तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

कोल्हापूरच्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी फेसबुकवरील कुबेर समुह (ग्रुप) सरसावला; 9 लाखाचा निधी केला जमामुंबई (प्रतिनिधी) :- दि 15 ----- कोल्हापूर , सांगलीसह अनेक भागात आलेल्या पूर संकटात मदतीसाठी हजारो हात सरसावले असतानाच आभासी जग म्हणून ओळखला जाणारा फेसबुकही आता यात पाठीमागे राहिला नसून फेसबुक वरील कुबेर या समुहाने तब्बल 9  लाख रुपयांचा निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमा केला आहे . केवळ निधीच नव्हे तर औषधी, कपडे ,अन्नधान्य ही मोठ्या प्रमाणावर जमा केले असून जमा झालेल्या निधीतून एक गाव किंवा वाडी दत्तक घेऊन त्याचे पूर्ण पुनर्वसन करण्याचा संकल्प या समुहाने सोडला आहे

संगमनेर येथील बांधकाम व्यवसायिक संतोष लहामगे यांनी पाच वर्षांपूर्वी फेसबुक वर कुबेर या नावाने एक समूह स्थापन केला.  महाराष्ट्रासह अनेक राज्यात व देश-विदेशात सतराशे सदस्य असलेल्या या समूहाने सुरुवातीला समूहातील सदस्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले.

 मात्र मागील काही काळापासून या समूहाने सामाजिक कार्यातही उडी घेतली असून याच सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून कोल्हापूर , सांगलीसह आणि ठिकाणी आलेल्या पुराच्या संकटात मदतीचा हात देण्यासाठी या समुहाने केलेल्या आवाहनानुसार समूहातील सदस्यांनी अवघ्या चारच दिवसात तब्बल सात लाख रुपयांचा निधी जमा केला आहे.  यात 4 रुपयापासून ते 50 हजार रुपयापर्यंत व्यक्तिगत मदत सदस्य करत आहेत.   याशिवाय कपडे, औषधी आणि अन्नधान्य मोठ्या प्रमाणावर जमा करून ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवले आहे . 

पुराची परिस्थिती संपूर्णपणे ओसरल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने एखादे गाव किंवा वाडी दत्तक घेऊन त्याचे संपूर्णपणे पुनर्वसन करण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात येणार असल्याचे समूहाचे संस्थापक संतोष लहामगे यांनी सांगितले. 

 समूहात जमा होणारा निधी जमा करण्यासाठी कुबेर फाउंडेशन नावाची रजिस्टर संस्थाही स्थापन करण्यात आली  आहे . 

यापूर्वीही समूहाने दुष्काळाच्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील राजूर येथे जलसंधारणाचे काम हाती घेतले होते,  दिव्यांगांचे सामूहिक विवाह सोहळा,  अनाथाश्रमातील मुलींसाठी स्वच्छतागृह,  अपंगांना साहित्याचे वाटप , दिवाळी अंकाचे प्रकाशन ,  गरजूंना आर्थिक मदत,   समूहातील सदस्यांना आर्थिक वैद्यकीय मदत,  रक्तदान शिबिरे अनाथाश्रमातील मुलांना साहित्य वाटप,  मुंबईच्या दादर चौपाटी चे गणेश विसर्जनानंतर स्वच्छता अभियान,  फिरते वाचनालय,  ग्रंथ दिंडी , रामशेज किल्ला स्वच्छता मोहीम,  वॉटर कप स्पर्धेत श्रमदान सह जवळपास 48 उपक्रम समूहाने मागील दोन वर्षात राबवले आहेत. 

कोल्हापूर येथे मदत वाटपाच्या कामात तेथील स्थानिक सदस्य मेहनत घेत आहेत.

या उपक्रमात ज्यांना मदत करायची असेल त्यांनी  99221- 11666, 
98348- 32140 ,  9822532808 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

*औषधे केली एअर लिफ्ट*

पुराच्या काळात एका गावात औषधें पुरवणे आवश्यक होते, मात्र गावात जाण्यासाठी कोणताच मार्ग नव्हता, त्यावेळी समूहाने कोल्हापूर विमानतळावर औषधें उपलब्ध करून देत ती औषधें त्या संबंधित गावात एअर लिफ्ट करून मदत पोहचवली होती.

No comments:

Post a comment