तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 August 2019

पुरग्रस्तांच्या मदती साठी दुष्काळग्रस्त पाथरीकर सरसावले;मदती साठी शहरवाशियांना आवाहन
प्रतिनिधी
पाथरी:-सांगली,कोल्हापुरात कृष्णा आणि इतर नद्यांना आलेल्या महापुराने लाखोंचे संसार पाण्यात बुडाले तर अनेकांचे जीव या महापुराने घेतले.या अपदग्रस्तांना मदत करण्या साठी आता दुष्काग्रस्त पाथरीकर सरसावले असुन मंगळवार १३ ऑगष्ट रोजी सकाळी अकरा वाजता पाथरी शहरातील श्रीराम मंदिरा पासून पुरग्रस्तां साठी मदत फेरी काढण्यात येणार असून शहरातील सर्व स्तरातील नागरीकांनी यथाशक्ती एक रुपया पासुन,अन्न धान्य,तेल,नविन कपडे,कांदे,लसुन,आलू,टुथपेस्ट,बिस्कीट,मेडिसिन अशी मदत स्विकारली जाणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा,पंचगंगा,राधानगरी या नद्यांना महापुर आल्याने कोल्हापुर,सांगली,क-हाड  या भागातील लाखो रहिवाशी या पुराच्या पाण्या मुळे सर्वस्व गमाऊन बसले. यात लाखोंचे संसार वाहून गेले तर अनेकांचे बळी गेले आहेत.या भावांना मदतीचा हात देण्या साठी जन्मभूमी फाऊंडेशन ने हाक देत आ विषयी शहरातील सर्व पक्षियांना आणि सर्व स्तरातील संवेदनशील माणसांना एकत्र करत शहरातील स्व. बुवासाहेबकब्बडी कब्बडी मैदानावर नियोजन बैठक घेतली.याला मोठा प्रतिसाद मिळाला या वेळी सर्व पाथरीकरांच्या वतीने शहरातील श्रीराम मंदिरा पासून पाथरी शहरातील मुख्यरस्त्या सह संपुर्ण गल्ली बोळातुन जिवनावश्यक वस्तू मदत म्हणून स्विकारणार असून ही मदत थेट आपदग्रस्तांना नेऊन दिली जाणार असल्याचे या बैठकीत ठरले.ग्रामिण भागा सह शहरातील सर्वांनी या मदत फेरीत सहभागी होऊन यथा शक्ती सढळ हाताने मदत करावी असे आवाहन समस्त पाथरीकरांच्या वतिने या वेळी करण्यात आले.मदत फेरी व्यतिरीक्त ज्यांना धान्य मदत द्यावयाची आहे त्यांनी अविनाश कृषी केंद्राच्या बाजुला गाळा क्र.३९मोंढा मार्केट माजलगांव रोड येथे शुभम कनसे 9657969664 आणि सुनिल जाधव प्रियंका झेरॉक्स समोर गाळा नं.७४पंचायत समिती कॉम्पलॅक्स पाथरी येथे थेट संपर्क साधन्याचे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a comment