तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 August 2019

मालेवाडी येथे सरपंच वैशाली बदने यांच्या हस्ते 3200 वृक्षांची लागवड व गणवेश वाटप
झाडे लावा झाडे जगवा मालेवाडीत येथे केले बत्तीशे हजार रोपांचे वृक्षारोपण

वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संगोपन आणि संवर्धन महत्वाचे - सरपंच सौ.वैशाली बदने


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील मौजे मालेवाडी येथे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 3,200 रोपांची वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे सरपंच  वैशाली  भुराज बदने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. वृक्ष तोडीमुळे झालेले दुष्परिणाम पाहावयास मिळत आहेत. अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संगोपन आणि संवर्धन महत्वाचे असून ती प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन सरपंच सौ.वैशाली बदने यांनी केले.

     तालुक्यातील मौजे मालेवाडी येथे मालेवाडीचे सरपंच वैशाली  भुराज बदने यांच्या हस्ते शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत 3200 रोपाची वृक्ष लागवड करण्यात आली. अंगणवाडीच्या चे 120 विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींना गणवेश वाटप करण्यात आले.  जिल्हा परिषदेचे शाळा व अंगणवाडीला गैस वाटप करण्यात आले. दरम्यान सरपंच सौ. बदने म्हणाले की, झाडे लावल्याने भविष्यात पाऊस पडेल असा संदेश पावसा ये घरोघरी, झाडे लावा घरोघरी यातून देण्यात आला. तसेच वृक्ष आपले सखेसोबती आहेत. आज मोठया प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने जमिनीची धूप होत आहे. अवेळी पावसाचे आगमन वातावरणातील प्राणवायू संपुष्टात येत आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून रोपाची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.  यावेळी मालेवाडीचे जेष्ठ नेते भुराज बदने, उपसरपंच आदीनाथ बदने ग्रामसेवक कालिदास होळंबे, महादेव बदने, बूथ प्रमुख पाटील बदने समभाजी आघाव, लक्ष्मण बदने, सुभाष कसबे सोमनाथ पोटभरे, धोंडीबा घुले अंगणवाडी सेविका तसेच इतर मान्यवर आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a comment