तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 30 June 2019

परळी नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये- .प्रा.पवन मुंडे
परळीत अस्वच्छतेचा कळस,स्वछतेसाठी महिन्याला होणारा 18 लक्ष खर्च कोणाच्या घशात

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी नगर पालिकेने शहराच्या स्वच्छतेचे वाटोळे केले असून,परळीत जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे,परळी नगर पालिका महिन्याला जवळपास 18 लक्ष खर्च करते पण स्वछतेची कामे मात्र कोठे ही झालेली दिसत नाहीत, शहरातील ज्या नाल्या पूर्वी चार दिवसाला काढल्या जायच्या त्या नाल्या आता चार महिन्याला सुद्धा काढल्या जात नाहीत आणि एखाद्या वेळेस काढलेल्या नाल्यांचा कचरा परत उचलला जात नाही तो परत नालीत जाऊन पडतो आशा निष्क्रिय पणा मुळे आणि या अस्वच्छतेणे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले  या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ,मग नगरपालिकेचा महिन्याला स्वच्छता वरील खर्च नेमका कुठे जातो असा सवाल भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केला आहे.
       या वर्षी सुदैवाने  शहरात पावसाला थोडी का होईना सुरुवात झाली आहे पण पडत असणाऱ्या पावसाच्या पाण्याने या कचऱ्याचा घाण व कुबट वास सुटला आहे परिणामी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,या मुळे अनेक बालके व वृद्ध आजारी पडत आहेत,नागरिकांच्या आरोग्याशी नगर पालिका किती दिवस खेळणार असा सवाल या प्रसंगी भाजपा नगरसेवक  प्रा पवन मुंडे यांनी केला आहे
मान्सून पूर्व स्वछतेची कामे अपूर्ण झाल्या मुळे जिकडे तिकडे कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत तसेच शहरातून वाहणाऱ्या मोठ्या नाल्यांची स्वच्छता न केल्या मुळे शहरातील सर्व मोठे नाले हे कचऱ्याने भरून वाहत आहेत,येणाऱ्या काळात मोठा पाऊस आला तर या नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घरात शिरण्याची शक्यता आहे, अनेक भागात नाल्या न काढल्याने त्या कचऱ्याने तुडुंब भरलेल्या आहेत त्या मुळेंत्या नाल्यातील पाणी तुंबून त्या ठिकाणी मोठया प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊन परीसरात रोगराई चे वातावरण निर्माण झाले आहे.लोकांच्या सहनशीलतेचा अंत नगरपालिकेने पाहू नये,नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार नगरपालिकेला कोणी दिला असा प्रश्न प्रा पवन मुंडे यांनी उपस्थित केला आहे

No comments:

Post a comment