तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 8 August 2019

भटवाडीच्या राजाचे 21 यजमानांच्या हस्ते पाद्यपूजन भटवाडी मध्ये आनंद झाला , नवसाचा माझा गणराज आला" गाणे प्रकाशित


बाळू राऊत प्रतिनिधी
घाटकोपर :  श्री गणेशाच्या आगमनाची सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे . अनेक मोठं मोठ्या नामांकित मंडळांनी गणेशाच्या आगमनाची पूर्वतयारी म्हणून पाद्यपूजनाचे सोहळे आखले आहेत . नुकत्याच घाटकोपर भटवाडीतील अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीचे पाद्यपूजन ( दि 7 ) रोजी सांयकाळी 7 वाजता विभागातील 21 यजमानांच्या हस्ते करण्यात आले . यंदा मंडळाचे 51 वे वर्ष असून यावेळी मंडळाचे ओंकार महाडिक आणि दिलीप महामुनी यांनी भटवाडी मध्ये आनंद झाला , नवसाचा माझा गणराज आला हे गाणे प्रकाशित केले आहे . यावेळी मंडळाचे अध्यक्ष मंगेश परब , सरचिटणीस रवींद्र घाग , खजिनदार सचिन सरमळकर , विश्वस्त दशरथ शिर्के , आप्पा चव्हाण , मधुसूदन साळुंखे , चंद्रकांत पवार , श्यामकांत महामुनी , अतुल खुळे , शिवाजी राणे , महेश पोळ आदी उपस्थित होते .

No comments:

Post a comment