तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 23 July 2019

सातबारातून नाव गायब असल्याचा धक्का बसल्याने पाथरीत शेतक-याचा मृत्यू;संबंधिताला निलंबित करण्याची जमावाची मागणी


प्रतिनिधी
पाथरी:-तालुक्यातील तुरा येथील शेतकरी विमा भरण्या साठी गेला असता त्याचे सातबारावर नावच नसल्याचे आढळून आल्याने मागील पाच दिवसा पासून संबंधित शेतकरी गावच्या तलाठ्या कडे चकरा मारत होता मात्र त्याला उडवा उडवीची उत्तरे मिळाल्याने याचा धक्का बसून मंगळवारी दुपारच्या सुमारास या शेतक-याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या विषयी संतप्त जमावाने ग्रामिण रुग्णालयात एकत्र येत या शेतक-याला न्याय देण्या साठी तलाठी,मंडळ अधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करून संबंधितांना तात्काळ निलंबित करा आणि महसुल विभागाने दहालक्ष रुपये देऊन या शेतक-याच्या कुटूंबाचे पुन:र्वसन करावे अशी मागणी लाऊन धरली आहे. 
या विषयी मिळालेल्या माहिती नुसार खरीप पिकविमा भरण्याची अंतिम तारीख २४ जुलै असून तुरा येथील मुंजाभाऊ दादाराव चाळक वय ५० हे मागील चार पाच दिवसा पासून पिकविमा भरण्या साठी ऑनलाईन केंद्रावर गेले असता तेथे सातबारा मध्ये त्यांचे नाव नसल्याचे स्पष्ट झाले. ऑनलाईन सातबारातून नाव गायब झाल्याने या शेतक-याने गावच्या तलाठ्या कडे चकरा मारल्या मंडळअधिकारी यांना ही या विषयी माहिती दिली असल्याचे या शेतक-याचे नातेवाईक सांगत आहेत मात्र या वर कार्यवाही झाली नाही.आता एकच दिवस विमा भरण्या साठी बाकी आहे आणि सातबारावर नाव नाही याचा धक्का बसल्याने मुंजाभाऊ चाळक यांचा मंगळवारी दुपारच्या सुमारास -हदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून. या विषयी ग्रामस्थांनी शवविच्छेदन गृहातून मयत मुंजाभाऊ चाळक यांचे शव ताब्यात घेत खाजगी जिप मधून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी तो प्रयत्न हानुन पाडत यात जशी तक्रार द्याल तशी नोंद करू अशी भूमीका घेतली मात्र जमाव शव तहसिलच्या प्रांगणात शव नेणार यावर ठाम होते. संबंधीताला तात्काळ निलंबीत करा आणि मयत शेतक-याला दहा लक्ष रुपये देऊन त्याच्या कुटूंबाचे पुनर्वसन करा अशी मागणी लाऊन धरली असून घटना स्थळी आ बाबाजानी दुर्रानी, राजन क्षिरसागर, उपविभागीय अधिकारी व्हि एल कोळी,तहसिलदार भाग्यश्री देशमुख,उपविभागिय पोलीस अधिकारी,पोलिस निरीक्षक डि डि शिंदे जमावाची समजूत काढत या विषयी चर्चा करत आहेत. बातमी लिही पर्यंत कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.

1 comment: