तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 9 August 2019

महिला महाविद्यालयात परिसर स्वच्छतेचा उपक्रम संपन्न
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

            नेहमीच उपक्रमशील असणाऱ्या येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये  परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले . या अभियानाचे नियोजन करून स्वच्छतेचा अनोखा संदेश देण्यात आला . महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवासेवा योजना विभागाच्या वतीने  " स्वच्छता पंधरवाडा " मोहिमेअंतर्गत अनेक उपक्रम घेण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज परिसर स्वच्छतेची मोहीम हाती घेतली गेली.' केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ' या उक्तीला अनुसरून प्रत्यक्ष कृती करून स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांच्या अंगी बाणविण्याचे सत्कार्य याप्रसंगी पार पाडण्यात आले. याप्रसंगी कुठलीही भाषणबाजी न करता महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सोबत घेऊन महाविद्यालयाच्या कुशल प्राचार्या  डॉ. आर. जे. परळीकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून परिसराच्या स्वच्छतेचा संदेश दिला .
        स्वच्छता विषयक भाषणे दिल्याने स्वच्छता होणार नाही तर हाती झाडू घेऊन प्रत्यक्ष स्वच्छता केल्यानेच स्वच्छता संपन्न होणार आहे आणि त्यायोगे " स्वच्छ भारत स्वस्थ भारत "  हे स्वप्न साकारणार आहे असा विचार मनी बाळगून विभागातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला.
         या परिसर स्वच्छता  अभियानात  महाविद्यालयाच्या प्राचार्यां समवेत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. पी. व्ही.गुट्टे ,  सहकार्यक्रम आधिकारी प्रा. डॉ प्रवीण दिग्रस्कर , प्रा.डॉ. एल. एस. मुंडे , प्रा. डॉ. विनोद जगतकर , प्रा. सौ. के. बी. देशपांडे , प्रा.सौ .आर. पी. शहाणे तसेच इतर प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

No comments:

Post a comment