तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

रोटरी क्लब सोनपेठ च्या वतीने पूरग्रस्थांसाठी मदत


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथील
रोटरी क्लब च्या वतीने आज दिनांक १४ अॉगस्ट २०१९ बुधवार रोजी सांगली-कोल्हापूर पूरग्रस्थांसाठी मदत फेरी काढण्यात आली व पुरग्रस्तांसाठी मदतनिधी संकलित करून रोटरी क्लबच्या खात्यावरून पाठवण्यात आली.
शहरातील फेरीमध्ये रोटरी क्लब सोनपेठचे अध्यक्ष रो.किरण चौलवार, सचिव रो.बालमुकुंद सारडा, एजी रो.चंद्रकांत लोमटे, डीसी रो.संजय आढे, माजी आमदार रो.व्यंकटराव कदम साहेब, माजी न.प.उपाध्यक्ष रो.सुहासदादा काळे, प्रतीष्ठीत व्यापारी रो.घनःशामदास झंवर, रो.संजय काबरा, रो.प्रमोद गावरस्कर, रो.गीरीष गावरस्कर, रो.गजानन घोडे, रो.केदार वलसेटवार,रो.सुभाषअप्पा नित्रुडकर, केमिस्ट ड्रगीस्ट असोसियनचे अध्यक्ष रो.संतोषअप्पा निर्मळे, सोनपेठ इंण्डेनचे रो.संजय राख, रो.भगवानराव मस्के, रो.डॉ.बालाजी पारसेवार, रो.प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, मुख्याध्यापक रो.प्रदिप गायकवाड, रो.इंजी.नागनाथ सातभाई, सोनपेठ दर्शन चे संपादक श्री किरण स्वामी, रो.प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये, रो.अनिल शेटे, रो.संजय ईंदुरकर, श्री नागनाथ कोटुळे, श्री बाबा कदम, डॉ. शशीकांत शेटे, श्री रामनिवास सारडा व रोटरॕक्ट क्लबचे विद्यार्थी मिळून सोनपेठ शहरात मदत फेरी काढण्यात आली.
 सदरील मदत फेरीमध्ये सर्वच व्यापारी, डॉक्टर्स, कर्मचारी,राजकारणी, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, गाडेवाले, फेरीवाले, छोटे व्यापारी आणि विशेषतः हातावर पोट असणारे अत्यंत गरीब लोक जसे कि बुटपॉलीश करणारे, हमाल, गाडेवाले, फेरीवाले, स्वच्छता कामगार, महिला भगीनी व सोनपेठमध्ये पायी चालणाऱ्या लोकांनी मोठ्या आस्थेने पुरग्रस्तांसाठी मदत करुन पूरग्रस्तांप्रती आपली आस्था व्यक्त केली. या मदत फेरीमध्ये शहरातून रुपये ४५१०७/ (पंचेचाळीस हजार एकशे सात रुपये) आणि रोटरी क्लब सोनपेठ सदस्यांनी प्रमाणे १६५००/ (सोळा हजार पाचशे) असे एकूण रुपये ६१६०७ (एकसष्ट हजार सहाशे सात रुपये ) जमा झाले. सदरील जमलेला निधी रोटरी क्लब सोनपेठ च्या बँक खात्याद्वारे पाठवून देण्यात आला.

No comments:

Post a comment