तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 28 June 2019

पाथरी तालुक्यात अजूनही पावसाची प्रतिक्षा;दुबार पेरणीचेही संकट

प्रतिनिधी
पाथरी:-मृग नक्षत्र कोरडे गेल्या नंतर आर्द्रा नक्षत्रात तालुक्यात काही भागात मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले.अनेक शेतक-यांनी मजुरांची उपलब्धता होत नाही म्हणून धूळ पेरणी केली मात्र कमी पाऊस झाल्याने आता धूळ पेरणी वाया जात असून या शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.
शेतक-यांच्या पाठी संकटांची मालिका अजून ही सुरूच आहे. गेली पाच वर्षा पासून खंडवृष्टी मुळे आणि दुष्काळाचा सतत सामना करणारे शेतकरी या वर्षी मान्सूनच्या आगमनाची आतूरतेने वाट पाहात आहेत एप्रिल महिण्यातील ४८° सें. तापमानात भारतीय हवामान विभागाच्या पावसाच्या बातम्यांनी शेतकरी थंडाव्याची अनुभूती घेत या वर्षी तरी पाऊस वेळेवर आणि  समाधान कारक होईल ही अपेक्षा दर वर्षी ठेवतो गत आठवड्यात शुक्रवारी तालुक्याच्या अनेक भागात पाऊस झाला काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जोरदार बरसला कासापुरी भागात नदी नाले प्रथमच वाहिले.या पावसा मुळे धुळ पेरणी केलेल्या शेतातील बियाणे कोमेजले मात्र जमिनिची तृप्ती झालेली नसल्याने अंकूरलेले बियाने जळून जातांना दिसत आहे.या आठवड्यात पुन्हा पावसाला सुरूवात झाली मात्र विशिष्ठ ठिकाणीच तो पडत असल्याने शेतक-यां मध्ये चिंता दिसून येत आहे. आजही तालुक्याच्या दक्षिण भागात गुंज,उमरा,अंधापुरी,कान्सूर,लोणी,मसला,बाबूलतार,टाकळगव्हाण,जैतापुरवाडी,तुरा,सारोळा,पिंपळगाव,फुलारवाडी,विटा,लिंबा,वाघाळा,रेणापुर,पोहेटाकळी,या भागात आणि तालुक्यातील अन्य भागात अजून ही पेरणी योग्य पाऊस नाही या भागा लगतच असलेल्या मानवत तालुक्यातील केकरजवळा,इटाळी,रामेटाकळी,वझूर,हमदापुर,कुंभारी,वांगी भागतची परिस्थिती सारखीच असल्याचे शेतकरी सांगत आहेत.दोन दिवसा पासून पाऊस पुन्हा सुरू झाला मात्र लहरी पणाने पडत असल्याने शेतक-यांची चिंता तर वाढली आहे मात्र आता पिण्याच्या पाण्याचे संकट ही गंभिर बनत चालले आहे.राज्यात अनेक भागात दमदार पाऊस पडत असल्याच्या बातम्या एैकिवात येत असतांना पाथरी तालुक्या सह मानवत तालुक्याचा दक्षिण भाग खंड वृष्टीचा सामना करत आहे.पेरणी साठी किमान सत्तर मीमी पाऊस पडणे गरजे असल्याचे जाणकार सांगतात मात्र अजून ही पाऊस न झाल्याने शेतक-यांची तर चिंता वाढलीच मात्र आता पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चा-याचे संकट गडद होत चालले असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

No comments:

Post a comment