तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 June 2019

वादळात जमिनदोस्त झालेल्या सिमेवरील जवानाच्या केळीचा महिणाभरा नंतर ही पंचनामा होईना;निवेदनाचा कागद घेऊन फिरतोय प्रशासनाच्या दारी

किरण घुंबरे पाटील
पाथरी:-जुन महिण्यात झालेल्या वादळात लोणी बु. शिवारातील शेतात वादळी वा-याने आसामात कार्यरत असलेल्या जवानाच्या उभ्या केळी जमिनदोस्त झाल्या या विषयी तहसिल प्रशासनाला निवेदन दिल्या नंतर आज पर्यंत ही या केळी पिकाचा पंचनामा न झाल्याने निवेदनाचा कागद घेऊन सुट्टीवर आलेला हा जवान महसुल प्रशासनाच्या दारी फिरत आहे.
जुन महिण्यात चार तारखेला सायंकाळी वादळी वारे झाल्याने लोणी बु. शिवारातील मुलीधर बालासाहेब धर्मे,प्रल्हाद बालासाहेब धर्मे यांच्या गट क्र ३१७ या शेतातील दोन एकर केळीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते या वेळी गावचे तलाठी श्रीनिवास तायनाक यांना या विषयी कल्पना दिली त्या नंतर तहसिलदार यांना गावातील भागवत रतनराव सौदरे,विठ्ठल रामकिशन काळे, लिंबाजी तान्हाजी कोरडे, नारायण मारोती खुपसे,या सह अन्य नुकसान झालेल्या शेतक-यांनी निवेदन दिले होते मात्र महिणा होत आला तरी या केळी पिकांचे पंचनामे केले गेले नाहीत या विषयी परभणी जिल्हाअधिकारी यांनी १३ जुन रोजी तालुक्यात झालेल्या पाऊस व वादळी वा-यातील फळ पिकांचे झालेल्या नुकसानिचे पंचनामे गावनिहाय संयुक्त पणे करून तात्काळ अहवाल या कार्यालयास द्यावा असे आदेश काढल्या नंतर पाथरी तहसिलदारांनी तलाठी, कृषी सहायक,ग्रामसेवक यांनी संयुक्त पंचनामे करून दोन दिवसात अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले होते. विलंब झाल्यास नैसर्गिक आपत्ती अधिनियम २००५ नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करणार असल्याचे पत्र दिले होते. या वेळी तलाठ्या सह कृषी सहायक,ग्रामसेवक यांनी पंचनामे केले नसल्याने शनिवार २९ जुन रोजी लोणी बु.येथील सैन्यात असलेला जवान मुरलीधर बालासाहेब धर्मे यांच्या सह प्रल्हाद बालासाहेब धर्मे, भागवत रतनराव सौदर्ये, विठ्ठल रामकिशन काळे, लिंबाजी तानाजी कोरडे,नारायन मारोती खुपसे, रघुनाथ नागोराव शिंदे आदी केळीचे नुकसान झालेल्या शेतक-यांनी निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

1 comment:

  1. विषमतावादी समाज व्यवस्था आज सत्ताधारी झाली आहे.वर्णव्यवस्था नुसार न्याय व्यवस्था काम करीत आहे.मागासवर्गीय समाजावर अन्याय होतो तेव्हा आपल्याला दुःख होत नाही,किंवा वाईट पण वाटत नाही पण जेव्हा वर्णव्यवस्था नुसार शूद्र असणाऱ्या समाजावर जो जेव्हा अन्याय होतो तेव्हा ते गर्वसे कहो हम हिंदू है विसरले असतात.मग न्याय मिळाला म्हणून संघर्ष करतात पण कोणा विरोधात????

    ReplyDelete