तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 28 June 2019

अ‍ॅट्रासिटी, चोरी, लुटमार गुन्हयामध्ये पाच वर्षापासुन फरार असलेला इरफान खॉन पोलिसांच्या ताब्यातपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
       अ‍ॅट्रासिटी, चोरी, लुटमार, फसवणुक या गुन्हयात पाच राज्यातील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला व मागील पाच वर्षापासुन  फरार असलेल्या गुन्हेगारास परळी शहर आणि संभाजीनगर पोलिसांनी सापळा रचुन अटक केली. अटक केलेल्या इरफान खान शरीफ खान यास   संभाजीनगर पोलिसांनी दाखल केले असता त्यास एक गुन्हयात एक दिवसाची पोलिस कोठडी ठोवठवण्यात आली. 
   परळी शहरातील इराणी वस्तीमध्ये राहणारा इरफान खान शरीफ खान याने नागापुर, परळी सह तेलंगणा, गुजरात, मध्यप्रदेश कर्नाटक या राज्यामध्ये  अ‍ॅट्रासिटी, चोरी, लुटमार, फसवणुक व  लुटमारीची गुन्हे केले आहेत. तो मागील पाच वर्षापासुन पोलिसांना गुंगारा देत आला आहे. नागापुर येथील पोलिसांना अनेक गुन्हे मध्ये हवा असलेला आरोपी परळी शहरात असल्याची गुप्त माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे डी.बी.पथक यांनी पथक तयार करुन शहरातील  इराणी वस्तीत सापळा रचला परंतु तो इराणी वस्तीतुन गायब झाल्याची माहिती मिळताच परळी शहर पोलिस ठाण्याचे डी.बी.पथकातील जमादार  बाळासाहेब बांगर, माधव तोटेवाड यांनी गुप्त माहिती घेत हा नागपुर पोलिसांना हवा असलेला आरोपी नवीन थर्मल नजीक असलेल्या सेलु झोपडपट्टी येथे एका महिलेच्या घरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर  सेलु झोपडपट्टी येथे नागपुर येथील पीएसआय राऊत, संभाजीनगर पोलिस ठाण्याच्या अनुसया माने, सविता दहिवाळ, सचिन सानप, दत्ता गित्ते , रमेश सिरसाट आदींनी  सापळा रचला व त्यास रात्री 1 वाजता झोपडपट्टीतील घरातुन अटक केली. सदरील प्रकरण हे संभाजीनगर पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने त्यास संभाजीनगर पोलिसांच्या स्वाधिन केले. यावेळी नागापुर  पोलिसांना हवा असलेला आरोपी हा नसुन दुसराच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या आरोपीची चौकशी केली असता तो इरफान खान असल्याचे निष्पण्ण झाले. इरफान खान याच्यावर परळी शहर, संभाजीनगर पोलिस ठाण्यास परराज्यातील अनेक पोलिस ठाण्यामध्ये अ‍ॅट्रासिटी, फसवणुक, चोरी, चैन स्नॅचींग, लुटमार असे गुन्हे दाखल आहेत. तसेच तो मागील पाच वर्षापासुन अनेक गुन्ह्यामध्ये फरार असल्याचे समजते. अटक केलेल्या इरफान खानला आज दि.28 रोजी परळी न्यायालयात हजर केले असता त्यास एक गुन्हयात एक दिवसाची न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली असुन दुसर्‍या एका गुन्हयात न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. इतर गुन्ह्यामध्ये त्यास दि.29 रोजी न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. सदरील प्रकरणाचा तपास संभाजीनगरचे सहाय्यक पो.नि.सलिम पठाण हे करीत आहेत.

No comments:

Post a comment