तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 28 June 2019

उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामेश्वर लटपटे सत्कार

                            परळी वैजनाथ :- २८ ( प्रतिनिधी )
    येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामेश्वर लटपटे यांच्या माध्यमातून अवघड शस्त्रक्रिया करण्याचा क्रम वाढतच असून आज अशीच एक अपेंडीक्स ची अवघड शस्त्रक्रिया केल्याने डॉक्टर लटपटे यांचे परिसरात अभिनंदन होत आहे.
       उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि परळी शहराचे प्रसिद्ध जनरल सर्जन डॉक्टर रामेश्वर लटपटे यांनी या ठिकाणचा पदभार स्वीकारताच मोठ मोठ्या शस्त्रक्रिया करण्यास प्रारंभ केला. अन्ननलिका स्तणाची कॅन्सर, पोटाचे विकार यासारख्या अवघड शस्त्रक्रिया यांच्या हस्ते यशस्वीरित्या संपन्न झाल्या.
     अशीच एक पोटाच्या विकाराची अवघड शस्त्रक्रिया डॉक्टर रामेश्वर लटपटे यांच्या हस्ते यशस्वीरित्या संपन्न झाली ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांचे पुतणे गोपाल बद्दर वय चोवीस हे गेली आठ दिवसापासून पोटाच्या दुखण्याने त्रस्त होते त्यांनी डॉ लटपटे यांना दाखवले असता त्यांनी गोपाल बद्दर यांना तपासले व विविध तपासण्या करून घेतल्या असता तपासण्याच्या अहवालावरून गोपाल बद्दर अपेंडिक्स ने त्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे ऑपरेशन करणे आवश्यक असल्याचे समोर आल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला व ऑपरेशन यशस्वीरीत्या करून गोपाल बद्दर यांच्या पोटातून गाठ काढली.
       वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामेश्वर लटपटे यांच्या माध्यमातून परळी उपजिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य जनतेसाठी देवरूपी डॉक्टर मिळाले असून आपल्या पुतण्याची यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केल्या बद्दल ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांनी डॉ लटपटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार केला.
     या यशस्वी शस्त्रक्रिया करणे कामी डॉक्टर रामेश्वर लटपटे यांना भूलतज्ञ डॉक्टर एल डी लोहिया स्टाफ नर्स विभागाच्या प्रमुख संगीता फड व शिवकन्या सेफ यांनी सहकार्य केलं.

No comments:

Post a comment