तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 July 2019

डोपींग - खेळाडूंना यशस्वी होण्याचा छुपा मार्ग


            मुंबईचा व भारताचा उदयोन्मुख क्रिकेटपटू पृथ्वी शॉला मोठा धक्का बसला आहे. खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेलं औषध पृथ्वी शॉला महागात पडलं असून डोपिंग चाचणीत दोषी ठरल्याने पृथ्वीला बीसीसीआयने आठ महिन्यांसाठी निलंबित केलं आहे. १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत त्याला अधिकृत क्रिकेटपासून दूर राहावं लागणार आहे.

             पृथ्वी शॉने अनावधानाने प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केलं आहे. सामान्यपणे वाडाकडून बंदी घातलेले टर्बोटेलीन हे उत्तेजक घटक खोकल्याच्या औषधात असते. शॉने या पदार्थाचे सेवन करणे हे डोपिंग नियमांचं उल्लंघन असून त्यामुळेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे
                  पृथ्वी शॉला आठ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. १६ मार्च २०१९ ते १५ नोव्हेंबर २०१९ असा निलंबनाचा कालावधी असेल. त्यामुळे बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात होणाऱ्या आगामी मालिकांमध्ये त्याला संधी मिळू शकणार नाही, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे.
                पृथ्वीसह विदर्भ संघाकडून खेळणारा अक्षय दुल्लारवार आणि राजस्थानकडून खेळणारा दिव्य गजराज यांनाही डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने निलंबित करण्यात आले आहे.
           पृथ्वी शॉ भारताकडून दोन कसोट्या खेळला असून कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा भारताचा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला असून, त्याच्या नेतृत्वाखाली सन २०१७ मध्ये भारताने १९ वर्षाखालील मुलांचा विश्वकरंडक जिंकला आहे.पृथ्वी हा भारताचा भविष्यातील स्टार खेळाडू असून त्याच्याकडे मोठ्या आशेने बघितले जाते.  पृथ्वी शॉवर गुदरलेला प्रसंग व झालेली कारवाई बघता. हा भारतीय क्रिकेटला बसलेला मोठा हादराच म्हणावा लागेल.

            २३ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताIकडून शेवटचा सामना खेळला होता. वेस्टइंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते.

          डोपिंग म्हणजे काय तर आंतराष्ट्रीय क्रिडा परिषदेने बंदी घातलेले उत्तेजक पधार्थांचे बेकायदेशीररित्या सेवन करणे. उत्तेजक पदार्थांच्या सेवनाने खेळाडूंची शारिरीक क्षमता वाढते व ते आपल्या कुवतीपेक्षाही भरीव कामगिरी करतात त्यामुळे त्यांचे प्रदर्शन सामान्य खेळाडूंपेक्षा चांगले होते. असे करणाऱ्या खेळाडूंवर बंदी घातली जाते. ही बंदी त्याच्या गुन्ह्यावर अवलंबून असते. तिची काल मर्यादा ठरविण्याचा अधिकार संबधीत संघटना व देशाला असतो. खेळाडूंच्या लघवीची तपासणी करून ही टेस्ट घेतली जाते.

             स्वतःचे प्रदर्शन सुधारण्यासाठी बेकायदेशीरपणे उत्तेजक पदार्थ सेवन करणारा पृथ्वी शॉ हा काही पहिला खेळाडू नाही. जगातले सर्वच खेळातले खेळाडू असे गैरप्रकार करतात. त्याची सजाही त्यांना भोगावी लागते.

              क्रिकेट मध्येही अघोरी प्रकार घुसल्याने नैसर्गिक गुणवत्ता नसलेले खेळाडूही विक्रमी कामगिरी करू लागले. त्यामुळे गुणवान खेळाडू झाकोळले जात आहेत.

             चला तर मग डोपींगसारख्या  अघोरी कृत्याचा सहारा घेणाऱ्या क्रिकेटपटूंवर नजर टाकू या.

              युसुफ पठाण : -भारतीय संघाचा हा अष्टपैलू खेळाडू मार्च २०१७ मध्ये डोप टेस्टमध्ये दोषी आढळला. यानंतर युसुफने आपली सफाई देताना स्पष्ट केले की त्याने त्याच्या आजारपणाच्या कालावधीत घेतलेल्या औषधांमध्ये प्रतिबंधीत औषधाचा समावेश होता. त्याने कामगिरीत सुधारणा होण्यासाठी सदर उत्तेजक पधार्थाचा जाणूनबुजून वापर केला नाही. या गुन्ह्यासाठी त्याच्यावर पाच महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.

           मोहम्मद आसिफ : - हा पाकीस्तानचा जलदगती गोलंदाज. त्याच्या कारकिर्दीत मॅच फिक्सींग, स्पॉट फिक्सिंग, डोपींग या प्रकरणानेच जास्त वादग्रस्त ठरला. सन २००८मध्ये तो डोप टेस्टमध्ये दोषी सापडला. सन २००६ मध्येही त्याच्यावर या प्रकारचे आरोप लागले होते. सदर डोपिंग प्रकरणात एक वर्ष तर फिक्सींग प्रकरणात त्याला क्रिकेट खेळण्यावर अजन्म बंदीची शिक्षा झाली आहे.

                   शोएब अख्तर : - हा सुध्दा पाकिस्तानचा खेळाडू. जगातील सर्वात जलदगती गोलंदाजांत याची गणना होत असते. रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला शोएब अख्तर सन २००८ मध्ये उत्तेजक पदार्थ सेवन चाचणीत दोषी आढळला होता. नानड्रोलोन नावाचं उत्तेजक पधार्थ त्याने सेवन केल्याचे सिध्द झाले होते. यावर त्याच्या डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या हर्बल औषधात कोणीतरी जाणूनबुजून हे उत्तेजक मिसळले.

शेन वॉर्न : - हा ऑस्ट्रेलियन खेळाडू जगातल्या सर्वकालीन महान गोलंदाजात दुसऱ्या क्रमांकावर आहे.  त्याच्या कारकिर्दीत तो फिक्सींग, ड्रींकींग, लफडे बाजी, डोपींग या प्रकरणामुळे सतत चर्चेत राहायचा. सन २००३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या संघातून त्याची हकालपट्टी करण्यात आली. या स्पर्धेपूर्वी घेतलेल्या डोप टेस्टमध्ये त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.

 यासीर शहा : - हा पाकिस्तानचा लेगस्पिनर.      सन २०१६ मध्ये उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्याने त्याच्यावर तिन महीन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्याला २०१६ चा टि-२० विश्वकप व आशिया चषक

स्पर्धेच्या संघातून वगळले होते.


             इयान बोथम : - इंग्लंडचा हा महान अष्टपैलू खेळाडू. सन १९८९ मध्ये डोप टेस्टमध्ये फेल गेल्याने ६३ दिवस शिक्षा म्हणून क्रिकेट मध्ये हद्दपार केला होता. त्यानंतर पुनरागमन करता सर्वाधीक बळी घेण्याचा डेनिस लिलीचा विक्रम मोडला.

                 स्टिफन फ्लेमिंग :- हा न्यूझिलंडच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. सन १९९३ - ९४ मध्ये न्यूझिलंड संघ वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये तो स्वतः तसेच त्याचे संघ सहकारी डियॉन नॅश व मॅथ्यू हर्ट बंदी असलेले कॅनबीस हे उत्तेजक सेवन करत असताना पकडले होते. त्यावेळी प्रत्येकी १७५ डॉलरचा दंड त्यांना करण्यात आला होता.

              अॅलेक्स हेल्स : - हा इंग्लंडचा सलामीवीर विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी डोप टेस्टमध्ये दोषी आढळल्याने विश्वचषक स्पर्धेला मुकला. पुढील सहा महिने त्याचा शिक्षा कालावधी असेल.

             आजच्या स्पर्धात्मक युगात झटपट यशस्वी होण्यासाठी खेळाडू डोपींग सारखा जीवघेणा प्रकार अवलंबतात. त्यामुळे त्यांची कारकिर्द धोक्यात तर येतेच परंतु त्यांच्या संघावरही नामुष्की येते. यशस्वी होण्यासाठी असले शॉर्टकट नव्हे तर कठोर मेहनत गरजेची आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे                           लेखक - क्रिकेट समिक्षक

 - दत्ता विघावे, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल.

प्रतिनिधी भारत. 

मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट.

मोबाईल - ९०९६३७२०८२.  

सात्रळ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत “जलशक्ती अभियान” कार्यक्रमाचे आयोजन –


सात्रळ/ प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे
      लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधिने सन्मानीत ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ, येथे मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील  यांचे वाढदिवसानिमित्त नियोजित उपक्रमातील राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत  “जलशक्ती अभियान” कार्यक्रमाचे  आयोजन   करण्यात आले.
       सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ पोंधे जी.एम. विभागप्रमुख, पर्यावरणशाश्र , पी.व्ही पी  कॉलेज लोणी हे होते तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. रंगनाथ भिकाजी दिघे पा. घोलप व पंचकृशीतील जेष्ठ ग्रामस्थ मा. कारभारी डुक्रे हे उपस्थित होते.
     भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या संपूर्ण भारत देशामध्ये जलशक्ती अभियान राबविण्याबाबत दिलेल्या  निर्देशानुसार महाविद्यालयात रासेयो स्वयंसेवकांनी विविध उपक्रमाचे आयोजन केले त्यामध्ये दि.२७ जुलै २०१९ रोजी सकाळी १० वा.सात्रळ गावात सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक यांनी जलसाक्षरता व वृक्ष दिंडी चे आयोजन केले व दि.३० जुलै २०१९ रोजी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. रंगनाथ भिकाजी दिघे पा. व पंचकृशीतील जेष्ठ ग्रामस्थ मा. कारभारी डुक्रे व गावातील ग्रामस्थ यांच्या मदतीने वृक्षारोपण करण्यात आले व डॉ पोंधे जी.एम. यांनी वृक्षारोपण व जल संवर्धन या विषयावर व्याखान देऊन हे किती गरजेचे आहे. या बाबत उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक यांना उपक्रमशील बनण्यास सांगितले.
     सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो  कार्यक्रम अधिकारी प्रा.आर एस भडकवाड यांनी व सूत्रसंचालन प्रा.पंडूरे लतिका यांनी केले या कार्यक्रमासाठी साठी महाविद्यालयाचे प्राचार्या मा.सिनगर मॅडम, उपप्राचार्य डॉ.घोलप डी एन, प्रा.हराळे पी.एल , प्रा. पंडूरे लतिका प्रा.दिघे व्ही एल यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर सेवक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

संत संगतीने अनिष्ठ रुढीचा र्‍हास होतो-ह.भ.प.तुकाराम शास्त्री मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
ज्याच्या मनामध्ये परमेश्‍वर असतो, ज्याची संगत संतांशी असते अशा व्यक्तीच्या जीवनातुन संत संगतीमुळे अनिष्ठ रुढीचा र्‍हास होतो असे प्रतिपादन ह.भ.प.तुकाराम शास्त्री महाराज मुंडे यांनी केले.
वै.प्रा.हरिश्‍चंद्र गित्ते यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहातील किर्तनामध्ये  दुसरे पुष्प गुंफतांना ह.भ.प.तुकाराम शास्त्री मुंडे यांनी देव वसे ज्याच्या चित्ती त्याची घडवाी संगती या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर विमोचन देतांना ज्याच्या मनामध्ये  भगवंत आहे. अशा व्यक्तींना तसेच संत संगतीमुळे सन्मार्ग मिळतो. अज्ञानामुळे माणुस भौतिक सुखाच्या मागे धावतो. परंतु संत संगतीतुन मिळालेले ज्ञान हे शाश्‍वत सुखाकडे घेऊन जाणारे असते. यामुळे खर्‍या सुखासाठी संत संगती आवश्यक असल्याचे ह.भ.प.तुकाराम महाराज शास्त्री यांनी सांगितले. यावेळी ह.भ.प.तुकाराम शास्त्रीयांचे राजेश गित्ते यांनी तुळशीकुंडी देत स्वागत केले. तसचे अखंड हरिनाम सप्ताहात ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या वाणीतुन शिवलीलामृत कथा ऐकण्यास भाविकांची गर्दी होत आहे. आज रात्री 9 ते 11 ह.भ.प.भरत महाराज जोगी यांचे किर्तन होणार आहे.   या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक तथा हरिसुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश गित्ते, धनंजय गित्ते, अजय गित्ते, बलभीम गित्ते व गित्ते परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

वृक्ष लागवड चळवळीमुळे निसर्गाचे संतुलप राखण्यास मदत-धनराज गित्तेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- 
शासनाच्या सध्या वृक्ष लागवड मोहिम हाती घेण्यात आली असुन ही मोहिम निसर्गाचे संतुलन राखण्यास मदत करणारी असल्याचे प्रतिपादन नंदागौळ येथील युवा नेते धनराज गित्ते यांनी केले. 
तालुक्यातील दत्तपुर येथे शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत वृक्षरोपणाचा कार्यक्रम धनराज गित्ते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 400 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलतांना युवा नेते धनराज गित्ते म्हणाले की, मागील कांही वर्षामध्ये भरमसाठ वृक्षतोडीमुळे निसर्गाचे संतुलन बिघडुन पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. वृक्ष लागवडी बाबत शासनास विविध सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने जनजागृती करण्यात येत असुन मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड झाली तर निसर्गाचे संतुलन कायम राहुन पावसाचे प्रमाण वाढेल. वाढेल असे सांगत प्रत्येकाने किमात एक तरी झाड लावे असे आवाहन केले. यावेळी सरपंच आत्माराम गित्ते, उपविभागीय भाऊसाहेब नागरगोजे, इंजिनिअर आर.बी.काळे यांची उपस्थिती होती.

महिला महाविद्यालयात मुंशी प्रेमचंद यांची जयंती साजरीसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ३१ ( प्रतिनिधी ) जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या महिला महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने कथासम्राट मुंशी प्रेमचंद यांची जयंती संपन्न झाली.
      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कांचन परळीकर या होत्या दरम्यान हिंदी विभागाच्या अध्यक्ष प्रा. डॉ. संगिता आहेर यांंची तर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलतांना डॉ. संगिता आहेर म्हणाल्या की, प्रेमचंद यांनी आपल्या कथा व कादंबऱ्यांमध्ये संपूर्ण ग्रामीण भारताचे चित्रण केले आहे. शोषित, पिडित आणि वंचितांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी आपल्या लेखनीतून केले, त्यामुळेच त्यांना 'कलम का सिपाही' असे म्हणतात. त्यांची सर्वाधिक चर्चित कादंबरी 'गोदान' मधून त्यांनी शेतकऱ्यांची दैन्यावस्था सुंदर शब्दांत मांडली आहे. शेतकऱ्यांची छोटीशी इच्छा जिवंतपणी तर नाहीच पण मरतेवेळीही पूर्ण होत नाही, याचे वास्तव चित्रण त्यांनी मांडले आहे.दरम्यान अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डॉ. कांचन परळीकर यांनी प्रेमचंद यांच्या साहित्याचा मागोवा घेत सविस्तर मार्गदर्शन केले. 
        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागाचे प्रा. डॉ. संतोषकुमार यशवंतकर यांनी केले तर आभार मनिषा गव्हाणे हिने मानले. कार्यक्रमास विद्यार्थिनी - प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

मंगरुळपीर येथे जलशक्ती अभियान अंतर्गत " प्रभात फेरीचे "आयोजन


फुलचंद भगत
 मंगरुळपीर-नगर परिषद  अंतर्गत जल-शक्ती अभियान राबविण्यात येत आहे.या अनूषंगाने दि.१ आॅगष्ट रोजी जलशक्ती जाणीव जागृतीसाठी सकाळी १०-३० वाजता प्रभातफेरीचे आयोजन करन्यात आले आहे.
             जलशक्ती अभियान अंतर्गत दि.१ जुलै ते १५ सप्टेबर या कालावधीमध्ये जनआंदोलनाच्या माध्यमातुन जलशक्ती ऊपक्रमाची अंमलबजावणी करन्यात येत आहे.जनतेमध्ये पाण्याचा योग्य,प्रकारे वापर,पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये जिरवणे, पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करने,वृक्ष लागवड करणे, असे विविध उपक्रम राबविवुन जनतेमध्ये जनजागृती व्हावी करिता प्रभातफेरीचे आयोजन दिनांक 1  ऑगस्ट 2019 रोजी, वेळ सकाळी 10:30 वा,नगर परिषद मंगरुळपिर येथून करण्यात आले आहे.या कार्यक्रमामध्ये सर्व जनतेंनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन न.प.मुख्याधिकारी मिलिंद दारोकार आणी सहा.प्रकल्प अधिकारी राहुल भगत तसेच नगर परिषद प्रशासनाडून करन्यात आले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

संत सावता महाराज समाधी महोत्सवानिमित्त पालखी सोहळा ; टाळमृदंगाच्या गजरात पालखीची नगर प्रदिक्षणा आज ह.भ.प.विठ्ठल महाराज उखळीकर यांचे काल्याचे किर्तन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
संत सावता महाराज समाधी महोत्सवानिमित्त परळी येथे सावता महाराज मंदिरात दि.25 जुलै पासुन सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज दि.01 ऑगस्ट रोजी ह.भ.प.विठ्ठल महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार असुन यानिमित्त दि.31 रोजी परळी शहरातील सावता महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यात महिला भाविकांसह टाळकरी भजनी मंडळींनी सहभाग नोंदविला.
संत सावता महाराज समाधी महोत्सवानिमित्त   सावता महाराज मंदिर येथुन दुपारी 1 वाजता टाळ, विना, मृदंग व बँन्ड लेझीमच्या निनादात कलशधारी महिला भाविकांच्या सहभागासह पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. गणेशपार, अंबेवेस, वैद्यनाथ मंदिर, सोपानकाक मंदिर, राणी लक्ष्मीबाई टॉवर, विठ्ठल मंदिर मार्गे ही पालखी सावता महाराज मंदिरात दुपारी 4 वाजता आली. पालखी सोहळ्याचे ठिकठिकाणी रांगोळी काढुन, भाविकांनी स्वागत केले. सावता महाराज यांच्या पालखीचे परळीकरांनी दर्शन घेतले. या अखंड हरिनाम सप्ताहाची आज दि.01 ऑगस्ट रोजी सांगता होणार असुन सकाळी 10 ते 12 ह्यावेळेत ह.भ.प.विठ्ठल महाराज उखळीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. 7 दिवस चाललेल्या या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्लिट्ज़ स्टाइल आइकन 2019 फिल्मी सिताऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलामुंबई (प्रतिनिधी) :- ग्लिट्ज़ स्टाइल आइकन 2019 या कार्यक्रमास सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी भाग घेतला. प्रख्यात चित्रपटसृष्टी देखील तेथे हजर होती. या मध्ये तेनालीरामा चे पंकज बैरी, प्रिया मलिक सिंगर, सुनील पाल, पिंक, गुरुजी देवेंद्र जी. 
अनुकरणीय योगदान आमच्या मॉडेलकडून आले. ते सर्व मार्गातून आले आहेत मध्यप्रदेश तामिळनाडू राजस्थान महाराष्ट्र आणि नक्कीच दिल्ली मिस ग्लिट्ज़ स्टाइल आइकन साठी 18 स्पर्धक या कार्यक्रमाला सर्वांचेच सहकार्य मिळाले.
डॉ. मुनीराह कुरैशी शोच्या आयोजीका यांनी संपूर्ण टीमचे आभार मानले श्री अशरफ शेख एम.यू.एन.ए,  डॉ अमजद खान आय-केअर, श्री अजय राठोड सायबरबर्ग, श्री कलीम शेख मजन, श्रीमती .शमीम धामस्कर, श्री के रवी - समाजसेवी व पत्रकार, श्री रमाकांत मुंडे - वरिष्ठ सिने फोटोग्राफर और मीडिया, राजू टांक - महान सिंगर. राजन गाला - बीजनेसमन, प्रदीप जैन - समाजसेवी. 
घरगुती हिंसाचार थांबवा आपले घरगुती हिंसाचारापासून मुक्त होऊ द्या.
हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिफा निसर्गोपचार केंद्रासमवेत महाराष्ट्र युनायटेड असोसिएशन, एचसीएफ आणि आय केअर यांनी सहारा स्टार येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता.  
...... छायाकार : रमाकांत मुंडे मुंबई

परळीतील वृक्षसंवर्धन चळवळ उभारीचे पुढचे पाऊल !सिने अभिनेते सयाजी शिंदे व पत्रलेखक अरविंद जगताप यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायकल रॅली


परळी (प्रतिनिधी) :- 
          परळी शहरातील रस्त्यावरील झाडांच्या बाजुने खोदुन त्यात पाणीपुरवठा करत हजारो झाडांना जीवदान देणे, विविध माध्यमातून जाणीव-जागृती व श्रमदान करण्याच्या वृक्षमित्रांच्या प्रयत्नांमुळे शहरातील सामाजिक व पर्यावरणीय जाणीवा दृढ असलेली मंडळी एकवटली.या मुळे वृक्षसंवर्धनाची चळवळ  बळकट होत असल्याचे सुखावह चित्र दिसून येत आहे. या चळवळीला उभारी देण्यासाठी सिने अभिनेते सयाजी शिंदे व चला हवा येऊ द्या फेम लेखक अरविंद जगताप यांच्या उपस्थितीत दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायकल रॅलीने शहरात जनजागृती करण्यात येणार आहे.
          प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे व चला हवा येवू द्या फेम पत्रलेखक अरविंद जगताप यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून शहरातील मुख्य मार्गा वरून वृक्षसंर्धन जनजागृती सायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
     दुष्काळी परिस्थितीत झाडांच्या संवर्धनासाठी परळीतील  युवकांनी पुढाकार घेतला यास परळीकरांचा उस्त्फुर्त प्रतिसाद मिळत ही वृक्षसंवर्धन मोहीम चळवळ बनली. शहर व परिसरात वृक्ष लागवडी सोबत संगोपन करण्यासाठी काय करता येईल यावर सखोल विचार मंथन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. यात समाजातील शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यावसायिक, उद्योजक, राजकीय, पत्रकार आदी सर्व क्षेत्रातील मंडळी सहभागी झाले.
            आपले शहर-  आपले आरोग्य -आपले पर्यावरण समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या या युवकांना प्रतिसाद देत या सुरू झालेल्या सकारात्मक कामात प्रत्येकाने सहभागी होण्याची गरज आहे. शहरात आयोजित करण्यात आलेल्या या सायकल रॅली त मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वृक्षमित्रानी केले आहे.

Tuesday, 30 July 2019

विद्यानिकेतन इंग्लिश मिड़ीयम स्कुल चे विद्यार्थी आता होणार विमा संरक्षीतसात्रळ प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे
    विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम  स्कुल च्या सात्रळ ता.राहुरी  व अहमदनगर च्या सर्व विदयार्थांचा विमा उतरविनार असल्याचे स्कुल चे अध्यक्ष मिलींदभाऊ अनाप यांनी माहिती देताना  सांगितले.
     विमा हि काळाची गरज आहे हे ओळखुन आपल्या स्कुल मध्ये अँडमिशन घेणाऱ्या प्रत्येक मुलाचा विमा काढण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. आज पर्यत अनेक  स्कुल सुरू झाल्या परंतु असा निर्णय आज पर्यत कोणीही घेतला नाही. विशेष म्हणजे या विम्यासाठी येणारा खर्च स्कुल करणार आहे त्यासाठी  पालकांन कडून कुठल्याही  प्रकारचे पैसे घेतले जाणार नाही.
काल स्कुल च्या सात्रळ शाखेत एका  बैठकीत अनाप बोलत होते. त्यावेळी त्यांनी हि माहीती दिली पुढे ते म्हणाले कि दोन तीन विमा कंपन्यासोबत बोलणे सुरू आहे. आपल्या परिसरातीलच नव्हे तर जिल्हयातील विद्यानिकेतन हि विद्यार्थीचा विमा उतरविणारी  पहीलीच स्कुल ठरणार आहे . विशेष म्हणजे गेल्या वर्षी आपल्या स्कुल मध्ये मुलाच्या सुरक्षेसाठी दोन्ही स्कुलमध्ये सी सी टी व्ही कैमेरे बसवण्यात आलेले आहे तसेच प्रत्येक मुलाची बायोमेट्रीक थम हाजेरी ही सुरू करण्यात आलेली आहे . दूसरे म्हणजे या वर्षी कराटे व योगा भरतनाट्यम संगीत हे ही सुरू करण्यात येणार असल्याचे श्री अनाप यांनी यावेळी सांगीतले.
 यावेळी स्कुल च्या उपाध्यक्षा सौ अर्चनाताई अनाप ,प्रिन्सीपल दिपाली अनाप अहमदनगर शाखेच्या असावरी बनसोडे नरेद्र ,अनाप, वैशाली गागरे,प्रियंका अनाप,दिपाली वाणी, पुजा ढेपे आदी उपस्थीत होते.

वाशिम-मंगरुळपीर रस्त्यावर ट्रक पलटी


वाशिम - मंगरूळपीर या मार्गाचे काम सुरू असून, रस्त्याच्या बाजूचा भराव मुरूमाने न भरता काळया मातीने भरण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यालगतचा भाग खोलगट तसेच भूसभुसीत झाला आहे. ३० जुलै रोजी सकाळच्या सुमारास वाशिमवरून एमएच १३ यू ४०५७ क्रमांकाचा ट्रक मंगरूळपीरकडे जात असताना पार्डी टकमोर फाटयाजवळ समोरून येणाº्या खासगी बसने कट मारल्याने ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता, यामध्ये ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. चालकाने प्रसंगावधान राखून ट्रकमधून खाली उडी मारली. या घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नाही.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

कर्णधार, प्रशिक्षक व निवड समिती बदलण्याची वेळ आली आहे               भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची मुदत विश्वचषक स्पर्धेपर्यंतच होती. आता त्याजागी नव्या प्रशिक्षकांच्या नियुक्तीची तयारी सुरू असली तरी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मात्र शास्त्री यांच्याच पारड्यात माप टाकायच्या तयारीत आहे. संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री हेच असावेत, असे मत त्याने मांडले आहे. 
               भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण तसेच क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांना वर्ल्डकपनंतर ४५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यादरम्यान, नवे प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफ यांची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय सल्लागार समिती यावर निर्णय घेणार आहे.
              कोहली म्हणतो की, सल्लागार समितीने अद्याप माझ्याशी संपर्क साधलेला नाही. पण संघातील सर्वांचे 'रवी भाई' यांच्याशी उत्तम सूर जुळले आहेत आणि त्यांना प्रशिक्षकपद पुन्हा सोपविण्यात आले तर आम्हा सर्वांनाच आनंद होईल.
             कोहली - शास्त्री ही जोडी २०१६ च्या टी-२० वर्ल्डकप, २०१५ व २०१९ चा वनडे वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी ठरली असली तरी त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वलस्थान मिळविले. ऑस्ट्रेलियातही भारताने कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळविला. हे काही त्या दोघांच्या कतृत्वावर नाही. तर संघातील इतर खेळाडूंच्या नेत्रदिपक कामगिरीच्या बळावर. कोहली व शास्त्री या दोघांजवळ काही जादूची कांडी नाही की ऑस्ट्रेलियातील यशाचे शिल्पकार त्यांना ठरविले जात आहे. मग ते इतके मोठे जादूगार आहे तर त्यांनी इतर मोठया स्पर्धा का जिंकल्या नाहीत ?

               उलट या दोन नाठाळांमुळे संघात अतंर्गत बंडाळी वाढत चालली असून संघाची बसलेली घडी नुसती विस्कटलीच नाही तर भारतीय क्रिकेट कमीत कमी १० वर्ष मागे सरकले आहे. आता तर या दोघांनाच पदच्युत करण्याची वेळ आली आहे.

                 अतिशय मनमानी कारभार करून यांनी अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीवर पाणी फेरले आहे. अंबाती रायडू,    मोहम्मद शमी, यांना कुजविले तर शुभमन गिल सारख्या हरहुन्नरी खेळाडूस खिजविले. फाजील आत्मविश्वास बाळगून, समोरच्या संघांना कमी लेखत कमजोर चाली रचून स्वतःच्याच संघाच्या पायावर या महाभागांनी अनेकदा धोंडा पाडून घेऊन अनेक नामुष्कीजन्य पराभव संघाच्या माथी पाडले आहे. 

               वास्तविक शास्त्री व कोहलीची प्रशिक्षक व कर्णधार म्हणून मुदत विश्वचषकापर्यंतच होती. त्यांची कामगिरी कोणत्याही अँगल मधून लक्षवेधक नाही त्यामुळे त्यांना मुदत वाढ देणे कोणत्याही सुत्रात बसत नसून. जर बीसीसीआयने त्यांना मुदत वाढवून दिली तर भारतीय क्रिकेटमध्ये असंतोष पैदा होऊ शकतो.

              बीसीसीआयचे  प्रभारी अध्यक्ष विनोद राय यांनी स्पष्ट केले आहे की, कर्णधार कोहलीचा कोणताही सल्ला कोच निवड समितीला बंधनकारक नसेल. ते त्यांच्या सद्सद् विवेकबुद्धीने देशहिताचा निर्णय घेतील. 

            मागील वेळी अनिल कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर कोहलीने शास्त्रीबुवाच्या झोळीत गुरुदक्षिणा टाकली होती. परंतु यंदा मात्र कपिल व चमू कोणाच्या दबावाला बळी पडतील असे वाटत नाही.

            बीसीसीआयने  नियुक्त केलेली संघ निवड समितीही भोकम निर्णय घेत असून त्यात कोणताही सुसंगतपणा जाणवत नसून उज्वल भविष्याचा दृष्टीने चांगले असे काही दिसत नाही. खरे पहाल तर या निवड समितीलाच नारळ द्यायची वेळ आली आहे.

             भारतीय क्रिकेट, हे त्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या क्रिकेट चाहत्यांचे आहे, प्रामाणिक खेळाडूंचे आहे. संघनिष्ठा जपणाऱ्यांचे आहे. काही बोटावर मोजता येईल इतक्या लोकांनी भारतीय क्रिकेटला वेठीस धरले आहे. अशा मुजोर लोकांच्या पार्श्वभागावर लथ्था प्रहार करून हाकलून दयायची वेळ आली असून देशाची क्रिकेटमय प्रतिष्ठा जपण्यासाठी उचित पावले उचलण्याची वेळ आली आहे. नाहीतर भारतीय क्रिकेटची अवस्था झिंबाब्वे, विंडीज सारखी व्हायला वेळ लागणार नाही. भारतातले क्रिकेट कुणा एकाची जहागीरी नसून ती एक सार्वजनीक मालमत्ता आहे. याची जाण संबंधीतांनी ठेवणे गरजेचे आहे.

लेखक - क्रिकेट समिक्षक - दत्ता विघावे, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल.

प्रतिनिधी भारत. 

मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट.

मोबाईल - ९०९६३७२०८२.  

पाडळी येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघ, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक मार्गदर्शन सल्ला शिबिर संपन्न.-----------------------
      बदनापूर/ प्रतिनिधी
-----------------------
बदनापूर तालुक्यातील पाडळी गावात आज ता. ३० रोजी कायदा विषय सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी दीपप्रज्वलन / उद्घाटन दिवाणी न्यायालयाचे न्यायधीश बी. एस. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रस्ताविक व सूत्रसंचालन वकील बी. बी. वाघ यांनी केले. प्रमुख पाहुणे व कायदे विषय योग्य मार्गदर्शन म्हणून वकील संघाचे अध्यक्ष पी..के. आर्सुड , आर. के. जगताप यांनी केले होते. आभार प्रदर्शन अविनाश शेलके यांनी केले. -दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश बी. एस. गायकवाड मार्गदर्शन करताना म्हणाले की संविधान मध्ये जे कायदे बनवले विधी सेवा दिनाच्या औचित्य साधून प्राधिकरण मार्फत विविध माहिती नागरिकांना दिली


╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'अंकुश कदम' बदनापूर तालुका
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 839051      5197  ▌
                   ╰════════════╯

दाढ बु. येथे कृषिकन्यांकडून बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकसात्रळ /प्रतिनिधी 
बाबासाहेब वाघचौरे 
 राहाता तालुक्यातील दाढ येथे कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. कृषी संलग्नीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अतुल दरंदले,प्रा.माने यांच्या मार्गदर्शनाखाली खकाळे जयश्री, जाधव ऋतुजा,निकुंभ मृगया, राणे मानसी,तनेरू मोनिका या कृषीकन्यांनी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करण्यात आले.  पेरणी,बीज प्रक्रियांमुळे शेतीत होणारे फायदे,त्याचबरोबर त्यांच्यासाठी लागणारे साहित्य आणि प्रकिया याबाबतची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील कृषी महाविद्यालयातून कृषीकन्या आलेल्या आहेत. त्या चार महिन्यांच्या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीपूरक प्रात्यक्षिके करून दाखवणार आहेत अशी माहिती देण्यात आली. बिज प्रक्रिया केल्यामुळे त्याचे होणारे फायदे व तोटे शेतकरी बांधवांना यावेळी सांगण्यात आले. बीज प्रक्रियेतुन कमीतकमी खर्चात शेतीचे संरक्षण कसे होते त्याबद्दलही माहिती देण्यात आली.

भाजपा व्यापारी आघाडी हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष पदी रामगोपाल गट्टाणी यांची निवड


(विश्वनाथ देशमुख सेनगावकर)

सेनगाव:-येथील सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच तथा व्यापारी रामगोपाल गट्टाणी यांची भाजपा व्यापारी आघाडी हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे नियुक्त पत्र हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजीराव मुटकुळ यांनी नुकतेच दिले आहे.
सेनगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते,माजी उपसरपंच तथा व्यापारी रामगोपाल गट्टाणी यांनी भाजपा मध्ये आल्या नंतर पक्षाचे ध्येय धोरण व पक्षाने शेतकरी,व्यापारी यांच्या हिताचे केलेले कार्य सर्वसामान्यापर्यंत पोहचुन पक्ष बळकटीसाठी प्रयत्न केल्याने याची दखल घेत हिंगोली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी गट्टाणी यांची भाजपा व्यापारी आघाडी हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करुन तसे नियुक्ती पत्र नुकतेच दिले आहे.या निवडी बद्दल भा.ज.पा.किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिनकरराव देशमुख, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष गिरधारजी तोष्णीवाल,भाजपा किसान मोर्चा सेनगाव तालुकाध्य पंडीत तिडके,माजी सभापती शंकरराव बोरुडे,ओम कोटकर-पाटील,सेनगाव भाजपा शहराध्यक्ष कैलासराव खाडे,हिंगोली विधानसभा विस्तारक हिम्मतराव राठोड,श्रीरंग राठोड,नगरसेवक दिपक फटागंळे,बाळु उफाड,मनोज तिवारी,संतोष बिडकर आदीकडुन अभिनंदन होत आहे.

ना. पंकजाताई मुंडे यांनी मुंडे साहेबांच्या जुन्या मतदारसंघातील जनतेचीही घेतली काळजी


मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रेणापूर तालुक्याला ३४ कोटीचे रस्ते केले मंजूर

लातुर,(प्रतिनिधी) :-  दि. ३०....राज्याच्या ग्रामविकास, महिला बालविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जुन्या मतदारसंघातील जनतेचीही काळजी घेतली असुन त्यांनी मुंडे साहेबांचा पुर्वीचा मतदारसंघ असलेल्या रेणापूर तालुक्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३३ कोटी ९७ लाख रुपयाचे रस्ते मंजूर केले आहेत. या कामांच्या मंजूरीमुळे रेणापूर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचा प्रश्न सुटला आहे.

   रेणापूर हा मुंडे साहेबांचा जुना मतदारसंघ होता, याच मतदारसंघातून ते सलग पाच वेळा विधानसभेत निवडून गेले होते. हा मतदारसंघ आता लातुर ग्रामीणमध्ये समाविष्ट झाला आहे. या मतदारसंघातील जनता मुंडे साहेबांवर मनापासून प्रेम करत होती. ते प्रेम अद्यापही कायम आहे, या भागातील ग्रामीण रस्त्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने ना. पंकजाताई मुंडे यांनी या भागातील  रस्त्यांना प्राधान्य दिले.  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ४२.२१ किमीच्या सात रस्त्यांची कामे त्यांनी मंजूर केली आहेत, यासाठी ३३ कोटी ९७ लाख ६४ हजार रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेतून मंजूर झालेली  रस्त्यांची कामे पुढील प्रमाणे - (कंसातील आकडे कि.मी.चे आहेत),  रामा २३२ - पानगाव-सारोळा-माकेगाव रस्ता-१० कोटी ५४ लाख (१३ किमी), रामा २३३-पानगाव -मुसळेवाडी-फावडेवाडी रस्ता, ६ कोटी ३ लाख  ८७ हजार (८ किमी), ग्रामा १८ ते लहानेवाडी रस्ता १ कोटी ६४ लाख ५७ हजार (२.४५किमी), ग्रामा १८ ते दिवेगाव रस्ता- १ कोटी ७३ लाख ४८ हजार (१.८५ किमी), प्रजिमा ०३ ते चुकारवाडी रस्ता - ७२ लाख ५१ हजार (१.२६ किमी), रामा २४८ ते रामवाडी खु सुकनी कोष्टगाव जिल्हा सरहद रस्ता- ७ कोटी २० लाख २६ हजार (८.३५ किमी), रामा २४५ ते वसंतनगर हाकेतांडा रस्ता - ६ कोटी ८ लाख २१ हजार (७.९० किमी.)

सय्यद इसाक यांना पालम तालुक्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्याकडून निरोप समारंभपार पडलाअरुणा शर्मा


पालम : तालुक्यातील पेठपिंपळगाव पोस्टामध्ये सन 1981 ते 2019 असी तब्बल 38 वर्षे सेवा करणारे सय्यद ईसाख जैनोद्दीन  काल वयाच्या 65 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. त्या अनुषंगाने त्यांना पालम तालुक्यातील सर्वच बी. ओ. च्या वतिने सपत्नीक आहेर करून त्यांना सेवानिवृत्तिबाबतचा निरोप देण्यात आला. यावेळी पालम  पोस्टाचे    S P M श्री डी. एम. माने साहेब हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आर. एन. शिंदे. B O फरकंडा यानी प्रस्ताविक केले. शिवाजी कुलकर्णी. ई. डी. एम. सी. जाधव. खतीबसाब. संभाजी जाधव. यानी ही ईसाखभाईंच्या आजवरच्या कामाचे दाखले देवून त्यांचे कौतुक केले. व हा निरोप देतांना प्रत्येकांचेच मनं गंहिवरून आले होते. पेठपिंपळगाव बी. ओ. ची जागा रिक्त झाल्यामुळे त्याजागी कु. मीरा ढाळेवाड  यांच्याकडे पदभार देण्यात आला. व मिरा ढाळेवाड यांचा पण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना माने साहेबांनी सुद्धा ईसाखभाईंच्या कार्याचा आढावा घेतला  त्यांचे भरभरून कौतुक करतांना माने साहेबांचे ही ह्रदय भरून आले होते. बापूसाहेब पौळ यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास वाडेवाले.जूबेरभाई. शिंदे साहेब.आकबरभाई. आश्रफभाई. भाऊदिन. आदिनी परिश्रम घेतले. कु.मिरा ढाळेवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीच्या मागणीसाठी पेठशिवणी व परिसरातील ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत, आरोग्य विभागांच्या प्रधान सचिवा ना दिले --लेखी निवेदनअरुणा शर्मा


 पालम :- तालुक्यातील पेठशिवणी येथील प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर मंजुरीसाठी दाखल असून या प्रस्तावास तात्काळ मंजुरी द्यावी  अन्यथा पेठशिवणी व परिसरातील ग्रामस्थांच्यावतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.१२ आँगष्ट पासुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असे लेखी निवेदन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप कुमार व्यास यांच्या नावे लेखी निवेदन पाठवून एक प्रकारचा इशारा देण्यात आला. पालम तालुक्यातील पेठशिवनी व परिसरातील आजूबाजूच्या २२ ते २५ गावातील नागरिकांचे मागील अनेक वर्षापासून पेठशिवणी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून कार्यान्वित करावे. जेणेकरून पेठशिवणी व परिसरातील तील नागरिकांना शासनाच्या आरोग्यसेवेचा व योजनेचा वेळेत व नियमित लाभ होईल अशी मागणी अनेक वर्षापासूनची आहे. पेठशिवनी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होण्याच्या दृष्टिकोनातून पालम तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने शासन नियमाप्रमाणे विहित नमुन्यात प्रस्ताव जिल्हा आरोग्य आधिकारी, जिल्हा परिषद परभणी विभागाकडे दाखल केलेला आहे. जिल्हा आरोग्य आधिकारी, परभणी विभागाने शासन नियमाप्रमाणे बृहत् आराखड्यात पेठशिवनी चे नाव समाविष्ट करुन पुढे त्यांनी मा. उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ औरंगाबाद  कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. पेठशिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दाखल असलेल्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी देण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडवणीस, राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना.एकनाथ रावजी शिंदे यांच्या नावे शिफारस पत्र पाठविले आहेत. पेठशिवणी हे गाव लोकसंख्येने पालम तालुक्यात सर्वात मोठे गाव असुन परिसरातील गावाच्या मध्यभागी चे ठिकाण आहे. सदरील गाव पालम -लोहा राष्ट्रीय महामार्गावर आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीनंतर बांधकाम करण्यासाठी सरकारी गायरान जमिनीवर जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी सरकारी गायरान जमीन 55 एकर आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेची शाखा, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२, जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा, खाजगी संस्थेची ज्युनियर व सीनियर कॉलेज, शासकीय आय टी आय डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूत गिरणी, विजवितरण कंपनीचे ३३ के.व्हि. उपकेंद्र व पेठशिवनी गट -गण असल्यामुळे परिसरातील गावच्या नागरिकांची दैनंदिन व्यवहारासाठी पेठशिवनी गावाशी संबंध येतो. यामुळे पेठशिवनी येथे  दररोज परिसरातील गावच्या लोकांची ची कामानिमित्ते वर्दळ असते. दरम्यान सध्यास्थितीत पेठशिवणी परिसरातील गावे रावराजुर प्रार्थमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येतात रावराजुर एका टोकाला तर त्याचे कार्यक्षेत्र दुसऱ्या टोकाला आहे. तसेच यामुळे या परिसरातील गावातील नागरिकांना आरोग्यसेवेचा वेळेवर लाभ होत नाही. तसेच पालम तालुक्यात मागील दहा वर्षापासून सतत दुष्काळ पडत असल्यामुळे शेती उत्पादनात कमालीची घट आली आहे. शेतकरी शेतमजूर जगण्यासाठी धडपड करीत आहे पालम तालुक्यातील लोकांचे दरडोई उत्पन्न अतिशय कमी असून येथील मानवी निर्देशांक उंचावण्यासाठी शासन मानव विकास कार्यक्रमांतर्गत विविध योजना राबवित आहे. या परिसरातील आजारी पडलेल्या व्यक्तींना  उपचारासाठी  खाजगी दवाखान्यात  जावे लागते मात्र खाजगी दवाखान्याची असेल भरमसाठ  औषधी खर्च ते झेपत नसल्याने बरे शे आजारी व्यक्ती घरीच बसून  मृत्युमुखी पडलेले आहे .एकंदरीत शासनाने या सर्व परिस्थितीचा विचार करून प्रस्तावित पेठशिवनी प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ मंजूर करावेत हि ग्रामस्थाची मागणी आहे. राज्य सरकारला मागणी संदर्भात सकारात्मक विचार प्राप्त होण्यासाठी पेठ शिवनी व परिसरातील नागरिकांच्या वतीने गावातील ग्रामदैवत महादेवांचा दिनांक १२ ऑगस्ट रोज सोमवारी सामूहिक अभिषेक करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे दिनांक १३ ऑगस्ट मंगळवार रोजी परभणी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येणार आहे. आंदोलन काळात काही अनुचित घटना, प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील यांची नोंद ध्यावी, शासनाने त्वरित दखल न घेतल्यास दिनांक १५ ऑगस्ट रोजी पेठशिवणी बस स्थानक येथे पालम -लोहा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच शासनाने यापुढे दुर्लक्ष  केल्यास पेठशिवणी व परिसरातील ग्रामस्थांचे आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुका वर बहिष्कार घालण्याची चर्चा करण्यात आली आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचा असलेल्या प्रस्तावास तात्काळ मंजूरी द्यावी या मागणीचे लेखी निवेदन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मा.प्रदीप कुमार व्यास  यांना पाठविले आहे. या निवेदनाच्या प्रती मा .ना. देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री ,मा.ना एकनाथ रावजी शिंदे आरोग्यमंत्री, परभणीचे पालकमंत्री गुलाबराव जी  पाटील , संपर्कमंत्री मा.ना बबनराव जी लोणीकर, विभागीय आयुक्त औरंगाबाद, आरोग्य विभागाचे सहसंचालक डाँ.विजय पी. कंदेवाड, परभणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, परभणीचे पोलीस अधीक्षक, पालम तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदनात देण्यात आलेली आहे या निवेदनावर भगवान करंजे, रुपेश शिनगारे, दत्तराव  गौरकर, राजेश्वर करंजे, संदिप पांचाळ, बालाजी बर्डे, अमृत लांडगे, हनुमंत शेटे, शिवाजी  पालमकर, बाबुराव वाडेवाले, दत्तराव करंजे, सातेगाव बालासाहेब लोखंडे पिंपळगाव मुरुड देवचे केशवराव सोनटक्के, खरब धानोरा सरपंच भंगे, शेखराजुर चे सेलु येथील मारोतराव शिंदे, शेखराजुर आनंत लोखंडे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. पेठशिवणी  प्रार्थमिक आरोग्य केंद्र झाल्यास पेठशिवनी, शेलु सातेगाव, अंजनवाडी, सर्फराजपुर, पारवा, खरब धानोरा, पिंपळगाव मुरुड देव राहाटी, मटका, भोगाव, गुंज, सावंगी, पेंडू बु, पेंडु खु, मांगीर वाडी, सादलापुर, कोळवाडी, ऐनवाडी, मारवाडी , पेठ पिंपळगाव आदीसह परिसरातील २२ ते२५ गावाच्या नागरिकांना आरोग्य सेवेचा वेळेवर व नियमित लाभ होणार आहे.

मंगरुलपीर पोलिस ने तीन बाइक चोर को किया गिरफ्तार, चोरी की चार मोटरसाइकिल भी हुई बरामद


 मंगरुलपीर पुलिस निरीक्षक विनोद दिघोरे  ने दी जानकारी

मंगरुलपीर: दि.30जुलाई
पोलिस अधीक्षक वाशिम,अपर पोलिस अधीक्षक ,पोलिस उपविभागीय अधिकारी मंगरुलपीरके मार्गदर्शन में पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे एवं उनके पोलिस  पथक द्वारा बाइक चोरो को पकड़ा गया है जानकारी के अनुसार ग्राम मेडशी  निवासी सचिन अशोक बारड़ ने 11 जुलाई को थाना में रिपोर्ट दर्ज कराई थी कि किसी व्यक्ति ने भूषण बादल शेलके शेलु बाज़ार के घर से दिनांक 8जुलाई रत 10 बजे बाइक चोरी कर ली है पुलिस ने मामला दर्ज कर जांच में लिया है इस मामले में मंगरुलपीर थाना पोलिस उपनिरीक्षक अनिरुध्द भगत और दो पोलिस  कांस्टेबल के द्वारा पोलिस अधीक्षक वसंत परदेसी,अपर पोलिस अधीक्षक विजय चव्हाण ,उपविभागीय पोलिस अधिकारी नंदा परांजय के सहयोग से चोर को पकड़ने में सफलता हासिल की है थाना निरीक्षक विनोद दिघोरे ने बताया कि आरोपी विक्की दिपक खाडे वय 22 वर्ष रा. बार्शिटाकळी जि.अकोला  व सुमेध राजु खाडे वय 26 वर्ष रा खोपडी ता.बार्शिटाकळी जि.अकोला, महादेव उर्फ़ गोलू  शिवाजी गोरे बार्शी टाकली निवासी, को गिरफ्तार किया गया है जिसके पास से 4 बाइक भी जब्त की गई है आरोपी को न्यायालय पेश किया गया उन्होंने बताया कि आरोपी से पूछताछ में अन्य चोरियों में भी लिप्त होना पाया है, जिसमें वाशिम जिले के मंगरुलपीर,शेलु बाज़ार,और बार्शी टाकली में चोरी करने की पुलिस को जानकारी दी गई है आरोपी को न्यायालय में पेश करने के बाद वाशिम जेल भेज दिया गया है
इसकार्य से मंगरुलपीर पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे को पोलिस अधीक्षक वाशिम,अपर पोलिस  अधीक्षक एवं पोलिस उपविभागीय अधिकारी ने अभिनंदन किया
इस कार्रवाई में थाना निरीक्षक दिघोरे के साथ ,पोलिस उपनिरीक्षक सोनोने , सहायक उपनिरीक्षक भगत, पोलिस कांस्टेबल विनोद चित्तकवार , रवि वानखड़े , गोपाल कव्हर , संदीप  खडसे, अनंता,सुनील ,पोलिस कांस्टेबल गाड़े ,पोलिस कांस्टेबलउमेश ठाकरे का सहयोग रहा
समाचार के साथ फोटो
फोटोकैप्शन:मंगरुलपीर पुलिस गिरफ्त में आरोपी


फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

सनफ्लेम सेलिब्रिटी हेल्दी कुकिंग वेब सीरिज ‘हेल्दी बाइट्स’ फिटझप स्टुडिओ ने लॉन्च केली


मुंबई  (प्रतिनिधी) ः-  
 ‘सनफ्लेम हेल्दी बाइट्स’ नावाची नवीन सेलिब्रिटी पाककला वेब सीरिज या ऑगस्टमध्ये तुमचा आवडता टेलिव्हिजन दिवा दर्शित करणारी असून ती ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभास कांचीसिंग, सारा खान, बरखा सेनगुप्ता, तेजस्वी प्रकाश, रोहन मेहरा, इंद्रनील सेनगुप्ता आणि बरेच लोक उपस्थित होते. जुहूच्या सन-एन-सँड येथे अतिवृष्टीच्या दिवशी हा कार्यक्रम झाला!
आपण या टेलिव्हिजन दिव्हसवर अभिनय, भूमिकेचा त्रास, आरोग्य राखणे आणि तंदुरुस्त असलेले पाहिले असेल! दिवा नक्कीच फसवणूक जेवण आहे आणि निरोगी चाव्याव्दारे ते आरोग्यासाठी देखील फसवणूक करतात! चार मालिका मालिका पुण्याजवळील मुळशीच्या मूळ जागेवर असलेल्या आत्मंत वेलनेस सेंटरमधील शेफ इशिका कोनार, कार्यकारी शेफ यांना आव्हान देणारी बर्खा सेनगुप्ता, सारा खान, कांचीसिंग आणि हेली शाह यांच्यासह स्वयंपाकाचा चेहरा बनवेल.
                संपूर्ण मालिका ज्याचा हेतू भारतीय समाजातील घरांपर्यंत पोहचविणे आहे आणि चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्याची आणि व्हिडिओचा एक भाग बनविण्याची संधी निर्माण करते, ही स्पर्धा 26 जुलै, 2019 रोजी सुरू होण्यास सज्ज आहे.सनफ्लेम, ग्राहक अनुकूल ब्रँड भारतीय हजारो वर्षापर्यंत पोहोचण्याचा विचार करीत आहे आणि फिट इंडिया मोहिमेस पाठिंबा देत आहे, के.एल. सनफ्लेमचे व्यवस्थापकीय संचालक वर्मा म्हणाले, ‘सनफ्लॅमने तीन दशकांपेक्षा जास्त काळ भारतीय स्वयंपाकघरात उपस्थिती लावून होममेकरांना तंत्रज्ञानात अत्याधुनिक आणि स्वयंपाकासाठी एक विलासी, आनंददायक आणि निरोगी अनुभव बनविण्याचा सतत प्रयत्न केला आहे. आरोग्य सेवांच्या गरजा आणि आवश्यक गोष्टींबद्दल खरी समजून घेण्यासाठी आमचा सतत प्रयत्न केल्याने आम्हाला सतत नाविन्य प्राप्त झाले आहे. हेल्दी बाइट्ससाठी फिटझपचे सहकार्य करण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे कारण यामुळे आपला निरोगी भारत आणि सहस्राब्दी प्रेक्षकांशीही परिचय होईल.
आत्मान वेलनेस सेंटरच्या कार्यकारी शेफ शेफ इशिका कोनार यांनी नमूद केले की,
                “या कलाकारांच्या जीवनशैलीत बदल घडवून आणण्यास आम्ही खरोखरच उत्सुक आहोत कारण आत्मज्ञान वेलनेस सेंटर कल्याणकारीतेच्या दृष्टीकोनातून अत्यंत निकाल देणारे आहे… वैज्ञानिकांसह संशोधित पद्धती आणि तंत्रे डॉक्टरांसमवेत राबविली जातात. टेलर-मेक आहारांसाठी निर्धारित साहित्य. आत्माननचे पाककृती तत्वशास्त्र, सेंद्रीय सोर्सिंग, मध्यम सर्व्हिंग, सरलीकृत स्वयंपाक, आपल्या स्वत: च्या शेतातून नैसर्गिक घटकांचा आणि औषधी वनस्पतींचा वापर यावर विश्वास ठेवते ... या दृष्टिकोनातून अतंतन स्पा पाककृती, डेटॉक्स मेनू आणि आयुर्वेद दोष-विशिष्ट मेनूमध्ये सेवा देतात… हे एकात्मिक कल्याण आत्मानं येथील अनुभवही हेल्दी बाइट्सच्या विचारसरणीने अनुभवायला मिळतो, आम्ही या संघटनेची वाट पाहत आहोत! ”
फिटझपचे संस्थापक आणि फिटनेस उत्साही संस्थापक सनी अरोरा म्हणतात, “तुमचे आवडते जेवण एकाच वेळी आरोग्यदायी आणि स्वादिष्ट कसे होईल याविषयी फिट इंडियाशी संवाद साधण्यासाठी हेल्दी बाइट्सचा विचार आहे! २० वर्ष फिटनेसमध्ये राहिल्यामुळे आता मीदेखील तशाच सराव करतो आणि सनफ्लेम आणि अ‍ॅटमॅनन वेलनेस सेंटरसारख्या समविचारी ब्रँडकडूनही मला मदत केल्याचा मला आनंद झाला आहे, जे त्याच विचारांवर विश्वास ठेवतात आणि फिटझपला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत! ही सामग्री निरोगी अन्न जागेत क्रांतिकारक ठरेल ”“ सनफ्लेम हेल्दी बाइट्स ’फिटअप स्टुडिओने ऑगस्टच्या अखेरीस एटमॅनॅन वेलनेस सेंटरमध्ये शूटिंग सुरू करण्यासाठी तयार केलेले! ..... छायाकार : रमाकांत मुंडे मुंबई

परळीचे भूमिपुत्र सुरेश एकनाथराव वानखेडे यांची पोलिस उपाधीक्षक पदी पदोन्नती


परळीकरांकडुन अभिनंदनाचा वर्षाव
परळी वैजनाथ ( प्रतिनिधी ) :- 
परळी तालुक्यातील बोरखेडचे भूमिपुत्र सुरेश एकनाथराव वानखेडे यांची  पोलिस उपाधीक्षक पदी नुकतीच नांदेड परिक्षेत्रात नियुक्ती झाली असुन  त्यांच्यावर परळीकरांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
सुरेश वानखेडे मराठवाडा कृषी विद्यापीठातून कृषीपदवी घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिलेल्या परीक्षेतून  1989 साली पोलिस सेवेत दाखल झाले, वानखेड़े यांनी औरंगाबाद व परभणी येथे  सन 2000 पर्यंत उत्कृष्ट कार्य केल्यानंतर सन 2000 साली पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती त्यांनी याच वेळी पदावर असतांना कर्तव्य तत्पर अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. त्यांच्या कर्तव्य तत्परतेची दखल घेत सन 2000 ला सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती तर सन 2008 ला पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती घेत वानखेडे यांनी गौरवास्पद कामगिरी केली आहे.2008  ते  2016 या कालावधीत 5 वर्ष -लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम पाहिले. 2016 ते जुलै 2019 या कालावधीत राष्ट्रीय महामार्गावर पोलीस निरीक्षक पदी काम केले. कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून 2008 साली महाराष्ट्र राज्य शासनाने पोलीस महासचालकांच्या वतीने विशेष पुरष्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच 2011ला राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. नुकतीच  त्यांची पोलीसउपअधिक्षकपदी नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस महासंचालक कार्यालयात  पोलीस उपअधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. एक कर्तव्यदर्शक पोलीस अधिकारी, चांगला मित्र अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. त्यांचे मित्र परिवार व मराठवाडा साथी परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

परळीत विहीरीत पाय घसरुन विवाहीतेचा मृत्यू


परळी वैजनाथ   (प्रतिनिधी) :-
        तालुक्यातील हेळंब शिवारातील विहीरीमध्ये २१ वर्षीय विवाहीता पाणी भरण्यासाठी गेली असता पाय घसरुन तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दि.२९ जुलै रोजी घडली. 
        पिण्याचे पाणी आणण्यासाठी विहिरी वर गेलेल्या महिलेचा पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. उषा शिवरामु गुट्टे (वय २१, रा. दैठणा घाट) असे या मृत महिलेचे नाव आहे.  तालुक्यातील हेळंब शिवारात सोमवारी दि.२९ रोजी ही घटना घडली. संपूर्ण पावसाळा संपत आलेला असतानाही समाधानकारक पाऊस न झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्यासाठी हाल सोसणा-या नागरिकांना जीव सुद्धा गमवावा लागत आहे.
  याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उषा गुट्टे ह्या पिण्याचे पाणी भरण्यासाठी हेळंब शिवारातील माणिक जगन्नाथ पाळवदे यांच्या  विहिरीवर गेल्या होत्या. विहिरीमध्ये उतरून घागर भरून वर येत असताना पायरीवरून त्यांचा पाय घसरला. यावेळी त्या विहिरीत पडल्याने बुडाल्या. आजूबाजूला कोणी नसल्याने ही बाब कोणाच्या लक्षात आली नाही. ही बाब उशिराने नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परळी ग्रामीण पोलिसांना याची खबर दिली. याबाबत मयत उषा गुट्टे यांचे वडील कोंडीबा मुंडे यांच्या फिर्यादीवरुन परळी ग्रामीण पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वारे हे करीत आहेत.

दरम्यान पावसाळा संपून जात असतानाही परळी व परिसरात पाऊस झालेला नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसातही पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. घागरभर पाण्यासाठी या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. पाण्याची भटकंती कधी संपणार ? समाधानकारक पाऊस कधी पडेल? याची चिंता नागरीकांना सतावत आहे.

शांतिदूत बुद्ध विहारात पंचशील ध्वजारोहण


औरंगाबाद (प्रतिनिधी) :- हर्सुल येथिल चेतनानगर परिसरात असलेल्या शांतीदूत बुद्ध विहारात धम्म उपासकांनी मुलगंध धम्मकुटी येथे पंचशील ध्वजारोहन करण्यात आले .
बौध्द धम्माचे प्रतिक असलेले पंचशील ध्वज अनेक दिवसांपासून दुरवस्थेत पडलेला होता , मुलगंध धम्मकुटी , शांतीदूत बुद्ध विहार चेतनानगर येथील नागरिकांनी दुरावस्थ पडलेला पंचशील धम्मध्वज फडकविण्यासाठी शांतीदूत बुद्ध विहार परिसरातील नागरिकांनी पंचशील धम्मध्वज रोहनाकरिता सक्रिय सहभाग घेऊन मदत केली .
या प्रसंगी भदन्त नंदबोधी,मुकुंद जंजाळे,अमरदिप हिवराळे, अजय अभंगे,वेणुबाई दांडगे,रोहिणी साळवे,अनुसया सुरडकार,सुमित जाधव,राहुल शेजुळ,आकाश गायकवाड, मंगेश जंजाळे व दिपक पाईकराव यांनी मेहनत घेत प्रयत्न केले व सहकार्य करण्यात मोलाची भूमिका बजावली .

सौ.राजश्री धनंजय मुंडेंनी घेतल्या प्रभाग क्र.6 मधील महिलांच्या भेटी


भिषण दुष्काळातही पाणी मुबलक मिळत असल्याच्या प्रतिक्रीया
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः- विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांच्या सुविद्य पत्नी सौ.राजश्री धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील प्रभाग क्र.6 पद्मावती गल्ली भागातील महिला व नागरीकांच्या भेटी घेवुन नागरी समस्यांविषयी विचारपुस केली. यावेळी नगर पालिकेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करुन सध्याच्या भिषण दुष्काळातही पाणी मुबलक मिळत असल्याच्या प्रतिक्रीया माहिलांनी व्यक्त केल्या.
सौ.राजश्रीताई मुंडे यांनी आज मंगळवार दि.30 जुलै रोजी प्रभाग क्र.6 मधील पद्मावती गल्ली भागातील महिलांच्या भेटी घेवुन नागरी समस्यांविषयी विचारपुस करुन प्रभागातील विविध भागांची पाहणी केली. यावेळी महिला व नागरीकांनी परळी नगर पालिकेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करुन गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली या भागाचे नगरसेवक विजय भोयटे व सौ.आडेपवार हे स्वतः जातीने लक्ष देवुन नाल्या साफसफाईसह टँकरद्वारे प्रत्येक घराला समान पाणी पुरवठा कसा होईल याची काळजी रात्रंदिवस घेत असल्याचे सांगितले. नागापुरच्या वाण प्रकल्पातील पाणी साठा पुर्णपणे संपला असला तरी याची म्हणावी अशी जाणीव या भागातील नागरीकांना कर्तव्यदक्ष नगरसेवक विजय भोयटे व सौ.आडेपवार यांनी होवु दिली नसल्याचे यावेळी नागरीकांनी सांगुण विजय भोयटे व सौ.आडेपवार यांच्या कार्याचे तोंडभरुन  कौतुक केले.
तसेच अर्धा पावसाळा संपला तरी अद्याप परळी शहरावर पाऊस नाही परंतु आपण आलात व आपल्या सोबत पाऊसही आलाय. आपले पाऊत आमच्यासाठी अत्यंत शुभ असल्याच्या प्रतिक्रीयाही कांही महिलांनी सौ.राजश्रीताई मुंडे यांच्याकडे व्यक्त केल्या. या प्रसंगी प्रभागातील महिलांनी सौ.राजश्रीताई मुंडे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार केला. यावेळी नगरसेवक विजय भोयटे यांच्यासह नगरसेविका सौ.आडेपवार यांच्यासह प्रभागातील महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परळीत 'ताई महोत्सव" व्याख्यानमालेचे दिमाखात उद्घाटन


माणसाने भौतिक सुखाच्या मागे न लागता आहे त्या परिस्थितीत समाधानी जीवन जगावे - डॉ संजय कळमकर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि  ३० ----- प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात भौतिक सुखाच्या मागे न लागता आहे त्या परिस्थितीत समाधानी जीवन जगावे, तरच निराशा न येता आयुष्य सार्थकी लागेल  असे मत जेष्ठ साहित्यिक तथा सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ संजय कळमकर यांनी येथे व्यक्त केले.

  राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी भाजपाच्या वतीने नटराज रंगमदिरात 'ताई' महोत्सवातंर्गत आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत "जगणे सुंदर व्हावे" या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. डॉ संजय कळमकर यांनी यावेळी  आपल्या व्यापक अशा भाषणात जीवनातील चढ उतार व प्रसंगावर आपल्या खास विनोदी शैलीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

  डॉ कळमकर पुढे बोलतांना म्हणाले की, मानवी जीवनात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात प्रत्येकाचे वर्तन हे ज्याच्या-त्याच्या स्वभावानुसार असते मात्र वर्तनातले बारकावे शोधून जीवनाचा आनंद कोठे शोधता येईल याचा प्रत्येक व्यक्तीने विचार करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर पुर्वी च्या जुन्या काळापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत मानवी जीवनात किती स्थित्यंतरे आली व किती बदल झाले, मोबाइल व टीव्ही सारख्या भौतिक सोयी सुविधा पुरवणाऱ्या वस्तुंचे मानवी जीवनातील फायदे व तोटे त्यांनी आपल्या खास विनोदी शैलीतून सांगितले.या प्रसंगी आपल्या "लग्न सोहळा " या कथेतून लग्नातील वधू-वरांकडील मंडळी व पाहुणे यांच्या वर्तन व  संवादातील विनोदी गोष्टी सांगून प्रेक्षकांची मने तर जिंकलीच पण शेवटी प्रत्येक  वधुचा पिता जो असतो त्याची जीवाची घालमेल व  अवस्था कशी असते हे सांगून लोकांच्या डोळ्यात अश्रूही आणले व मनातील भावनिक ओलावाही जागा केला. शेवटी आपल्या कडे जे आहे त्यात समाधान मानून जीवनाचा आनंद घ्या असे विचार मांडून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

  प्रारंभी व्याख्यानमालेचे  उदघाटन वैद्यनाथ बँकेचे संचालक तथा भाजपा जेष्ठ नेते विकासराव डुबे यांनी केले, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे शहाराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले यावेळी व्यासपीठावर वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोकसेठ जैन, राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्या डॉ शालिनी कराड, वैद्यनाथ बँकेचे संचालक दासू वाघमारे, प्रकाश जोशी,अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय नेते शेख अब्दुल करीम, वहाज मुल्ला, नगरसेवक प्रा पवन मुंडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन शेखर फुटके यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रशांत कराड यांनी करून दिला तर अश्विन मोगरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला शहरातील अनेक साहित्य रसिक लोकांनी हजेरी लावली, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी द टर्निंग पॉईंट व भाजपा युवा मोर्चा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.

प्रकल्पगस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीचे कालपासून वीज निर्मिती केंद्रासमोर उपोषण सुरू


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
विविध मागण्यांसाठी वीज निर्मिती केंद्रातील प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कृती समितीच्या वतिने मंगळवार दि.30 पासून परळी येथील वीज निर्मिती केंद्राच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. 
सकाळी 10 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब अंाबेडकर यांच्या प्रतिमेला ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे व शोभाताई घाडगे यंाच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरूवात करण्यात आली. प्रशिक्षण कालावधीत किती दिवसाचा असतो हे स्पष्ट करावे . सर्व प्रकल्पग्रस्तांना सरळ नियुक्तने तंत्रज्ञ 3 या पदावर सामावून घ्यावे व कोणतीही परिक्षा न घेता सरळ सेवेत सामावून घ्यावे ज्या प्रकल्पग्रस्तांचे वय 45 वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे या मागण्यांसाठी परळी येथील वीज निर्मिती केंद्राच्या कार्यालयासमोर 36 जण प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत किंवा लेखी स्वरूपात आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष शशिकांत केंद्रे यांनी दिला आहे. उपोषणात अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, शोभाताई घाडगे यांच्यासह प्रशिक्षणार्थी बसले आहेत.

वडीलांचा हात जोपर्यंन्त खांद्यावर आहे तो पर्यंन्त जगात आपण मोठे आहोत-ह.भ.प.बडोपंत महाराज ढाकणेवै.प्रा.हरिश्‍चंद्र गित्ते यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त 
अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत कथेस भाविकांची गर्दी  

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- 
आई-वडीलांची सेवा ही सर्व श्रेष्ठ भक्ती असुन जोपर्यंन्त मुलांच्या खांद्यावर वडीलांचा हात आहे. तो पर्यंन्त जगात सर्वात मोठे आहोत. स्व.एच.पी.गित्ते यांचे चार मुले हे आपल्या पित्याची सेवा त्यांच्या पश्‍चातही सामाजिक कार्यातुन करत आहेत हीच पुण्याई गित्ते परिवाराच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे प्रतिपादन प्रबोधरत्न ह.भ.प.बडोपंत महाराज ढाकणे यांनी केले. 
वै.प्रा.हरिश्‍चंद्र पंडितराव गित्ते (सर) यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त गित्ते परिवाराच्या वतीने बेलंबा सारख्या ग्रामिण भागात सामाजिक उपक्रमांसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहात ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या वाणीतुन शिवलीलामृत कथा भाविकांना ऐकावयास मिळत आहे. या अखंड हरिनाम सप्ताहातील किर्तनामध्ये  ह.भ.प.बंडोपंत महाराज ढाकणे हे किर्तन सेवा देतांना संत तुकाराम महाराजांच्या भावे गावे गीत शुध्द करोनिया चित्त । या अभंगावर चिंतन केले. यावेळी त्यांनी माता-पित्याची सेवा ही सर्व श्रेष्ठ भक्तीअसुन गणेश व कार्तीकेय यांची कथा सर्वांनाच माहित आहे. आधुनिक काळात अनेक जण माता-पित्यांना जिवंतपणी यातना देतात अशा मुलांना कसलेही पुण्य लाभत नसुन माजी प्राचार्य एच.पी.गित्ते सर यांचा परिवार या बाबत पुण्यवान आहे. राजा हरिश्‍चंद्रांनी व रघुकुलांनी धर्मासाठी व सत्यासाठी  प्राण पणाला लावले. तेच कार्य वै.हरिश्‍चंद्र गित्ते (सर) यांचे कुटुंब करत आहे. हा समाज समोर फार मोठा आदर्श आहे. त्यांच्या पाश्‍चातही धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करुन मोठे पुण्य कमावत आहेत. अशा या गित्ते परिवाराची भक्ती त्यांच्या सुखामध्ये निश्‍चितच कामी येईल. असेही ह.भ.प.ढाकणे महाराज यांनी सांगितले. ढकाणे महाराजांच्या किर्तनात उपस्थितीत भावुक व मंत्रमुग्ध झाले. भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या किर्तनाने समाजात नक्कीच परिवर्तन होईल. आजचे आरतीचे मानकरी व्यापारी महासंघाचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. या अखंड हरिनाम सप्ताहास बेलंबा व परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थितीत होती. आज रात्रौ 9 ते 11 ह.भ.प.विजयानंद महाराज सुपेकर यांचे किर्तन सेवा होणार आहे. किर्तनाच्या प्रारंभी ह.भ.प.ढाकणे महाराजांचा सत्कार तुळशीवृंदावन व स्मृती देऊन धनंजय गित्ते यांच्या हस्ते संतपुजा करण्यात आली. किर्तनाची साथ संगत महाराष्ट्रातील गायनसम्राट कैलास महाराज मुरकुटे, रोहिदास महाराज, आप्पा महाराज इंजेगावकर, मृदंगाचार्य अनांद महाराज लोहिया व सोमेश्‍वर महाराज साबळे, महारुद्र महाराज मुंडे यांनी दिली. मांडवा,  इंजेगाव, नंदनज, बेलंबा व परिसरातील भजनी मंडळी उपस्थिती.    या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक तथा हरिसुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश गित्ते, धनंजय गित्ते, अजय गित्ते, बलभीम गित्ते व गित्ते परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

मंगरूळपीर येथे मोटारसायकल चोरांना अटक


वाशिम-पो.स्टे.  मंगरूळपीर येथे अप.न 261/19 कलम 379 भादवि मधील मोटर सायकल चोरीतील आरोपी विक्की दिपक खाडे वय 22 वर्ष रा. बार्शिटाकळी जि.अकोला  व सुमेध राजु खाडे वय 26 वर्ष रा खोपडी ता.बार्शिटाकळी जि.अकोला,महादेव ऊर्फ गोलु शिवाजी गोरे,बार्शिटाकळी यांचे   कडुन 4 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यानी वाशिम, मंगरूळपीर, बार्शिटाकळी येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे.

प्रतिनिधी-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

मंगरूळपीर येथे मोटारसायकल चोरांना अटक


वाशिम-पो.स्टे.  मंगरूळपीर येथे अप.न 261/19 कलम 379 भादवि मधील मोटर सायकल चोरीतील आरोपी विक्की दिपक खाडे वय 22 वर्ष रा. बार्शिटाकळी जि.अकोला  व सुमेध राजु खाडे वय 26 वर्ष रा खोपडी ता.बार्शिटाकळी जि.अकोला यांचे   कडुन 4 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यानी वाशिम, मंगरूळपीर, बार्शिटाकळी येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे.

प्रतिनिधी-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

गेवराई - ताकडगाव रस्त्याची वाताहात शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्राससुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ३० _ शहरातून ताकडगावला जाणाऱ्या रस्त्यावर अर्थातच महामार्गाखाली उतरले कि, खड्डेच खड्डे पडले आहेत. खड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक मोठ्या प्रमाणावर ये जा करत आहेत, त्यांना अशा खड्डामय रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय गणवेश सुध्दा खराब होत आहेत.
        गेवराई शहरासह ग्रामीण भागात काही प्रमाणात विकास कामे झालेली आहेत. त्यापैकी काही कामे दर्जेदार पण आहेत तर काही कामांची वाट लागलेली आहे. सत्ताधारी यांनी सत्तेत आल्यापासुन चांगल्या प्रकारे अल्प प्रमाणात विकास केला परंतु विकास कामात काही त्रुटी झाल्याचे निदर्शनास आले. विकासाच्या पोकळ गप्पा मारणाऱ्यांंनी, सत्तेच्या काळात झालेले अनेक रस्ते आज खराब झालेली आहेत. या चार वर्षात चांगला पाऊस झाला असता तर त्यांचा विकास पण जनतेसमोर आला असता. पाऊस नसल्याने त्यांच्या विकासावर पांघरुन घातले असले तरी जनते समोर त्यांची कामे करण्याची पध्दत उद्या उघड झाल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधारी विकासाच्या गप्पा मारतात मग त्यांना ताकडगावला जाणारा रस्ता दिसतो का ? महामार्गावरुन खाली उतरताच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हा रस्ता शहरातील एक प्रमुख रस्ता मानला जातो. यावरुन मोठ्या प्रमाणावर विद्यार्थीही ये जा करतात. थोडासाही पाऊस पडला कि, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे भरतात त्यामुळे वाहन धारकांचा अंदाज चुकतो व खड्डयात गाडी जावून पादचारी यांच्या अंगावर पाणी उडते. परिणामी नागरिकांसह विद्यार्थीना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ताच्या दुर्दशा बाबत नागरिकांत नाराजी दिसुन येते. हाच का तो त्यांचा विकास..? असे म्हणून ताकडगाव रस्त्यावर अनेक शाळा व क्लासेस असुन विद्यार्थीसह नागरिक मोठ्या प्रमाणावर रहदारी असल्याने हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
--------
पाऊस गायब झाल्यामुळे
खराब रस्त्यावर पांघरुन
--------
सत्ताधारी यांचे नशीबच चांगले आहे, ते जेव्हा पासुन सत्तेत आले.. तेव्हापासुन पाऊस गायब झाला आहे. हा योगायोग जरी असला तरी यामुळे त्यांचा मोठा फायदा देखील झाला आहे. आजवर त्यांनी तालुक्यात ज्या ठिकाणी डांबरी रस्ते बनवले आहेत, त्यापैकी अनेक रस्ते आज खराब झाले आहेत. त्यावर खड्डे देखील पडले आहेत. तर काहींना भेगा पडल्या आहेत. चार वर्षे चांगला पाऊस झाला असता तर आणखी रस्ते खराब झाले असते आणि सत्ताधारी यांचा विकास जनते समोर आला असता. एका प्रकारे यांनी केलेल्या कामावर मोठा पाऊस न पडल्याने पांघरुन घातल्याची प्रतिक्रिया जनतेतुन येत आहेत.
╭════════════╮
   ▌  ▌गेवराई ते ताकडगाव हा रस्ता ग्रामीण मार्ग क्र. ५० असुन तो पुढे किनगाव , माऊली सुतगिरणी, लुखामसला, दैठण, कटचिंचोली इ.जि.मा १७३ असा असुन देखील लोकप्रतिनिधींनी या रस्तयाकडे कायम दुर्लक्ष केले. हा
रस्ता लवकर पूर्ण करावा या मागणीसाठी शिवसंग्रामच्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा कैलास माने यांनी दिला आहे.  ▌  ▌
                   ╰════════════╯

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

मंगरूळपीर येथे मोटारसायकल चोरांना अटक


वाशिम-पो.स्टे.  मंगरूळपीर येथे अप.न 261/19 कलम 379 भादवि मधील मोटर सायकल चोरीतील आरोपी विक्की दिपक खाडे वय 22 वर्ष रा. बार्शिटाकळी जि.अकोला  व सुमेध राजु खाडे वय 26 वर्ष रा खोपडी ता.बार्शिटाकळी जि.अकोला यांचे   कडुन 4 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यानी वाशिम, मंगरूळपीर, बार्शिटाकळी येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे.

प्रतिनिधी-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविणार शासकीय योजना-आ.प्रा.सौ.संगिताताई ठोंबरे


 ‘आमदार जनकल्याण अभियानाचा' अंबाजोगाईत शुभारंभ

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 
विविध शासकीय योजनांचा लाभ हा ग्रामीण भागातील शेवटच्या घटकास,
समाजातील निराश्रीत व्यक्तींना मिळाला पाहिजे यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे ‘आमदार जनकल्याण अभियान' हे केज मतदारसंघातील 208 गावात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे ‘अंत्योदयचा उदय' करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सदर योजना या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवाव्यात असे आवाहन आ.प्रा.सौ. संगीताताई ठोंबरे यांनी अंबाजोगाईत ‘आमदार जनकल्याण अभियाना' च्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे व आ.प्रा.संगिताताई ठोंबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 26 जुलै ते 15 ऑगस्ट 2019 या कालावधीत  हे अभियान राबविले जात आहे.या अभियानाद्वारे शासनाच्या विविध आकरा योजनांचा लाभ शेवटच्या घटकांना आता गावातच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या योजनांचा लाभ मिळवून देणे व अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचारी 
तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.                                      या अभियानात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतुन नविन गॅस कनेक्शन,आयुष्यमान योजना,स्मार्ट कार्ड, संजय गांधी निराधार योजना आदींसह अन्य योजनेचा लाभ आता लाभार्थ्यांना मिळणार आहे.केज मतदार संघातील 208 गावातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ तातडीने देण्यासाठी अंबाजोगाई तालुक्यात आमदार जनकल्याण अभियानाचा शुभारंभ सोमवार,दि.29 जुलै रोजी येथील तहसिल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.प्रारंभी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दिपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.या कार्यक्रमाला  
उदघाटक म्हणून आ.प्रा. सौ.संगिताताई विजयप्रकाश ठोंबरे या होत्या.यावेळी तहसिलदार संतोष रूईकर, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी,बीड जिल्हा बँकेचे संचालक हिंदुलाल काकडे, वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रवीण देशपांडे, अंबाजोगाईचे उपनगराध्यक्ष अनंतराव लोमटे,नगरसेवक कमलाकर कोपले, गटनेते दिलीपराव काळे,नगरसेवक संजय गंभीरे,नगरसेवक सुरेशराव कराड,डॉ. अतुलराव देशपांडे, नगरसेवक हनुमंतराव तौर,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप,डॉ.सुधीर धर्मपाञे,अनिलसिंह बायस,मदनलाल परदेशी,बालासाहेब पाटलोबा शेप,सचिन वाघमारे,उज्जैन बनसोडे,अहेमद पप्पुवाले,महेश शेप
आदींची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसिलदार गणेश सरोदे यांनी केले. तर सुत्रसंचालन अशोक मिरगे यांनी करून उपस्थितांचे आभार तलाठी नाना लाड यांनी मानले.या कार्यक्रमास अंबाजोगाई तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा,वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, परीवहन महामंडळाचे अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक व सर्व शासकीय कार्यालयाचे प्रमुख,कर्मचारी व अंबाजोगाई तालुक्यातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
होती.


केज मतदारसंघाच्या 208 गावातील जनतेला फायदा..!

यावेळी बोलताना आ. प्रा.सौ.संगिताताई ठोंबरे यांनी म्हटले की, राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने केज मतदारसंघातील 208 गावातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचवण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानात शासनाच्या आकरा योजनांचा लाभ लाभार्थ्यांना गावातच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून घेण्यासाठी जे नागरीक तालुका कार्यालयात येऊ शकत नसल्याने आजपर्यंत शासकीय योजनांपासुन वंचित राहिले तसेच निराश्रीत व्यक्तींसह वयोवृद्ध, परित्यक्त्या महिलांना गावोगावी जाऊन शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.याद्वारे केज मतदारसंघातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवायचे काम होणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील कोणीही व्यक्ती यापुढे शासकीय योजनेच्या लाभांपासुन वंचित राहणार नाही.26 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत दररोज वीस गावातील नागरिकांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.या अभियानाच्या माध्यमातून ‘अंत्योदयचा उदय' करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे आ.प्रा.सौ. संगिताताई ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.

पहिल्याच दिवशी 1100 लोकांना लाभ

आमदार जनकल्याण अभियान शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 1100 नागरिकांना सौभाग्य ऊर्जा योजना अंतर्गत प्राथमिक स्वरुपात विद्युत मिटरचे वितरण करुन विद्युत जोडणी देण्यात आली. तसेच रेशनकार्ड, प्रधानमंञी उज्ज्वला योजने अंतर्गत गॅस कनेक्शन,आयुष्यमान योजने अंतर्गत गोल्डन कार्ड,ज्येष्ठ नागरीकांची स्मार्ट कार्ड नोंदणी, प्रधानमंञी सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात आला.त्यामुळे लोक कल्याणकारी कार्य करीत असल्याने सर्वञ आमदारांचे कौतुक होत आहे.

कु हर्मिका जगतकर फॅशनशो प्रथम पारितोषिक (किड्स)

  
बीड (प्रतिनिधि) :-  दि. 28 रोजी झुंजार नारी मंच बीड आणि अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा बीड  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किड्स, मिस, मिसेस फॅशनशोचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमास बीड शहरातील शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. काल सायंकाळी हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्य सभागृह मध्ये आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या प्रमुख अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या डॉ.सौ दीपाताई क्षीरसागर व झुंजार नारी च्या सौ. आशा वर्पे सचिव झुंजार नारी मंच व फॅशन जगतातील सुप्रसिद्ध दोन मॉडेल्स पूजा वाघ  व  गीतांजली ठोमके मिसेस इंडिया ज्यांच्या परीक्षणातून विजेते ठरवण्यात आलं ही स्पर्धा छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत होती यामध्ये बीडकरांनी भरभरून असा प्रतिसाद दिला, चार तास हा कार्यक्रम चालला. कु. हर्मिका जगतकर यांच्या तुलसी इंग्लिश स्कूल बीड येथील  शिक्षक सिद्धार्थ अग्रवाल व खान सर तसेच ड्रेस डिझायनर रंजना जोगदंड तसेच मेकअप स्वप्नाली सुतार मॅडम यांनी मेहनत घेतली. कु. हर्मिका जगतकर ही सा. बीड अक्षरधाम चे संपादक बालाजी जगतकर प्राचार्य उमा जगतकर तुलसी स्कूल बीड यांची कन्या आहे.आज विजेती हार्मीका हिचा शाळेतही सत्कार करण्यात आला व तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Monday, 29 July 2019

एस.पी.साहेब परळीतील वाहतुक कोढींकडे जरा बघा हो!


परळी वैजनाथ(प्रतिनिधी) :-  परळी शहरात सर्वच मुख्य रस्त्यावर वाहने कशीही लावली जात असल्यामुळे दररोज वाहतुकीची कोढीं होत असुन याचा मोठा त्रास पायी ये,जा करणारांना होत असुन
हि वाहतुक कोढीं सोडविण्यासाठी  वाहतुक पोलीस असर्मथ ठरत असुन एस.पी.साहेब परळीच्या वाहतुक कोढींकडे जरा बघा हो!  अशी मागणी परळीकरातुन केली जात आहे.
परळी शहरात वाहतुकीचे तिनतेरा वाजले
असुन राणी लक्ष्मीबाई टाँवर ते मोंढा मार्गे एकमिनार चौक,स्टेट बँक ते उड्डाणपुल, धरणीकर रोड ते बसस्थानक रोड तसेच उड्डाणपुल ते आझाद चौक या मुख्य रस्त्यावर वाहने कोठे लावावी याची सिस्तच वाहनधारक विसरले असुन आझाद चौक ते एकमिनार चौक परिसर व ईटके कार्नर चौक तसेच थर्मलच्या
 विश्राम ग्रहा पर्यंतच्या रोडच्या दोन्ही बाजुला जडवाहतुक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात  मनाला येईल तेथे उभी केली जात असल्याने या मुख्य राँष्ट्रीय व राज्य रस्त्यावर वाहतुक कोढीं होत आहे तसेच शहरातील रस्त्यावर सुद्या दोन चाकी व चार चाकी वाहने वाहनचालक मनाप्रमाणे लावीत असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोढीं दररोज होत आहे.या रस्त्यावर व बाजुला छोटे,छोटे हातावर पोट असणारे विविध माल विकणारे व्यापारी हातगाडे लावीत होते त्यामुळे वाहतुक कोढीं होत होती त्यांना नगरपरिषदेने तेथुन मागेच हटविले
असुन आता तरी रस्त्यावरील वाहतुक कोढीं कमी होणार असे परळीकरांना वाटले होते मात्र स्वताला बाहुबली व सिंघम समजणारे आपली दादा,अन्ना,भाई अशी नांवे असणारी व फँन्सी नंबर प्लेट
असणारी दोनचाकी व चारचाकी वाहने कशीही वेडीवाकडी लावीत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोढीं होत 
असुन या कोढींतुन विद्यार्थी.महिला व आबाल, वृद्धांना जिव मुठीत घेवुन ये,जा करावी लागत आहे तर कधी,कधी छोटे,छोटे अपघात सुध्दा घडत असुन   वादविवाद तर दर रोज होत आहे.परळी शहरात दररोज शेजारच्या जिल्ह्यातुन , परराज्यातुन तथा देशातुन शिवभक्त मोठ्या संख्येने विविध वाहनातुन येत असतात तसेच येथे असणारे औष्णिक विद्युत केंद्र व  सिमेंट कंपनीचे अधिकारी तसेत  खरेदी विक्रीचा व्यापार करणारे परजिल्ह्यातील व्यापारी शहरात हर रोज येत असतात त्यांना सुद्या या वाहतुक केढींला सामोरे जावे लागत असुन परळीशहराचे नांव या वाहतुक कोढींमुळे बदनाम होत आहे.शहरात दोन पोलीस स्टेशन असुन तेथे असणारे वाहतुक पोलीस शहरातील वाहतुक कोढीं सोडवण्या ऐवजी चौका,चौकात थाबुंन आपली ड्युटी निभावत आहे.मागे वाहतुकीची कोढीं सोडविण्यासाठी
बदलुन गेलेले पो.नी.निघोट यांनी चांगली शिस्त लावली होती व त्यावर स्वता नजर ठेवत होते मात्र त्यांची बदली झाल्यावर हि शिस्त राखण्यास आज पर्यंत येथील दोन्ही पोलीस स्टेशनच्या कारभाऱ्यांना यश आले नसुन परळी शहरातील होणारी वाहतुकीची कोढीं पोलीस अधिक्षकांनीच जातीने लक्ष देवुन सोडवावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.

माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- 
माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला असुन जनतेची कामे होत नसल्याने आपले मानसिक संतुलन बिघडल्याने राजीनाम देत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या राजीनामा पत्रात नमुद केले आहे. तर नगरसेवक पदा बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेली आपले सर्व संबध तोड असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 
परळी नगर पालिकेच्या मागील पंचवार्षीक निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणुन निवडुन आलेले दिपक देशमुख यांना धनंजय मुंडे यांनी भाजपमधील नगरसेवकांचा मोठा गट फोडुन  नगराध्यक्ष केले. सन 2011 ते 2014 या कार्यकाळात नगराध्यक्ष पद भुषविल्यानंतर  दिपक देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला होता. चालु पंचवार्षीक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या टिकीटावर नगरसेवक म्हणुन निवडुन आले होते. या 3 वर्षाच्या कार्यकाळात परळीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दुफळी होऊन 2 गट  पडले. एक महिन्यापुर्वी परळी न.प.च्या टँकर वाटपात घोटाळा होत असल्याच्या कारणावरुन त्यांनी न.प.कार्यालयात गोंधळ घालत मुख्याधिकार्‍यांना धारेवर धरले होते. परळी शहराला खडका बंधार्‍यातुन पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी त्यांनी दि.27 जुलै रोजी तहसिल कार्यालयापुढे आमरण उपोषण केले होते. परंतु ठोस आश्‍वासनाशिवाय त्यांनी उपोषण मागे घेतले. यातच आज दि.29 जुलै रोजी देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे आपल्या नगरसेवक पदाचा राजीनाम सुपुर्द केला आहे. मी जबाबदार नगरसेवक असुन जनतेची कुठलीच कामे होत नसल्याने माझे मानसिक संतुलन बिघडत चालले असुन सतत आजारी पडत असल्याने स्वच्छेने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. तर नगरसेवक पदाच्या राजीनाम्या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेले आपले संबंध तोडत राष्ट्रवादीशी कुठलाही संबध नसल्याने देशमुख यांनी सांगितले. परळी नगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या राजीनाम्याचे सत्र सुरुच असुन दोन महिन्यापुर्वी बांधकाम सभापती शेख रियानबी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर नगरसेवक गोपाळ आंधळे यांनीही आपल्या पदाचा राजीनाम दिला होता. हे राजीनामे मंजुर झालेले नसुन दिपक देशमुख यांनी थेट जिल्हाधिकार्‍यांकडे स्वतः उपस्थितीत राहत राजीनाम दिला आहे.

मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी पुन्हा सुविधा; उद्या परळी येथुन बसेसची व्यवस्था - महादेव शिंदे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-  ज्या रुग्णांना मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्याची नितांत गरज आहे, तपासणी नंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले आहे. अशा रुग्णांनसाठी  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या वतीने दि.31 जुलै रोजी परळी येथुन उदगीरला जाण्यासाठी मोफत बसची व्यवस्था करण्यात आली असुन या रुग्णांवर उदगीर लॉयन्स क्लबच्या वतीने उदगीर येथील दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यासाठी रुग्णांनी नाव नोंदवून या सुविधाचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते महादेव शिंदे यांनी केले आहे. 
राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि.14 जुलै रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले होते.  या  शिबिरात 
मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिय शिबीरात 1170 रुग्णांची तपासणी तर 200 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. या शिबिरा नंतर अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे ओळखुन डॉ.संतोष मुंडे यांनी  या उपक्रमांतर्गत नविन उपक्रम हाती घेतला असुन ज्या रुग्णांना मोतिबिंदु शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. अशा रुग्णांनासाठी दि.31 जुलै रोजी उदगीर येथे जाण्यासाठी बसेसचली व्यवस्था करण्यात आली असुन यासाठी गरजु रुग्णांनी 9822280568 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते महादेव शिंदे यांनी केले आहे.

श्रीसंत नागेबाबा-सावता महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

सात्रळ /प्रतिनिधी

भेंडा गावातील जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबा,संत शिरोमणी सावता महाराज व श्रीसंत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त नागेबाबा पतसंस्था परिवार व नागेबाबा देवस्थानचे वतीने आज दि. 30 जुलै ते 01 ऑगस्ट  दरम्यान तीन दिवसांचा भव्य पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष चेअरमन मा. कडुभाऊ काळे यांनी दिली.

    यानिमित्त मंगळवार दि.30 रोजी सायंकाळी 7 वाजता डॉ.दत्ता महाराज कोहिनकर यांचे प्रवचन,तर
बुधवार दि.31 रोजी सकाळी 9 वाजता महंत भास्करगिरी महाराज,सांयकाळी 7 वाजता समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन तर गुरुवार दि.1 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता बद्रीनाथ महाराज तनपुरे यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
     श्रीसंत नागेबाबा मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नागेबाबा परिवार व भेंडा ग्रामस्थानी केले आहे.

झोपेचे सोंग घेतलेल्या भाजपा सरकारला जागे करण्यासाठीच आंदोलन ―प्रा. टी. पी. मुंडे

सुमारे तीन तास वाहतूक ठप्प


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

केंद्र व राज्यातील झोपेचे सोंग घेतलेल्या भाजपा सरकारला जागे करण्यासाठीच शेतकरी व सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांनी केले


     आज सोमवार दि 29 जुलै रोजी परळीतील इटके कॉर्नर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे तीन तास भव्य रस्ता रोको आंदोलन शेतकरी व सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा विविध मागण्यांसाठी करण्यात आले होते


    दिलेल्या निवेदनात प्रमुख विविध मागण्यांचा समावेश आहे त्यामध्ये सन  2018 -19 चा खरीप पिक विमा तात्काळ वाटप करावा ,वैद्यनाथ कारखान्याने एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार रुपये प्रति टन भाव द्यावा ,खडक डॅमचे पाणी परळी करांना पिण्यासाठी तात्काळ उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत बँकेने पीक कर्ज वाटप केले नाही ते बँकेस आदेशित करावे ,दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी ,सरसगट शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी तात्काळ देण्यात यावी, अल्पसंख्यांक दलित आदिवासी कुटुंबावर व समाजावर होत असलेले हल्ले त्वरित थांबवावेत, परळी अंबाजोगाई रस्त्याच्या कामाला गती द्यावी ,वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाचा 70― 30 चाकोटा रद्द करावा इत्यादी सह विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते


    परळी तहसील कार्यालयाच्या वतीने नायब तहसीलदार  श्री बरदाळे  यांनी निवेदन स्वीकारले दरम्यान या आंदोलनास एकता वादी रिपाई पक्षाने पाठिंबा जाहीर केला येत्या पंधरा दिवसाच्या आत वरील मागण्या मान्य न केल्यास अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष मा नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली तीव्र शेतकरी आंदोलन संबंध महाराष्ट्रभर उभे करणार असल्याचेही प्रा टी पी मुंडे यांनी जाहीर केले.


      गेल्या दोन-तीन वर्षापासून भाजपच्या सरकारने शेतकरी, शेतमजूर ,अल्पसंख्यांक ,दलित-बहुजन आदिवासी या समाजावर सतत अन्याय केला आहे हे सरकार सूडबुद्धीने या समाजावर अन्याय करीत आहे देशातील सीबीआय ,रिझर्व बँक ऑफ इंडिया ,न्याय संस्था, निवडणूक आयोग हे भाजप सरकारच्या हातातले बाहुले बनले आहेत असा आरोपही त्यांनी केला इ. डी. चा वापर फक्त राजकीय नेत्यांना धमकावण्यासाठी केला जात असल्याचेही ते म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा झाल्यामुळे देशांमध्ये भाजपाचे सरकार सत्तेवर आले आहे त्यामुळे एक प्रकारे मतदारांचा विश्वास घात केल्याचेही ते म्हणाले आगामी विधानसभा निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली.


    शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा 2018-19 चा पिक विमा मिळत नाही सोयाबीन हे पीक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भरले होते मात्र कंपनीने सोयाबीन चा पिक विमा मंजूर केला नाही कंपनीही शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे याचे सरकारला काही देणे घेणे नाही मात्र सत्तेत सहभागी असलेली शिवसेना आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे नाटक करीत आहे विमा कंपन्या वर मोर्चा काढण्याऐवजी आपल्यात हिंमत असेल तर सरकारला शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास भाग पाडावे असे आवाहन त्यांनी केले. भाजपा सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेली लोकशाही मान्य नाही म्हणून ते घटना बदलण्याचे षड्यंत्र करत आहेत त्यांना मनुवाद्यांचे राज्य आणायचे आहे परंतु ही जनताच त्यांना धडा शिकवेल असा निर्वाणीचा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान परळी- बीड ,परळी- परभणी ,परळी -गंगाखेड या मार्गावरील वाहतूक अक्षरशः तीन तास ठप्प झाली होती वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची मात्र दमछाक झाली.


     यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत मुंडे, शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रा विजय मुंडे, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय ढवळे, माजी नगरसेवक ओम प्रकाश, सारडा इसाक भाई कटाळु, पंडित झिंजुर्डे, सलाउद्दीन मामू ,नितीन शिंदे ,डॉ माणिक कांबळे ,मनोहर मुंडे , इंद्रोबा दहिफळे , अनिल मस्के ,जि प सदस्य प्रदीप भैया मुंडे ,ऍड संजय जगतकर ,सुरेश ताटे, रावसाहेब देशमुख ,यशवंत सोनवणे , विश्वनाथ देवकर, नवनाथ क्षीरसागर ,जम्मू भाई, शेख इलियास ,ऍड मनोज संकाये ,राहुल कांदे किशोर जाधव ,दत्तात्रय मस्के ,नरहरी आघाव ,मुरलीधर महाराज ,बाळू काका शिंदे ,अंगद काकडे, प्राचार्य बी.डी मुंडे ,छत्रपती कावळे, बाळू कुलकर्णी ,हनुमंत गुट्टे , बाळासाहेब पाथरकर, श्रीमंत राख ,रामकिशन घाडगे, माणिक बनसोडे, नूरबानू खाला विजयमाला, घाडगे ,मनियार खाला ,भागवत सलगर , अच्युत उबाळे ,गोविंद पोटभरे , विश्वनाथ इंगळे, धनंजय देशमुख, अशोक साळवे ,अनंत सलगर, सुग्रीव गडदे मोहन कदम ,प्रशांत तोतला, मुक्तार भाई मधुकर मुंडे प्रभाकर गवळी रघुनाथ डोळस  अशोक कांबळे कारभारी मोटे ज्ञानोबा फड दलपत राठोड मारुती मुंडे कल्याण आचारे नितीन हारे रणजीत हारे व्‍यंकटी गीते योगेश देशमुख शिवा बडे शिवा चिखले  राम आघाव आदीसह हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.