तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

साखरा येथे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत भारतचा 73 वा ध्वजारोहन संपन्न
साखरा प्रतीनीधी शिवशंकर निरगुडे 

आज दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा साखरा येथे 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला सकाळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली सकाळी सात वाजून 40 मिनिटांनी श्री होडगर सरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले, यावेळी गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती, यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून एक उपक्रम करण्याचे ठरवले, दिनांक 19 ऑगस्ट 2019, रोजी विद्यार्थ्याच्या मार्फत पूर्ण गावात फिरून प्रत्येक घरापर्यंत जाऊन सांगली,को ला पूर ,सातारा या भागात पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीमुळे साखरा गावात निधी जमा करून जिल्हा परिषद शाळेच्या मार्फत पूरग्रस्त भागात मदत देण्याचे ठरवले, तर श्री होडगर सर प्रभारी मुख्याध्यापक यांनी सांगितले की, गावकऱ्यांच्या मदतीने आणि सर्व पालक वर्गाच्या मदतीने ग्रामपंचायतीच्या मदतीने वर्गणी जमा करून प्रत्येक वर्गात टीव्ही बसवण्यात येणार आहे आणि डिजिटल शाळेचे स्वरूप देण्यात येणार आहे तरी सर्व गावकऱ्यांनी आणि पालक वर्ग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मदत करून सहकार्य करावे, अशाप्रकारे आनंददायी वातावरणात देशभक्त गीताच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.


तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment