकतपुरे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. आर. आडत प्रा. डि. एस. मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम सत्र पुर्ण करणार आहेत
या ठिकाणी रत्नाई कृषी महाविद्यालयातील नरसिंहपुर येथील कृषीदुतांच्या गटात शुभम भिसे स्वप्निल गरड अनिकेत येलपले गणेश माने प्रणित वाघमारे प्रकाश कुराडे अजय कोळी ज्ञानेश्वर जाधव प्रमोद गुंडगिरे हे विद्यार्थी सहभागी झाले होते.