तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

परळी तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळणार 10 रूपयात जेवण
स्व.पंडीतअण्णा मुंडे शेतकरी भोजन गृहाचा धनंजय मुंडेंच्या हस्ते शुभारंभ

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.15........... परळी शहरात कामानिमित्त येणार्‍या तालुक्यातील शेतकर्‍यांना आता केवळ 10 रूपयात जेवण मिळणार असून, नाथ प्रतिष्ठानच्या वतीने चालवल्या जाणार्‍या स्व.पंडीतअण्णा मुंडे शेतकरी भोजन गृहाचा शुभारंभ आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. 

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मोकळ्या जागेत हे भोजन गृह सुरू करण्यात आले असून, परळीत धान्य खरेदी, विक्री, शेतीविषयक व जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी येणार्‍या शेतकर्‍यांना या भोजन गृहात 10 रूपयांमध्ये जेवणाचा लाभ घेता येणार आहे. दुष्काळ परिस्थितीत आर्थिक द़ृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना परळीत आल्यानंतर अल्प दरात जेवण मिळवुन त्यांना आधार देण्याच्या उद्देशाने धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात जेवणासाठी येणार्‍या खर्चापैकी शेतकर्‍यांकडून फक्त 10 रूपये तर उर्वरित खर्च नाथ प्रतिष्ठान करणार आहे. 

आयुष्यभर शेतकर्‍यांसाठी झीजणार्‍या स्व.पंडीतअण्णा मुंडेंच्या स्मृती या योजनेच्या माध्यमातून कायम ठेवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली असून, ती कायमस्वरूपी चालवली जाईल अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी देवुन योजनेसाठी पुढाकार घेणार्‍या अ‍ॅड.मनजीत सुगरे व रंगनाथ सावजी यांचे अभिनंदन केले.

        या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, गटनेते वाल्मिकअण्णा कराड, सुरेश टाक, कृ.उ.बा.समितीचे सचिव रामदासी साहेेेब, संचालक राजेभाऊ पौळ, संजय जाधव, राधाकिसन साबळे, बाळु लड्डा, रामकृष्ण साबणे, रामअण्णा व्हावळे, दिलीपदादा कराड, अनिल अष्टेकर, सुरेश नानवटे, रवि मुळे, संपत बळवंत आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड.मनजीत सुगरे यांनी तर आभार गजाजन पारेकर यांनी मानले.

No comments:

Post a comment