तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 August 2019

परळीत दि.20 व 21 ऑगस्ट रोजी शालेय कुस्पर्धेचे आयोजन बाल मल्लांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा-मुरलीधर मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी तालुका शालेय कुस्पर्धेचे दि.20 व 21 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असुन या स्पर्धा विविध वयोगटातील मुला-मुलींनसाठी आयोजित केल्या आहेत. या कुस्ती स्पर्धेत बाल मल्लांनी मोठ्या सहभाग नोंदवा असे आवाहन कुस्तीगिर परिषदेचे तालुकाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांनी केले आहे.
          आर्य समाज मंदिर, व्यायाम शाळेत होत असलेल्या या कुस्ती स्पर्धेत दि.20 ऑगस्ट रोजी 14, 17 व 19 वयोगटातील मुली, 14 वर्ष वयोगटातील मुले तर दि.21 रोजी 17, 19 वयोगटातील मुलांची कुस्ती स्पर्धा होणार आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी क्रिडा शिक्षक सुभाष नानेकर, आनकाडे, जगदीश कावरे, अजय जोशी, केशव गित्ते, प्रा.अतुल दुबे, धनंजय देशमुख, गडदे, विजय मुंडे, मदन कराड,संजय शेप, गुट्टे हे पंच म्हणुन काम पाहणार असुन या कुस्ती स्पर्धेत परळी शहर व तालुक्यातील बाल मल्लांनी सहभाग नोंेदवावा असे आवाहन कुस्तीगिर परिषदेचे तालुकाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a comment