तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 7 August 2019

अपघाती मृत्यू प्रकरणी व्याजासह 54 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे अंबाजोगाई जिल्हा न्यायालयाचे आदेश


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
मौजे टोकवाडी येथील रहिवाशी असलेले सोमनाथ महादेव आघाव यांचे अपघाती मृत्यू बाबत वारसांनी केलेल्या नुकसान भरपाई दाव्याच्या सुनावणी अंती अंबाजोगाई येथील जिल्हा न्यायालय तथा अपघात नुकसान भरपाई न्यायाधिकरण न्यायालयाच्या न्याय. एस एस सापटणेकर यांनी मयताच्या वारसांना 39 लाख रुपये नुकसान भरपाई व त्यावरील दाव्याच्या तारखेपासून व्याज असे 54 लाख रुपये मालक व रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने वारसांना देण्याचा आदेश केला आहे

प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की मौजे टोकवाडी तालुका परळी येथील रहिवाशी मयत सोमनाथ महादेव आघाव हे टोकवाडी येथून त्यांचे t.p.s. कॉलनी येथे असलेल्या घराकडे मोटार सायकल वर जात असताना दिनांक 17/ 10/ 2014 रोजी संध्याकाळी  आठ ते साडे आठ वाजताच्या दरम्यान पाठीमागून येणाऱ्या ट्रक चालकाने त्याची ट्रक क्रमांक एम एच 20 ए टी 46 63 निष्काळजीपणाने व हायगईने  भरधाव वेगात चालवून मयत सोमनाथ आघाव चालवत असलेल्या मोटारसायकलला पाठीमागून  जोराची धडक दिली त्यामुळे सोमनाथ आघाव हे जागीच मरण पावले
    शिवाजी मुंडे यांचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन परळी शहर येथे अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध विरुद्ध सोमनाथ आघाव यांचे मृत्यूस कारणीभूत झाल्याचे कारणाने गुन्हा 148/ 2014 कलम 304अ, 279 भारतीय दंडविधान प्रमाणे नोंद करण्यात आला तपासा अंती प्रत्यक्षदर्शी साक्षीदार धनसिंग याचे जबाबावरून ट्रक चालक तरलोचन सिंग राहणार मुंबई याचे  विरुद्ध आरोप पत्र दाखल करण्यात आले
मयताचे वारस पत्नी महानंदा मुली सोनम व पुनम मुलगा शुभम आई सुजानबाई यांनी अंबाजोगाई जिल्हा न्यायालयातील ॲड दत्तकुमार लांब यांचे मार्फत नुकसान भरपाई दावा दाखल केला
सुनावणीमध्ये वारस पत्नी महानंदा यांचेसह प्रत्यक्षदर्शी साक्षीदार धनसिंग कोटीये राहणार आळंद तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद व मयत सोमनाथ आघाव कार्यरत असलेल्या थर्मल पावर स्टेशन चे कर्मचारी बाबासाहेब गायकवाड आणि तपास अधिकारी चंद्रकांत घोळवे यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या
रिलायन्स इन्शुरन्स विमा कंपनीने कंपनीचे कायदेविषयक मॅनेजर मुंबई यांची साक्ष नोंदवून विमा दिलेला चेक वटलेला नसलेने विमा कंपनीची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी नसल्याचा बचाव घेतला तसेच अज्ञात वाहन विरुद्ध गुन्हा नोंद असलेने अपघातात पोलिसांनी दाखवलेली ट्रक ही जाणून-बुजून नुकसान भरपाई मिळणे करिता दाखवली असल्याचा बचाव घेतला
प्रकरणाची सुनावणी अंबाजोगाई येथील जिल्हा न्यायालय तथा अपघात नुकसान भरपाई न्यायाधिकरणाच्या न्याय. एस. एस. सापटणेकर मॅडम यांचे समोर झाली, सुनावणी अंती न्यायालयाने वारसांना एकूण 39 लाख रुपये नुकसान भरपाई व त्यावरील व्याज असे एकूण 54 लाख रुपये वारसांना देण्याचे आदेश मालक व विमा कंपनी विरुद्ध दिले
प्रकरणांमध्ये वारसांच्या वतीनेॲड दत्तकुमार लांब यांनी बाजू मांडली व त्यांनाॲड सचिन शेप,ॲड चंद्रकांत चौरे,ॲड सुनील हरणावळ,ॲड प्रवीण फड यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment