तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 26 July 2019

मानवत -पाथरी महामार्गावर मोटारसायकल ट्रकची समोरा समोर धडक अपघातात पोहेटाकळी येथील पती-पत्नी ठारप्रतिनिधी
मानवत:- राष्ट्रीय महामार्ग ६१ मानवत ते पाथरी दरम्यान रत्नापुर येथे ट्रक व दुचाकीची धडक होवुन पती-पत्नी ठार झाले. हा अपघात आज दुपारी २ वाजेच्या सुमरास घडला.
भागवत बापुराव गोंगे (२४) व आरती भागवत गोंगे (२१, रा. पोहेटाकळी) हे दोघे पाथरी येथून मानवतला दुचाकी (श्प्२२-भ्-७४०१) या दुचाकीवर येत असताना रत्नापूर येथे एका खाजगी वाहनाला ओव्हर टेक करताना समोरुन येणा-या ट्रकला  समोरा समोर धडक झाली. या भीषण अपघातात आरती भागवत गोंगे ही जागीच ठार झाले,आज तर तिचा पती भागवत गोंगे हा गंभीर जखमी झाला. पती भागवत गोंगे यांना परभणी येथे उपचारा साठी घेऊन जात असताना त्याचा मृत्यु झाला. मयत भागवत व आरती यांचा ४ महिन्यापूर्वी विवाह झाला होता. भागवत हे पत्नीला मानवत येथे सोनोग्राफी काढण्यासाठी पोहेटाकळीवरुन येत होते. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या प्रश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

No comments:

Post a comment