तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 28 June 2019

चैन साखळी चोरणार्‍या दोन बुरखाधारी महिलांना परळी शहर पोलिसांकडुन अटक


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- 
परळी शहरातील सोने चांदीचे व्यापारी बालाजी टाक यांच्या दुकानातुन दि.08 जुन रोजी सोन्याच्या चैन दाखविण्याच्या बहाण्याने चैन चोरी करणार्‍या दोन बुरखाधारी महिलांना परळी शहर पोलिसांच्या डी.बी.पथकाने औरंगाबाद येथुन अटक केली. सदरील दोन्ही महिला या बहिणी असल्याचे समजते. 
परळी शहरातील सोने चांदीचे व्यापारी बालाजी प्रकाशराव टाक यांच्या दुकानात दि.08 जुन रोजी सोने खरेदीच्या निमित्ताने चैन साखळी बघण्यासाठी दोन बुरखाधारी महिला घुसल्या व त्यांनी सात ग्रॅमची 23 हजार 100 रु.ची सोन्यची चैन पळवली ही बाब बालाजी टाक यांच्या लक्षात येताच त्यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातुन सदरील महिलांची ओळख पटविण्याचा व शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या कुठेच आढळुन न आल्याने दि.20 जून रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील महिलांचा शोध घेण्याचे परळी शहर पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. शहर पोलिसांनी पो.नि.देविदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.मेंडके, डी.बी.पथकातील जमादार बाळासाहेब बांगर, माधव तोटेवाड, सुंदर केंेदेे, गुड्डे, दहिवाळ यांनी पथक तयार केले. सदरील चोरी प्रकरणात वापरण्यात आलेल्या गाडी क्रं. एम.एच.20 ई.एल.1621 चा चालक मोहम्मद फरहाण (वय 24) यास  औरंगाबाद येथुन दि.21 जुन रोजी अटक केली. व त्यास पोलिस कोठडी मिळताच सदरील महिलांची ओळख व ठिकाणा सांगितल्या नंतर सदरील सोन्याचे चैन चोरणार्‍या सय्यद शबाना बेगम उर्फ शबो इम्रान वय 34 वर्षे रा.नंदनवन कॉलनी औरंगाबद व मुन्नी उर्फ परवीन शेख अब्दुल रहिम वय 37 रा.संजयनगर, भाईज पुरा औरंगबाद यांना अटक केली व त्यांच्याकडुन चोरी केलेला 23 हजार 100 रु.चा मुद्देमला जप्त केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर या बुरखाधारी महिलांच्या परळीशहर पोलिसांनी अवघ्या सात दिवसात मुसक्या आवळल्या.

No comments:

Post a comment