तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 9 August 2019

ताडकळस प्रा.आ.केंद्रात औषधांचा तुटवडा

 / प्रतिनिधी ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या आठ दिवसापासुन औषधांचा तुटवडा होत असल्याने येथे आलेल्या रूग्णांची मोठी हेळसांड होत आहे. पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्यातील मुख्य भागात असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच रूग्णांसंख्या जास्त असल्यामुळे येथे आलेला औषधांचासाठाचा तुटवडा होत असल्याने येथील रूग्णांना बाहेरून औषधी आणावी लागत आहे. येथील प्राथमिक आरोग्य गेल्या अनेक दिवसांपासून कुत्र्याने चावा घेतल्यास याठिकाणी औषध नसल्याने येथे आलेल्या रूग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.सध्या पावसाळा असल्याने कुत्रा चावलेले अनेक रूग्ण येत आहेत ताडकळस येथे इंजेक्शन नसल्याने ताडकळस व परिसरातील अनेक रूग्ण जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत. याबाबीकडे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष घालावे व ताडकळस येथील आरोग्य केंद्राला जास्तीचा औषध ऊपलब्ध करून द्यावेत आशी मागणी ताडकळस आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्या गावातील रूग्णांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment