तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 June 2019

डॉक्टर सिद्धेश्वर ठोसर यांचे वैद्यकीय क्षेत्रात उज्वल यशसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २७ ( प्रतिनिधी ) तालुक्याचे भूमिपुत्र आणि बीड जिल्ह्याचा स्वाभिमान असलेले डॉ. सिद्धेश्वर श्रीकिसन ठोसर यांनी शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करून एमबीबीएस नंतर अर्थोपेडिक्स मध्ये एम. एस. च्या परिक्षेत प्रथम श्रेणीत उतीर्ण होऊन उज्वल यश मिळविल्याबद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
         याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील सिंदखेड येथील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्रीकिसन सिताराम ठोसर यांचे चिरंजीव डॉ. सिद्धेश्वर ठोसर यांनी आपल्या जीवनामध्ये उज्ज्वल यश मिळवले आहे. सर्वप्रथम ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन आपल्या यशाचा पाया रोवला. गेवराई तालुक्यातील जय भवानी हायस्कूल गढी या ठिकाणी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण हे बीड येथील बलभीम महाविद्यालयात घेतले. या महाविद्यालयातून उत्तुंग यश मिळाल्यानंतर मुंबई येथील जे.जे. हॉस्पिटल या ठिकाणी राहून एम. बी. बी. एस. चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथील एम.आय.एम.ई.आर मेडिकल महाविद्यालयात आर्थोपेडिक मध्ये एम. एस. ची परीक्षा देऊन प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला.
      डॉक्टर सिद्धेश्वर श्रीकिसन ठोसर यांनी आपल्या कार्य कर्तुत्वावर चांगले यश संपादन करून व आपल्या कुटुंबातील सुसंस्कारित ज्ञान बाळगून आणि गावातील थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेत सज्जन मित्र परिवाराच्या सहवासातून मिळवलेले उज्ज्वल यश जीवनाला कलाटणी देणारे ठरले आहे. डॉक्टर सिद्धेश्वर श्रीकिसन ठोसर यांनी मिळवलेल्या या उज्वल यशाबद्दल माजी आमदार अमरसिंह पंडित, पत्रकार सुभाष मुळे, माऊली ठोसर यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment